myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

कान वाहणे काय आहे?

कान वाहणे हे एक लक्षण आहे जे बऱ्याच विकारांसोबत संबंधित असते जसे की कानाचा संसर्ग, कानाची सूज, बाह्य किंवा मध्यवर्ती कानात दुखापत आणि क्वचितच कानाचा कर्करोग. याला ओटोरिया असे म्हटले जाते आणि ही स्थिती अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते. कान वाहणे खूप अप्रिय आहे आणि कोणत्याही वयोगटात दिसू शकते परंतु मुख्यत्वे मुलांमध्ये जास्त पाहिले जाते. कान वाहणे पस, श्लेष्म, मेण किंवा रक्त स्वरूपात असू शकते.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कान वाहण्याचे सर्वात सामान्य कारण हे संसर्ग आणि कानाच्या बाहेर किंवा मधात सूज येणे हे आहे. जर आपले कान वाहत असेल तर आपल्याला खालील चिन्हे असू शकतात:

 • कानात वेदना.
 • कानातून घाण वास येणारे द्रव वाहणे.
 • तोल न सांभाळता येणे.
 • चिडचिड.
 • झोप न येणे.
 • कान ओढणे.
 • ताप.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कान वाहणे हे एक सामान्य लक्षणं आहे आणि हे 5 वर्षांखालील मुलांमध्ये सर्वसामान्यपणे बघायला मिळते कारण त्यांमध्ये असमानधारकपणे विकसित युस्टाशियन ट्यूब आणि कमी प्रतिकारशक्ती असते. हे प्रौढांमध्ये देखील बघायला मिळते. जर एखाद्या व्यक्तीने कानातून अप्रिय द्रव पदार्थाचा स्त्राव अनुभवला असेल तर हे पुढील कारणांमुळे असू शकते

 • कानाच्या मधात संसर्ग (ओटीटिस मीडिया).
 • बाह्य कानामध्ये संसर्ग (ओटीटिस एक्सटर्ना).
 • कानाची सूज.
 • सर्दी.
 • टेम्पोरल हाडाला दुखापत.
 • कानात नववृद्धी (क्वचितच आढळणारे).
 • कानाच्या शास्त्रक्रिये नंतर होणारे परिणाम.

याचे उपचार आणि निदान कसे केले जातात?

कानातून द्रवपदार्थाच्या वाहण्याची पूर्णपणे तपासणी करणे  अत्यंत आवश्यक आहे. तरी कुठल्याही तपासणीपूर्वी द्रव पदार्थ सूक्ष्मपणे शोषून घेणे(मायक्रो सक्शन करणे) अत्यंत आवश्यक आहे. रोगनिदान करण्याचे पहिले पाऊल म्हणजे कान, नाक, घसा (ईएनटी-ENT) तज्ञांकडुन रोग्याचा इतिहास जाणून घेणे हे आहे आणि निदान पुढील चाचण्यांवर आधारित केले जाऊ शकतात:

 • कानाची तपासणी.
 • न्यूमॅटिक ऑटोस्कोपी.
 • टायपॅनोमेट्री.
 • ऐकण्याची चाचणी.
 • रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यास रक्त चाचणी.
 • रोगांच्या कारकांची माहिती मिळवण्यासाठी कानातील स्त्रावाचे चे विश्लेषण किंवा इअर स्वॉब कल्चर.

कान वाहण्याचा उपचार योग्य निदान केल्यानंतर निश्चित केला जाईल. एकदा अँटीबायोटिक संवेदनशीलता चाचणीचे परिणाम प्राप्त झाल्यानंतर, औषधं निश्चित केली जाऊ शकतात. उपचारामध्ये खालील समाविष्ट आहे :

 • वेदना नियंत्रित करण्यासाठी वेदनाशामक.
 • टॉपिकल स्टेरॉइड.
 • अँटीबायोटिक इअर ड्रॉप्स.
 • स्त्राव मेणासारखा असल्यास म्यूकोलिटिक ड्रॉप्स.
 • संसर्ग फंगीने होत असल्यास कान स्वच्छ करण्यासाठी अँटीफंगल फॉर्म्युलेशन्स.
 • ताप नियंत्रित करण्यासाठी अँटीपायरेटिक्स.

उपचारांसह, काही स्वयं-काळजी उपाय, जसे की धूम्रपान न करणे आणि भ्रूणाचे आणि मुलांचे थंड कानांच्या संसर्गापासून संरक्षित करणे, हे कान वाहण्यापासून संरक्षण करू शकते.

कान वाहण्याचा उपचार करणे आवश्यक आहे कारण ती एक वेदनादायक स्थिती असू शकते आणि काही बाबतींत बहिरेपणा देखील होऊ शकतो. कान वाहण्या संबंधित असध्याता एक दुर्मिळ कारण असू शकते. व्यवस्थापनासाठी योग्य निदान आणि उपचार आवश्यक आहे

 1. कान वाहणे साठी औषधे
 2. कान वाहणे चे डॉक्टर
Dr. K. K. Handa

Dr. K. K. Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Aru Chhabra Handa

Dr. Aru Chhabra Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Yogesh Parmar

Dr. Yogesh Parmar

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

कान वाहणे साठी औषधे

कान वाहणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Otorex खरीदें
Ciplox खरीदें
Dexoren S खरीदें
Throatsil खरीदें
Cifran खरीदें
Neocip खरीदें
Neoflox खरीदें
Newcip खरीदें
Nircip खरीदें
Nucipro (Numed) खरीदें
Olbid खरीदें
Low Dex खरीदें
Omniflox खरीदें
Periflox खरीदें
Pic खरीदें
Q Bid खरीदें
Quinopic (Pci) खरीदें
Dexacort खरीदें
Quinotop खरीदें
Dexacort (Klar Sheen) खरीदें
4 Quin Dx खरीदें
R Cipron खरीदें
Solodex खरीदें

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Peter Dannat. Management of patients presenting with otorrhoea: diagnostic and treatment factors. Br J Gen Pract. 2013 Feb; 63(607): e168–e170.doi: [10.3399/bjgp13x663253]
 2. Appiah Korang L. Aetiological agents of ear discharge: a two year review in a teaching hospital in Ghana.. Ghana Med J. 2014 Jun; 48(2):91-5
 3. Vaghela A et al. An analysis of ear discharge and antimicrobial sensitivity used in its treatment. Int J Res Med Sci. 2016 Jul; 4(7):2656-60
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ear discharge
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Ear Infection
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें