myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

इलेक्ट्रोलाइट असंतुलन काय आहे?

खनिजे किंवा इलेक्ट्रोलाइट हे होमिओस्टॅसिस किंवा शरीरातील वेगवेगळे कार्य संतुलीत राखण्यासाठी महत्वाची असतात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीमध्ये असंतुलन, तंत्रिका, हार्मोन्स आणि शरीराच्या द्रवपदार्थांच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणतात. इलेक्ट्रोलाइट असंतुलन म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स जसे,सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांची एकतर कमतरता किंवा जास्त प्रमाण.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता किंवा जास्त प्रमाणामुळे काही चिन्हे आणि लक्षणे दिसतात,ती म्हणजे:

इलेक्ट्रोलाइट असंतुलनाची मुख्य कारणं काय आहेत?

इलेक्ट्रोलाइट असंतुलनाच्या मुख्य कारणांमध्ये समाविष्ट आहे:

 • अतिसार, उलट्या, जास्त घाम येणे, गंभीर संसर्ग, अँटीडाययुरेटिक हार्मोनमध्ये विकार, इत्यादि कारणांमुळे शरीरातुन पाणी वाहून जाणे.
 • एल्डोस्टेरॉन (ॲड्रेनल ग्रंथी द्वारा सोडले गेलेले) आणि पॅराथायराईड हार्मोनच्या कार्यामध्ये विकार, जे शरीरातील सोडियम आणि कॅल्शियमशी संबंधित आहेत.
 • मूत्रपिंडाच्या कार्यप्रणालीतील विकार ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे असामान्य नुकसान किंवा संचय होते
 • रक्तदाबाच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे (डाययुरेटिक्स)
 • कंजसटिव्ह हार्ट फेलिअर,फुफ्फुस विकार इ.

इलेक्ट्रोलिट असंतुलनाचे निदान आणि उपचार केले जातात?

इतिहास, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचणीच्या आधारावर डॉक्टर इलेक्ट्रोलाइट असंतुलनाचे निदान करतात.

 • रक्त चाचणी
  • सीरम सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, कॅल्शियम इत्यादि मोजण्यासाठी वापरले जाणारे मूल मेटॅबॉलिक पॅनेल. रक्तातील इलेक्ट्रोलाइट्समध्ये घट किंवा वाढ, रक्ताचे पीएच(Ph), मूत्रपिंडांचे कार्य इ. शोधण्यासाठी.
 • मूत्र चाचणी
  • हे मूत्रात इलेक्ट्रोलाइट्सचे स्तर मोजण्यासाठी वापरले जाते.
 • इतर चाचण्या- इलेक्ट्रोलाइट असंतुलनच्या कारणांवर अवलंबून असतात.
  • सीरम क्रिएटिनिन, ब्लड यूरिया नायट्रोजन.
  • पॅराथाईरॉईड हार्मोनची पातळी.
  • हृदय आणि फुफ्फुसाची समस्या शोधण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम, 2 डी इको, एक्स-रे छाती इ.

असमतोल सुधारण्याच्या उद्देशाने उपचार पद्धती खाली दिल्या आहेत:

 • इंट्राव्हेनस(शिरेच्या आत) इंजेक्शन्स किंवा तोंडी टॅब्लेटद्वारे इलेक्ट्रोलाइट सप्लीमेंट्स.
 • पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असलेली ताजी फळं.
 • स्नायूचा त्रास, डोकेदुखी, मळमळ इत्यादींपासून मुक्त करण्याकरिता लक्षणांचा उपचार.
 • शरीरावर एडीमा किंवा सूज आल्यास पाण्याच्या वापरावर प्रतिबंध.
 • औषधं जसे कि डाययुरेटिक्स, इडीमा कमी करण्यासाठी वापरली जातात.
 • ॲड्रेनल ग्रंथी-संबंधित विकारांकरिता कॉर्टिकोस्टेरॉइड्स, ज्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन होते.
 1. इलेक्ट्रोलाइट असंतुलन साठी औषधे

इलेक्ट्रोलाइट असंतुलन साठी औषधे

इलेक्ट्रोलाइट असंतुलन के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Renolen खरीदें
Hynasal खरीदें
Hypersenz खरीदें
Basol खरीदें
Hyprosol खरीदें
Hysol खरीदें
Diucontin K खरीदें
D.N.S खरीदें
Dns (Baxter) खरीदें
Salivate MF खरीदें
Dns Infusion खरीदें
Rhinowash Starter Kit खरीदें
Dns (Denis) खरीदें
Grelyte खरीदें
Salinex खरीदें
Sodium Chloride (Albert) खरीदें
Tna खरीदें
Leclyte G PL खरीदें
Catlon खरीदें
Leclyte P खरीदें
Sterofundin खरीदें
Rallidex खरीदें

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Fluid and Electrolyte Balance
 2. Arif Kadri Balcı et al. General characteristics of patients with electrolyte imbalance admitted to emergency department. World J Emerg Med. 2013; 4(2): 113–116. PMID: 25215103
 3. UNM Health Sciences Center. Electrolyte Imbalance. National Cancer Institute; [Internet]
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Fluid imbalance
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Basic metabolic panel
 6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Electrolytes - urine
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें