myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

एंडोमेट्रियल हायपरप्लासिया काय आहे ?

गर्भाशय हा तीन थरांचा बनलेला असतो ते म्हणजे पेरिमेट्रीयम,मायोमेट्रीयम आणि एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम हा सर्वात आतील थर आहे जो लहान इपीथिलीयल पेशींनी बनलेला असतो. अंडाशयाने सोडलेल्या हार्मोन च्या क्रियेअंतर्गत तो वाढतो. हा एंडोमेट्रियम आहे जो प्रत्येक मासिक पाळी दरम्यान वाढतो आणि गळून पडतो, त्यामुळेच रक्तस्त्राव होतो. इस्ट्रोजेनच्या पातळीतील काही विशिष्ट बदलांमुळे, हा एंडोमेट्रियम जाड बनून राहतो आणि ही स्थिती एंडोमेट्रियल हायपरप्लासिया म्हणून ओळखली जाते. हा कर्करोग नाही परंतु काही प्रकरणांमध्ये तो कर्करोग होऊ शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?

एंडोमेट्रियल हायपरप्लासियाची लक्षणे केवळ गर्भाशया पर्यंतच मर्यादित नाहीत; त्याची सामान्यीकृत लक्षणे देखील दिसू शकतात, ज्यात खालील समाविष्ट आहेत:

 • असामान्य मासिक रक्तस्त्राव (जास्त रक्तस्त्राव किंवा अधिक वारंवार मासिक पाळी)
 • पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव
 • मेनोपॉझ नंतर देखील योनीतून रक्तस्त्राव
 • जास्त रक्त गेल्याने ॲनिमिया
 • अशक्तपणा

याची मुख्य कारणं काय आहेत ?

एंडोमेट्रियम चे कार्य एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन पातळी बद्दल फार संवेदनशील असते. साधारणपणे, एस्ट्रोजन तो आहे जो एंडोमेट्रियलच्या आतील थराच्या जाडीला वाढण्यास उत्तेजना देतो. जेव्हा एस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी तुलनेने कमी असते तेव्हा याचा परिणाम एंडोमेट्रियल हायपरप्लासिया हा होतो. हे सामान्यतः त्या महिलांमध्ये होते त्यांमध्ये खालील विकार पाहिले जाऊ शकतात:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

वैद्यकीय इतिहासासह क्लिनिकल चाचणीत एंडोमेट्रियल हायपरप्लासिया दिसून येतो. खाली काही तपासण्या दिल्या आहेत जे निदानाची पुष्टी करण्यासाठी आवश्यक आहेत. सोबतच कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी देखील आवश्यक आहे.

 • पेल्व्हिक अल्ट्रासाऊंड - एंडोमेट्रियमची जाडी माहिती करण्यासाठी आणि त्याचे कारण शोधण्यासाठी
 • ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड - एंडोमेट्रियममधील बदलांचे अधिक अचूकपणे मूल्यांकन करण्यासाठी
 • हिस्टेरोस्कोपी - एन्डोस्कोपचा वापर करून एंडोमेट्रियम पाहण्यासाठी.
 • एंडोमेट्रियल बायोप्सी -निदानाची पुष्टी करण्यासाठी आणि एंडोमेट्रियल कँन्सर ची शक्यता घालवायला टिश्यूचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले केले जातात.

कर्करोगाची पुढील शक्यता घालवण्यासाठी रुटीन पेल्व्हिक अल्ट्रासाऊंड दर 2-3 वर्षांनी केले जाते.

एंडोमेट्रियल हायपरप्लासियासाठीच्या उपचार पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहे

 • निरीक्षण - ही सर्वात सामान्यतः वापरली जाणारी  पद्धत आहे कारण मेनोपॉझ नंतर एस्ट्रोजेनच्या अनुपस्थितीत हायपरप्लासिया कमी होतो किंवा लक्षणे कमी होतात.
 • वैद्यकीय व्यवस्थापन - स्पष्ट लक्षणे असल्यास किंवा मेनोपॉझ नंतर ही योनीतून स्त्राव होत असल्यास तोंडावाटे खायला प्रोजेस्टेरॉन च्या गोळ्या दिल्या जातात.  
 • सर्जिकल मॅनेजमेंट - काही रुग्णांमध्ये वैद्यकीय थेरपी नंतरही सतत लक्षणे दिसतात. अशा प्रकरणात एंडोमेट्रियम हा एंडोमेट्रियल अब्लेशन पद्धतीद्वारे साफ केला जातो किंवा गंभीर प्रकरणात अंडाशयांसह संपूर्ण गर्भाशय काढले जाते.
 1. एंडोमेट्रियल हायपरप्लासिया साठी औषधे

एंडोमेट्रियल हायपरप्लासिया साठी औषधे

एंडोमेट्रियल हायपरप्लासिया के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
NaturogestNaturogest 100 Mg Capsule135.0
GestofitGestofit 100 Mg Capsule150.0
DubagestDubagest 100 Mg Capsule159.0
SustenSusten 100 Mg Capsule108.0
Deviry TabletDeviry 10 Mg Tablet58.94
NeogestNeogest 100 Mg Capsule359.0
N GestN Gest 100 Mg Capsule112.0
NidagenNidagen 100 Mg Capsule96.0
NovarelNovarel 100 Mg Injection92.0
OgestOgest 100 Mg Capsule93.0
OirgametrilOirgametril 5 Mg Tablet29.0
OptogestOptogest 200 Mg Tablet270.0
OrgagestOrgagest 200 Mg Capsule133.0
PeetonePeetone 250 Mg Injection42.0
PgronPgron 100 Mg Injection70.0
PlacentonePlacentone 100 Mg Tablet137.0
PregcertPregcert 200 Mg Capsule201.0
PregcitilPregcitil 100 Mg Capsule99.0
PreglivePreglive 200 Mg Tablet Sr264.0
PregmainPregmain 250 Mg Injection53.0
PrenonePrenone Sgc 200 Mg Capsule240.0
ProfineProfine 200 Mg Capsule220.0
ProgoProgo 10 Mg Tablet13.0
ProhaleProhale 100 Mg Capsule132.0
ProlutecProlutec 250 Mg Injection94.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...