नखाला मार लागणे - Fingernail Injury in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 30, 2018

July 31, 2020

नखाला मार लागणे
नखाला मार लागणे

नखाला मार लागणे काय आहे?

नखाला मार लागणे म्हणजे एखाद्या नखाला बाहेरुन मार लागून नखाची रचना आणि कार्य बदलणे. कामाच्या ठिकाणी गट्टा होणे, जास्त वाढलेले नख, किंवा नख अति प्रमाणात कुरतडणे यामुळे  नखाला मार लागू शकतो. नखांची स्वत: काळजी घेऊन इजा टाळता येते. नखाला झालेल्या दुखापतीमुळे आपल्याला दररोजच्या कामात अडथळा येऊ शकतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

नखाला मार लागल्याने सामान्यपणे दिसणाऱ्या चिन्ह आणि लक्षणांत खालील बाबींचा समावेश होतो

  • नखाखाली रक्त संचय होऊन तिथे निळसर काळे डाग दिसतात.
  • सतत दुखत राहणे.
  • ताप.
  • नखात ठसठस होणे.
  • नख तुटणे.
  • सूज.
  • क्वचितप्रसंगी रक्त येणे.
  • काही वेळेस पस होणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

नखाला मार लागण्याचे काही सामान्य कारणे आहेत

  • लांब न कापलेले नख.
  • जखमा.
  • अति नखं कुरतडणे.
  • नखालगतची कातडी कुरतडणे.
  • बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

नखाला मार लागण्याच्या बाबतीत, आपल्याला ताबडतोब दिसून येईल की प्रभावित झालेल्या बोटाचे नख ​​लक्षणे दाखवायला सुरुवात करेल.

डॉक्टर बोटाच्या अथवा अंगठ्याच्या नखावरील तुमच्या जखमेची तपासणी करतील. अंतर्निहित लिगामेंटमध्ये गंभीर जखम झाल्यास रक्त परीक्षण आणि इमेजिंग चाचण्या आवश्यक असतात. नंतर  डॉक्टर उपचार करण्यासाठी वेदनाशामक आणि अँटीबायोटिक्स लिहून देतील.

वेदना कमी करण्याचा काही सामान्य मार्ग आहेत:

  • कोणत्याही प्रकारची धूळ किंवा संभाव्य संसर्ग-कारणीभूत सूक्ष्मजीव काढण्यासाठी वाहते थंड पाण्याखाली हळुवारपणे धुवा.
  • आईस पॅक - वेदना कमी करण्यासाठी पुढचे काही तास दर तासाला 20 मिनिटांसाठी वापरा. रक्तस्त्राव थांबवणे आणि वेदना आणि सूज थांबवणे ही एक महत्वाची प्राथमिक मदत आहे.
  • कॉम्प्रेशन थेरपी.
  • नॉन-स्टेरॉयडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स सारखे पेनकिलर वापरा.

नखाला मार लागणे रोखण्यासाठी काही प्रभावी आणि सुलभ मार्ग आहेत:

  • तुमची नखं नियमितपणे व्यवस्थित कापा.
  • तुमचे नखं ​​आणि नखालगतची कातडी कुरतडू नका.
  • इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि भारी यंत्रसामग्री सोबत काम करताना सर्व सावधगिरी बाळगा.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Nail Trauma
  2. Bharathi RR, Bajantri B. Nail bed injuries and deformities of nail. Indian J Plast Surg. 2011 May-Aug;44(2):197-202. PMID: 22022029
  3. Tos P, Titolo P, Chirila NL, Catalano F, Artiaco S. Surgical treatment of acute fingernail injuries. J Orthop Traumatol. 2012 Jun;13(2):57-62. PMID: 21984203
  4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Nails - fingernail and toenail problems
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Wounds and Injuries