ढुंगणाच्या हाडाचा अस्थिभंग (हिप फ्रॅक्चर) - Fractured Hip in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

April 25, 2019

July 31, 2020

ढुंगणाच्या हाडाचा अस्थिभंग
ढुंगणाच्या हाडाचा अस्थिभंग

ढुंगणाच्या हाडाचा अस्थिभंग (हिप फ्रॅक्चर) म्हणजे काय?

ढुंगणाच्या हाडाचा अस्थिभंग (हिप फ्रॅक्चर) म्हणजे नितांबाला जोडणाऱ्या हाडांचे तुटणे होय. ढुंगण हे फेमरचा (मांडीचे हाड) वरचा भाग पेल्विस आहे जो हाडांच्या तुटण्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. हा अस्थिभंग प्रामुख्याने 65 वर्षाच्या वरील महिला व लोकांमध्ये कमकुवत हाडांमुळे दिसून येतो.

याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • मांडीच्या वरच्या भागात दुखणे.
  • अस्थिभंगाच्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात सूज व रक्त साकळणे दिसून येते.
  • नितंबाच्या हालचालींमध्ये अस्वस्थता व अवघडलेपण जाणवणे.
  • चालताना त्रास.
  • परिणाम झालेल्या नितंबावर जास्त वजन टाकू शकत नाही.

इतर दुर्मिळ लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • परिणाम झालेले नितंब बाहेरील बाजूस झुकते व विकृत होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सर्वात सामान्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • ट्रॉमा किंवा थेट नितंबाच्या हाडांवर परिणाम करणारे अपघात. वृद्ध व्यक्तींमध्ये फक्त पाय वळवल्यामुळे किंवा एका जागी बराच वेळ उभे राहिल्याने कमकुवत हाडांमुळे हा अस्थिभंग होऊ शकतो पण हा ट्रॉमा असणाऱ्या कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो.
  • उभे असताना पडल्यास हे मुख्यतः वृद्ध व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या अस्थिभांगाचे कारण आहे
  • काही वैद्यकीय स्थिती अस्थिभंगाशी निगडित असल्याचे आढळून येते. त्या स्थितीत हाडे ठिसूळ बनतात (व्हिटॅमिन डी व कॅल्शिअम ची कमतरता, ऑस्ट्रोपोरोसिस, जास्त प्रमाणात थायरॉईड) मेंदूशी निगडित आजार (डेमेन्शिया, पार्किन्सन).
  • कॉर्टिकोस्टेरॉईडस् च्या औषधांमुळे हाडे कमकुवत होतात सिडेटिव्स व अँटीसायकॉटिक्स मेंदूशी निगडित आहे.
  • तंबाखू सेवन किंवा दारू सेवन यामुळे कमकुवत हाडे व हाडे बरे होण्यासाठी विलंब होऊ शकतो.
  • शरीराची कमी हालचाल व बैठी जीवनशैली हे खालील हाडाच्या घनता व कमकुवतपणा दाखवते.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

इतिहास व लक्षणांचा योग्य अभ्यास व शारीरिक चाचण्यांमधून योग्य निदान केले जाते.

एक्स-रे मुळे निदान पक्के केले जाते. एमआरआय किंवा सीटी स्कॅन सखोल निरिक्षणासाठी आवश्यक असतो.

उपचार हे तो भाग व फ्रॅक्चरच्या प्रकारावर अवलंबून असतात. नितंबाचे उपचार करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

गंभीर वैद्यकीय परिस्थितीमध्ये, शस्त्रक्रिया टाळून लक्षणांना आराम देऊन काळजी घेतली जाते.

काही दुर्मिळ बाबतीत, शस्त्रक्रिया टाळली जाते व रुग्णाला पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला जातो.

 



संदर्भ

  1. Australian Commission on Safety and Quality in Health Care. Hip Fracture Care Clinical Care Standard. Sydney, Australia. [internet].
  2. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont, Illinois. Hip Fractures.
  3. American Academy of Family Physicians [Internet]. Kansas, United States; Hip Fractures
  4. American Academy of Family Physicians [Internet]. Leawood, Kansas; Hip Fractures in Adults
  5. National Health Service [Internet]. UK; Hip fracture
  6. Stanford Health Care [Internet]. Stanford Medicine, Stanford University; Types of Hip Fractures

ढुंगणाच्या हाडाचा अस्थिभंग (हिप फ्रॅक्चर) चे डॉक्टर

Dr. Vikas Patel Dr. Vikas Patel Orthopedics
6 Years of Experience
Dr. Navroze Kapil Dr. Navroze Kapil Orthopedics
7 Years of Experience
Dr. Abhishek Chaturvedi Dr. Abhishek Chaturvedi Orthopedics
5 Years of Experience
Dr. G Sowrabh Kulkarni Dr. G Sowrabh Kulkarni Orthopedics
1 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या