myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

ऑस्टिओपोरोसिस हाडांची अशी अवस्था आहे ज्यामध्ये हाडांचे घनत्त्व कमी होते आणि त्या ठिसूळ होऊ लागतात. हाडे अशक्त होणे आणि परिणामी गुंतागुंतीनिर्माण होणे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिकमोठ्या प्रमाणात आहे. ऑस्टिओपोरोसिसच्या व्यापक कारणांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणारे संप्रेरकांतील बदल, कॅल्शिअम आणि डी जीवनसत्वाची कमतरता आणि ज्यामुळे हाडे अशक्त होऊ शकतात अशा इतर आजारांचा समावेश आहे.ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांसाठी आरोग्याची सर्वात मोठी जोखीम म्हणजे इजांमुळे आणि पडल्यामुळे अस्थिभंग होणे ही आहे. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांमध्ये हाडे अशक्त असणे आणि वाकलेल्या हाडांमुळे शरिराची ढब विकृत असण्याचे खूप प्रमाण असते. संप्रेरक उपचार , आहारातील पूरके आणि स्वस्थ जीवनशैली ह्या मुख्य उपचारपद्धती आहेत. अगोदर निदान झाल्यास, हाडांची पुढील हानी टळू शकते आणि अस्थिभंगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.

 1. हाडे ठिसूळ होणे ची लक्षणे - Symptoms of Osteoporosis in Marathi
 2. हाडे ठिसूळ होणे चा उपचार - Treatment of Osteoporosis in Marathi
 3. हाडे ठिसूळ होणे साठी औषधे
 4. हाडे ठिसूळ होणे चे डॉक्टर

हाडे ठिसूळ होणे ची लक्षणे - Symptoms of Osteoporosis in Marathi

सुरुवातीच्या काळात ऑस्टिओपोरोसिस ओळखणे कठीण आहे कारण धोक्याची सूचना देऊ शकणारी कोणतीही चिन्हे सामान्यतः दिसत नाहीत. अनुभवास येणारी लक्षणे अतिशय मोघम असतात आणि एखाद्या असामान्य प्रकरणात वेदना किंवा तणाव यापैकी कुठले कारण आहे हे कळण्यास संभ्रम होऊ शकतो. आजाराची लक्षणीय प्रगती झाल्यानंतरच हे दिसते.हल्ली लोक जागृत झाले आहेत आणि या आजाराची आधीच नोंद घेत आहेत. ऑस्टिओपोरोसिस असण्याच्या माहीत असलेल्या चिन्हांमध्ये हे समाविष्ट होते:

 • पलंगातून उठताना तीव्र पाठदुखी होणे. चालताना किंवा उभे असताना सर्वाधिक असह्यवेदनाहोणे. अचानक, पाठीत तीव्र वेदना होणे देखील आजार सुचवते. मेरुदंडातील संप्रेषण अस्थिभंगामुळे असह्य पाठदुखी होते. तथापि, कधीकधी काही लक्षणे दिसू शकत नाहीत.
 • ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त असताना शरीराची लवचिकता कमी होते. झुकणे, घुमटणे आणि शरीर ताणण्यासह अनेक सोप्या क्रिया कठीण होतात, किंवा त्या करताना गंभीर वेदना होतात.
 • ऑस्टिओपोरोसिसचे अस्थिभंग हे एक व्यापक लक्षण आहे. अस्थिभंग (उद्दीपके)होणे हे विशेषतः किरकोळ पडण्याने आणि इजा झाल्याने होते व हे ऑस्टिओपोरोसिसचे स्पष्ट चिन्ह आहे. अस्थिभंग सामान्यपणे मेरुदंड, नितंब आणि भुजा या ठिकाणी होतो. साध्या दैनिक हालचाली जसे पिशवी उचलणे, कारच्या आत शिरणे व बाहेर येणे आणि कमी उंचीच्या स्टूलवर किंवा खुर्चीवर बसणेदेखील धोकादायक सिद्ध होऊ शकते.
 • ऑस्टिओपोरोसिसच्या परिणामाने शारीरिक ढब बदलते. व्यक्तीचा कणा झुकण्यास सुरुवात होते आणि आजाराच्या परिणामाने काही लोकांची उंचीदेखील कमी होऊ शकते.
 • एकदा एखाद्या व्यक्तीचे वजन कमी झाल्यास, त्याच्या लक्षात येते की शरिराचा वरचा भाग खालच्या दिशेने वळायला लागला आहे. डोवराज हम्प म्हणून ओळखले जाणारे मेरुदंडाचे वाकणे शरीराची ढबअशक्त बनवते आणि पुढे वाकणे अतिशय स्पष्ट दिसते. या मेरुदंडाच्या वाकलेल्या  अवस्थेला क्रायफोसिस म्हणतात. (अधिक वाचा - वजन कमी करणे आहार योजना)
 • क्ष-किरणांद्वारे घेतलेल्या दंतप्रतिमेत दिसणारे आणखी एक व्यापक लक्षण म्हणजे जबड्यातील हाडांची झालेली क्षती हे आहे.

हाडे ठिसूळ होणे चा उपचार - Treatment of Osteoporosis in Marathi

ऑस्टिओपोरोसिससाठी उपचारांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. तथापि, इष्टतम उपचारांमध्ये वैद्यकीय सेवा आणि जीवनशैलीत केलेले बदल यांचा समावेश आहे. रुग्णांच्या पूर्वेतिहासाचा संपूर्ण अभ्यास आणि आजारास कारणीभूत ठरू शकणाऱ्या सर्व संभाव्य घटकांचे विश्लेषण केल्यानंतर उपचारांना प्रारंभ होतो. यानंतर, उपचारांची सुयोग्य पद्धत निवडली जाऊ शकते.

 • एस्ट्रोजन आणि संप्रेरक प्रतिस्थापन
  इस्ट्रोजेन आणि अॅन्ड्रोजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांसाठी हे निर्धारित केले जाते. लैंगिक संप्रेरकांची पातळी सुधारून आणि सरासरी श्रेणी पुनर्संचयित करून, अस्थिभंगाची जोखीम कमी केली जाऊ शकते. लवकर आलेल्या रजोनिवृत्तीमध्ये स्त्रियांचे संप्रेरक पुनर्स्थापन उपचार अधिक प्रभावी ठरतात. ऑस्टिओपोरोसिसच्या उपचारांबरोबरच, हृदयाचे स्वास्थ्य राखण्यात, उष्णता झोत कमी करण्यात तसेच लैंगिक गुणधर्मांचे पालन करण्यात देखील ते मदत करते. तथापि, इस्ट्रोजेन उपचारांमुळे स्तन नरम होतात आणि योनी रक्तस्त्रावात वाढ होऊ शकते. प्रोजेस्टेरॉनशिवाय एस्ट्रोजेन दिल्या गेल्याने गुंतागुंती नोंदवल्या गेल्या आहेत, म्हणून स्त्रीरोगतज्ञ किंवा अंतःस्रावशास्त्रतज्ञाशी सल्लामसलत केल्यानंतरच हा उपचार सुरू करणे आवश्यक आहे. (अधिक वाचा - स्तन दुखणे उपचार)
 • बिस्फोस्फोनेट्स
  हे हाडांचे विघटन टाळून उपयोगी पडते आणि स्त्रियांसाठी रजोनिवृत्तीनंतर सर्वाधिक प्रभावी आहे. ते पोटातून घेतले जाते किंवा लसीकरणाद्वारे रक्तप्रवाहात टोचले जाते. तथापि, घासत त्रास होणे, मळमळ होणे, गिळताना त्रास होणे आणि पोटात वेदना होणे यांसारखे अनेक दुष्परिणाम दिसू शकतात.
 • कॅल्सीटोनिन
  कॅल्सीटोनिनचा वापर प्रामुख्याने रजोनिवृत्तीनंतरच्या चरणात हाडांच्या क्षतीस कमी करण्यासाठी होतो. हे सामान्यत: नाकातून दिले जाते आणि एस्ट्रोजेनांची प्रतिस्थापना करू शकते. समान्यतः निर्धारित मात्रेची आळीपाळीने दोन्ही नाकापुड्यांमध्ये फवारणी केली जाते. मणक्यातील तीव्र अस्थिभंगाची लक्षणे असलेल्या लोकांसाठी हा आदर्श उपचार असल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने, काही प्रकरणांमध्ये, हाडांच्या खनिज घनतेमध्ये किरकोळ वाढ दर्शविली आहे. दुष्परिणामांमध्ये चट्टे, चेहऱ्याचे झोत  आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असू शकतात.
 • सोडियम फ्लोराइड
  हे एकमेव ज्ञात घटक आहे जे अस्थी (ओस्टिओब्लास्टिक पेशी) विकसित करणाऱ्यापेशी उत्तेजित करते आणि हाडांच्या निर्मितीस मदत करते. अध्ययनांमध्ये, रुग्णांना सोडियम फ्लोराईडची उच्च मात्रा दिली गेली असल्यास, त्यांच्या मेरूदंडातील अस्थि खनिज घनता लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसते. मेरुदंडाच्या अस्थिभंगाचे दर जशास तसेच आहे. ऑस्टिओपोरोसिसच्या सौम्य किंवा मध्यम अवस्थेतील रुग्णांसाठी हे आदर्श उपचार आहेत. या उपचाराबद्दल आणखी एक प्रोत्साहनदायक तथ्य म्हणजे याचे जवळजवळ कोणतेही ज्ञात दुष्परिणाम नाहीत. सोडिअम फ्लोराइडच्या विरोधात काय असावे कोण जाणे ज्याने त्याला अजुनही अन्न व औषध प्रशासनाची मान्यता नाही.
 • कॅल्शियम
  कॅल्शिअम हाडांच्या ताकदीसाठी सर्वात प्रसिद्ध खनिजांपैकी एक आहे. शरीर स्वतःचे कॅल्शिअम बनविण्यास अक्षम आहे. परंतु नियमित क्षतीग्रस्त होत गेल्यामुळे कॅल्शिअमचे आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. कॅल्शिअमची कमतरता असलेल्या लोकांची वाढ होते आहे आणि वृद्धांमधील याच्यावाढीमागे मुख्य कारण त्यांच्या शरिराची लैक्टोजनला प्रतिकार न करू शकण्याच्या  प्रवृत्तीत वाढ हे आहे. कॅल्शिअम पूरक घेतल्यामुळे सांगाड्याचे अस्थिवजन स्थिर राहत असल्याचे दिसते आणि दररोज सल्ला दिल्या गेल्याप्रमाणे मात्रा घेतल्यास हाडांच्या क्षतीचा दर कमी होतो.
 • डी जीवनसत्वे
  शरीरातील कॅल्शिअमचे शोषण वाढविण्यासाठी डी जीवनसत्वाची आवश्यकता आहे. डी जीवनसत्वाची अपुरी पातळी असलेल्या लोकांसाठी पूरके घेण्याचा सल्ला दिला जातो कारण हे रजोनिवृत्तीनंतरच्या चरणातील अस्थींचे क्षतीग्रस्त होणे थांबविते. मात्रा निरीक्षणाखाली घेणे आवश्यक आहे कारण अधिक प्रमाणात घेतले गेल्यास मळमळ होणे, हायपरकॅल्शेमिया होणे आणि मुतखडा होणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
 • व्यायाम करा
  योग्य देखरेखीखाली आणि डॉक्टरांच्या परवानगीने व्यायाम करणे अत्यंत उपयुक्त ठरते. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या लोकांसाठी बळकटी देणाऱ्या व्यायामांचे प्रशिक्षण घेणेसुचीतकेले जाते. यात बैठकामारणे,दंडबैठक करणे , डंबल उचलणे आणि प्रतिरोध पट्ट्याचा वापर करणे  समाविष्ट आहे. व्यायामाने शरीर मजबूत होते आणि अधिक लवचिक बनते, शारीरिक समन्वय सुधारतात आणि हाडांचे घनत्त्व वाढण्यात मदत होते.
Dr. Vivek Dahiya

Dr. Vivek Dahiya

ओर्थोपेडिक्स

Dr. Vipin Chand Tyagi

Dr. Vipin Chand Tyagi

ओर्थोपेडिक्स

Dr. Vineesh Mathur

Dr. Vineesh Mathur

ओर्थोपेडिक्स

हाडे ठिसूळ होणे साठी औषधे

हाडे ठिसूळ होणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
ZometaZometa 4 Mg Injection3311
GemcalGEMCAL 120ML LIQUID126
ZolephosZolephos 5 Mg Infusion2904
ZyclastinZyclastin 4 Mg Injection2477
ZyfossZyfoss 4 Mg Injection2346
AclastaAclasta 5 Mg Infusion16393
DronicadDronicad 4 Mg Injection2000
GemdronicGemdronic 5 Mg Infusion1904
LedronzolLedronzol 4 Mg Injection1096
WellboneWellbone 5 Mg Infusion0
XolnicXolnic 4 Mg Injection2000
ZolastaZolasta 4 Mg Injection332
NitraNitra Oral Solution36
ZoldaroZoldaro 4 Mg Injection1232
ZoldriaZoldria 4 Mg Injection2463
ZoledronZoledron 4 Mg Injection0
Calcitriol + Calcium Carbonate + ZincCalcium Carbonate 500 Mg + Calcitriol 0.25 Mcg + Zinc 7.5 Mg Tablet6
ZolestoZolesto 4 Mg Injection2000
ZoletrustZoletrust 4 Mg Injection1276
ZolfracZolfrac 5 Mg Injection2800
ZolonZolon 4 Mg Injection2480
ZorrentZorrent 4 Mg Injection749
ZyronaZyrona 5 Mg Infusion5200
BomastrenBomastren 750 Mg Injection10285

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Khadilkar AV, Mandlik RM. Epidemiology and treatment of osteoporosis in women: an Indian perspective. Int J Womens Health. 2015; 7: 841–850. Published online 2015 Oct 19. PMID: 26527900.
 2. Stanford Health Care [Internet]. Stanford Medicine, Stanford University; Osteoporosis
 3. Lucile Packard Foundation [Internet]. Stanford Health Care, Stanford Medicine, Stanford University. Pediatric Osteoporosis.
 4. National Osteoporosis Foundation I 251 18th St. S, Suite #630 I Arlington, VA 22202 I (800) 231-4222. Osteoporosis Fast Facts.
 5. Stanford Health Care [Internet]. Stanford Medicine, Stanford University; Osteoporosis Symptoms
 6. National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Diseases [Internet]. NIH Osteoporosis and related Bone diseases; National research center: National Institute of Health; Osteoporosis.
 7. Dobbs MB, Buckwalter J, Saltzman C. Osteoporosis: the increasing role of the orthopaedist. Iowa Orthop J. 1999;19:43-52. PMID: 10847516.
 8. Cummings SR, Rubin SM, Black D. The future of hip fractures in the United States. Numbers, costs, and potential effects of postmenopausal estrogen. Clin Orthop Relat Res. 1990 Mar;(252):163-6. PMID: 2302881.
 9. Prince RL, Smith M, Dick IM, Price RI, Webb PG, Henderson NK, Harris MM. Prevention of postmenopausal osteoporosis. A comparative study of exercise, calcium supplementation, and hormone-replacement therapy. N Engl J Med. 1991 Oct 24;325(17):1189-95. PMID: 1922205.
 10. Riggs BL, Hodgson SF, O'Fallon WM, Chao EY, Wahner HW, Muhs JM, Cedel SL, Melton LJ 3rd. Effect of fluoride treatment on the fracture rate in postmenopausal women with osteoporosis. N Engl J Med. 1990 Mar 22;322(12):802-9. PMID: 2407957.
 11. Tilyard MW, Spears GF, Thomson J, Dovey S. Treatment of postmenopausal osteoporosis with calcitriol or calcium. N Engl J Med. 1992 Feb 6;326(6):357-62. PMID: 1729617 .
 12. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Osteoporosis. Harvard University, Cambridge, Massachusetts.
और पढ़ें ...