गरोदरपणात उच्च रक्तदाब (हाय बीपी) - Gestational Hypertension in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 29, 2018

March 06, 2020

गरोदरपणात उच्च रक्तदाब
गरोदरपणात उच्च रक्तदाब

गर्भधारणे मधील उच्च रक्तदाब म्हणजे काय?

गर्भधारणेमधील उच्च रक्तदाब (रक्तदाब 140 एम एम एचजी पेक्षा जास्त) गर्भवती स्त्रीच्या (गर्भधारणेच्या 20 आठवडे आधी) लघवीमध्ये प्रोटीन आढळत नसताना 140/90 एम एम एचजी पेक्षा जास्त रक्तदाब असणे. गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर जर लघवीमध्ये प्रोटीन उच्च रक्तदाबासह आढळत असेल तर त्या स्थितीला प्रीक्लॅंपसिया म्हणतात.

याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?

गर्भधारणेमधील उच्च रक्तदाबाची चिन्हे व लक्षणे प्रत्येक गर्भवती स्त्री नुसार बदलतात, पण त्यातील सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:-

  • अचानक वजनात वाढ.
  • सूज (एडेमा).
  • जास्त काळ डोकेदुखी.
  • मळमळ व उलट्या.
  • कमी मूत्र विसर्जन.
  • पोटदुखी, पोटाच्या वरील उजव्या भागात दुखणे.
  • दृष्टी दोष, ज्यामध्ये अंधुक किंवा एक गोष्ट दोनदा दिसते.

याची प्रमुख कारणे कोणती आहेत?

गर्भधारणे मधील उच्च रक्तदाबाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:-

  • आधीच्या गर्भधारणेमधील उच्च रक्तदाब किंवा गर्भधारणेपूर्वी उच्च रक्तदाब.
  • वर्तमान स्थितीत मधुमेह व किडनी चा आजार.
  • आफ्रिकन किंवा अमेरिकन किंवा वयाने 20 पेक्षा लहान किंवा 40 पेक्षा जास्त.
  • जुळे किंवा तीन मुलांच्या गर्भधारणेच्या वेळेस

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

डॉक्टर आधी तुमच्या लक्षणांचा इतिहास जाणून घेतात, तसेच तुमचा रक्तदाब मोजला जातो. याचे कारण शोधण्यासाठी पुढील चाचण्या केल्या जातात.

  • वारंवार वजन व सूज तपासणे
  • रक्त तपासणी
  • मूत्र तपासणी प्रोटीन चे प्रमाण तपासण्यासाठी केली जाते.( प्रोटीन च्या उपलब्धतेवर किडनीच्या कार्यातील अडचणी समजू शकतात.)
  • यकृत व किडनी यांच्या कार्याच्या चाचण्या

गर्भाच्या आरोग्याची तपासणी खालीलप्रमाणे केली जाते:-

  • गर्भाच्या हालचाली च्या चाचणी मध्ये गर्भाच्या हालचाली चे परीक्षण व तपासणी केली जाते.
  • ताण विरहित चाचणी ही गर्भातील हालचालींनुसार बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी केली जाते.
  • अल्ट्रासाऊंड सह ताणविरहित चाचणी घेतली जाते, ज्यामुळे गर्भाची वाढ समजून घेणे सोपे होते.
  • डॉपलर फ्लो अल्ट्रासाऊंड हा एक अल्ट्रसाऊंड चाचणी चा प्रकार असून यामुळे रक्ताच्या शिरांमधून होणारा रक्तप्रवाह मोजू शकतो.

गर्भधारणेमधील उच्च रक्तदाबाचे उपचार खालीलप्रमाणे केले जातात:-

हे उपचार रुग्णाचा वैद्यकीय इतिहास व संपूर्ण आरोग्य लक्षात घेऊन डॉक्टरांकडून तयार केले जातात. प्राथमिक ध्येय हेच असते की स्थिती अजून बिघडू नये म्हणून प्रयत्न करणे व कॉम्पिकेशन्स टाळणे.

यासाठी खालील उपचार केले जातात:-

  • पूर्ण विश्रांती (घरी किंवा हॉस्पिटल मध्ये)
  • अँटी हायपर टेंसिव्ह औषधे देणे ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट किंवा इतर ड्रग्स असतात जी उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांमध्ये आढळतात.
  • गर्भधारणेमधील उच्च रक्तदाबाची बिघडणारी स्थिती किंवा प्रीक्लॅंपसिया ची स्थिती तयार होणे यासाठी वारंवार रक्त व मूत्र चाचण्या करणे.
  • फुफ्फुसांची अनियमित वाढ हे अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये दिसून येणारा विकार असू शकतो. फुफ्फुसांच्या वाढीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड औषधे वापरली जातात.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Viral gastroenteritis (stomach flu)
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Bacterial gastroenteritis
  3. Department for Health and Wellbeing. Viral gastroenteritis - including symptoms, treatment and prevention. Government of South Australia
  4. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Viral Gastroenteritis (“Stomach Flu”)
  5. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Gastroenteritis