myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

ग्रेव्हज डिझिज म्हणजे काय?

ग्रेव्हज डिझिज ही एक समस्या आहे ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि त्यामुळे थायरॉईड संप्रेरकाचे जास्त प्रमाणात उत्पादन होते. ही एक ऑटोइम्युन समस्या आहे ज्यात थायरॉईड-उत्तेजक इम्यूनोग्लोब्युलिन्स (टीएसआय) नामक अँटीबॉडीज असतात जे सामान्यतः परदेशी कणांविरुद्ध लढतात. ते थायरॉईड ग्रंथीच्या पेशींवर कार्य करतात आणि ज्यामुळे थायरॉईड संप्रेरकांच्या वाढीस कारणीभूत ठरतात.थायरॉईड ग्रंथी बटरफ्लाय आकाराचे असतात आणि आपल्या मानेच्या पुढच्या भागावर स्थित असतात.थायरॉईड ग्रंथीद्वारे सोडलेली संप्रेरके हे ऊर्जा आणि इतर अवयवांचे योग्य कार्य करण्यासाठी आवश्यक असतात.

भारतीय आकडेवारीनुसार, ग्रेव्हज डिझिज हा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

ग्रेव्हज डिझिजचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सुरुवातीला तुम्हाला लक्षणे हळूहळू जाणवतील किंवा ते अचानक दिसून येतील. ग्रेव्हज डिझिज चे सामान्य लक्षणे आहेत.

जर प्रतिकारशक्तीने डोळ्याच्या पेशींवर परिणाम केला असेल तर पुढील लक्षणांचा अनुभव येऊ शकतो.

दुर्मिळ अवस्थेत, गुडघ्याच्या खाली आणि कधीकधी पायाच्या  त्वचेवर जाड, लाल ठिपके दिसून येतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

हा एक ऑटोइम्युन रोग आहे जो आपल्या रक्तातील अँटीबॉडीज थायरॉईड पेशींना बांधायला कारणीभूत करतो आणि जास्त थायरॉईड हार्मोन तयार करतो. ही समस्या प्रामुख्याने 30-50 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अधिक दिसून येते. या समस्याचे अचूक कारण अज्ञात आहे.

ग्रेव्हज डिझिज विकसित होण्याची जोखीम वाढते जर आपण:

 • कुटुंबाच्या इतिहासात जर ग्रेव्हज डिझिज असेल.
 • धूम्रपान करणारा असेल.
 • गर्भवती असेल.
 • तणावग्रस्त असेल.
 • टाइप 1 मधुमेह मेलीटस असेल.
 • संधिवात असेल.

ग्रेव्हज डिझिजचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

गळ्यात कोणतीही सूज ओळखण्यासाठी तुमचे डॉक्टर सुरुवातीला शारीरिक तपासणी करतील आणि तुमच्या शरीरात थायरॉईड संप्रेरक (टी 3, टी 4, आणि टीएसएच) आणि अँटीबॉडीज (टीएसआय) च्या पातळीचा शोध घेण्यासाठी रक्त चाचणी करतील. एखाद्या विशिष्ट वेळी थायरॉईड ग्रंथी किती आयोडीन घेते हे शोधून काढण्यासाठी डॉक्टर रेडिओॲक्टिव्ह आयोडीन ॲपटेक टेस्ट (RAIU)  नावाची इमेजिंग चाचणी करण्यास सुचवू शकतात.

ग्रेव्हज डिझिजसाठी उपलब्ध उपचारांमध्ये अँटी-थायरॉईड सारखी औषधे, रेडिओआयोडीन थेरपी आणि थायरॉईड शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत. तुमच्या स्थितीनुसार तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी योग्य उपचार योजना निवडतील. थायरॉईड शस्त्रक्रिया हा एक शेवटचा पर्याय असतो जेव्हा तुम्ही गर्भवती असाल, लर्जी प्रतिक्रिया असेल, अँटी-थायरॉईड औषधाची साइड इफेक्ट्स झाला असेल किंवा तुमच्या ग्रंथी खूप मोठ्या झाल्या असतील.

आपल्या शरीरातील थायरॉईड पातळीची नियमितपणे देखरेख केल्याने या परिस्थितीच्या उपचारांची चांगली योजना बनविण्यास मदत होते.

 1. ग्रेव्ह्ज डिझिज साठी औषधे

ग्रेव्ह्ज डिझिज साठी औषधे

ग्रेव्ह्ज डिझिज के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
PTU खरीदें
SBL Ferrum sulphuricum Dilution खरीदें
Bjain Ephedra vulgaris Dilution खरीदें
Schwabe Grindelia Pentarkan खरीदें
Schwabe Ephedra vulgaris CH खरीदें
Methimercazole खरीदें
SBL Ephedra vulgaris Mother Tincture Q खरीदें
Bjain Ferrum sulphuricum Dilution खरीदें
Schwabe Ferrum sulphuricum CH खरीदें
Bjain Ephedra vulgaris Mother Tincture Q खरीदें
Methimez खरीदें
Schwabe Ephedra vulgaris MT खरीदें
SBL Ephedra vulgaris Dilution खरीदें

References

 1. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases. [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Graves' Disease
 2. American Thyroid Association. [Internet]. Leesburg, United States; 1923. Graves’ Disease.
 3. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Graves' disease.
 4. National Organization for Rare Disorders. [Internet]. Danbury; Graves’ Disease
 5. Usha V. Menon. Thyroid disorders in India: An epidemiological perspective. Indian J Endocrinol Metab. 2011 Jul; 15(Suppl2): S78–S81. PMID: 21966658.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें