हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा - Hidradenitis Suppurativa in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा
हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा

हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा म्हणजे काय?

हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा, यालाच ॲकेन इन्व्हरसा असेही म्हणतात, हा घामाच्या ग्रंथीत पू होण्याचा दुर्मिळ संसर्ग आहे. हा संसर्ग जुनाट, गंभीर आणि वारंवार होणारा आहे. ह्याची सुरवात फोडासारखे - उंचवट्यापासून होते, जे सामान्यपणे काखेत, जांघेजवळ किंवा गुदद्वाराजवळ होते.

याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहे?

  • सुरवातीचे चिन्हं आणि लक्षणं खालील प्रमाणे आहेत:
    • एक किंवा जास्त गाठी ज्या मुरुमांसारख्या दिसतात.
    • ह्या गाठी त्वचेवर तशाच राहणे किंवा निघून जाणे.
    • शरीरावर काही कॉमन जागा आहे जिथे त्वचा एकमेकांवर घासते, जसे काख, जांघ, गुदद्वाराजवळ, स्तने आणि मांड्याचा वरचा भाग.
  • उशिरा लक्षात येणाऱ्या खुणा आणि लक्षणे खालील प्रमाणे आहे:
    • मुरूम किंवा गाठी या वेदनादायक असू शकतात आणि ते बरे झाल्यानंतर परत होऊ शकतात.
    • कधीकधी मुरूम फुटून त्यामधून घाण वास येणारा द्रव पदार्थ बाहेर पडतो.
    • प्रभावित जागेवर च्या त्वचेवरील व्रण जाडसर होतात.
    • त्वचा मऊ बनते आणि त्वचेच्या आतपर्यंत बोगद्यासारखे आकार बनतात; साधारणपणे त्वचेच्या आत बोगद्याच्या दोन्ही टोकाला गाठी येतात.
    • गंभीर संसर्ग.
    • त्वचेचा कॅन्सर.

मुख्य कारण काय?

हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा होण्या मागचे मुख्य कारण अजूनही माहित नाही आहे. जीवाणू आणि इतर गोष्टी केसांच्या छिद्रामध्ये फसल्यामुळे ह्या रोगाची सुरवात होते.

अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक ही परिस्थीती होण्यास कारणीभूत आहेत.

धोकादायक घटक खालील प्रमाणे आहेत:

  • कमजोर इम्यून सिस्टिम.    
  • लठ्ठपणा .  
  • धूम्रपान.
  • लिथियम चे सेवन करणे.

याचे निदान आणि उपचार काय आहे?

हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा च्या निदानासाठी डॉक्टर वैद्यकीय माहिती घेतील आणि काळजीपूर्वक चिन्हं आणि लक्षणे तपासतील.

तपासणीमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • इतर संसर्ग झाला आहे त्याच्या निदानासाठी ब्लड टेस्ट करणे.
  • कापसाच्या बोळ्यावर पू घेऊन त्यात इतर संसर्ग झाला का याची चाचणी करणे.

तुमचे त्वचारोगतज्ञ उपचार करतांना लक्षणे लक्षात घेऊन काही वेदनानाशक आणि दाहनाशक औषधे देऊ शकतात.

तुमचे डॉक्टर स्टिरॉइड्स सोबत अँटिबायोटिक्स लिहून देऊ शकतात.

हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा च्या उपचारावर हार्मोनल उपचारपद्धती चा खूप फायदा होतो हे लक्षात आले आहे.

काही गंभीर केसेस मध्ये शस्त्रक्रिया करावी लागू शकते.



संदर्भ

  1. The Hidradenitis Suppurativa Foundation. The Hidradenitis Suppurativa Foundation, Inc. (HSF) is a 501(c)(3) nonprofit public benefit corporation, dedicated to improving research, education, and the quality of life and care for individuals and families affected by Hidradenitis Suppurativa (HS).. [Internet]
  2. National Institutes of Health. Hidradenitis suppurativa . U.S Department of Health and Human Services; [Internet]
  3. American Academy of Dermatology. Hidradenitis suppurativa. [Internet]
  4. Gregor Jemec, Jean Revuz, James J. Leyden. hidradenitis suppurativa. Springer Science & Business Media, 2006; 204 pages
  5. American Academy of Dermatology. Hidradenitis suppurativa. [Internet]

हायड्राडिनायटिस सुपरिटाइव्हा चे डॉक्टर

Dr. G Sowrabh Kulkarni Dr. G Sowrabh Kulkarni Orthopedics
1 Years of Experience
Dr. Shivanshu Mittal Dr. Shivanshu Mittal Orthopedics
10 Years of Experience
Dr. Saumya Agarwal Dr. Saumya Agarwal Orthopedics
9 Years of Experience
Dr Srinivas Bandam Dr Srinivas Bandam Orthopedics
2 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या