myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

ऑस्टियोमायलायटिस म्हणजे काय?

ऑस्टियोमियालाइटिस, हा हाडांचा संसर्ग, सामान्यतः जीवाणूमुळे होतो आणि तो अक्यूट किंवा क्रोनिक असू शकतो.या संक्रमणामुळे हाडांना सूज येते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

या अवस्थेचे प्राथमिक लक्षणे खालीलप्रमाणे आहेतः

 • हाडांमध्ये वेदना.
 • जास्त घाम येणे.
 • ताप.
 • थंडी.
 • अस्वस्थता.
 • सूज.
 • उबदार वाटणे.
 • संसर्गित क्षेत्रात वेदना.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

हाडांच्या संसर्गाचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जिवाणू. पण, हाडांचा संसर्ग बुरशी आणि इतर रोगाणूमुळे देखील होऊ शकतो. स्टॅफिलोकोकस ही ऑस्टियोमायलायटिस साठी कारणीभूत सामान्य प्रजाति आहे.

ऑस्टियोमायलायटिसमध्ये, जीवाणू संक्रमित त्वचा किंवा स्नायूंच्या माध्यमांतून जवळच्या हाडांमध्ये पसरू शकतात.

पण, काही वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामुळे ओस्टियोमायलायटिस होण्याचा धोका निर्माण होतो.

हे जोखीम घटक आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

या अवस्थेचे निदान करण्यासाठी अनेक चाचण्या वापरल्या जाऊ शकतात. या चाचण्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • हाडांची बायोप्सी.
 • सीटी स्कॅन, डीईएक्सए सारखे हाडांचे स्कॅन.
 • संक्रमित क्षेत्राचा एक्स रे.
 • लक्षणांची तपासणी.
 • पूर्ण रक्त गणना/कम्प्लिट ब्लड काउन्ट (सीबीसी).
 • हाडांचा एमआरआय.

हे परीक्षण एका हाडच्या संसर्गाची तीव्रता ठरवण्यात देखील मदत करतात.

ऑस्टियोमायलायटिसच्या उपचार पर्यायांमध्ये अँटीबायोटिक्सचा वापर करणे समाविष्ट आहे. ही औषधे जिवाणूपासून बचाव करण्यात मदत करतात ज्यामुळे संक्रमण होते. या अँटीबायोटिक्सचे परिणाम सुमारे 4-6 आठवड्यांनंतर दिसतात आणि संसर्गापासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी हे नियमितपणे घेणे आवश्यक आहे.

जर एन्टीबायोटिक्स कार्य करत नसेल आणि हाडांचे नुकसान तीव्र झाले आहे तर मृत अस्थीची ऊतक काढून टाकण्यासाठी आणि संक्रमण पसरण्यापासून प्रतिबंध करण्यासाठीं शस्त्रक्रिया आवश्यक असते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींना हाडांच्या संसर्गाचा होण्याचा जास्त धोका असतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये, जटिलता टाळण्यासाठी संक्रमित क्षेत्राचे विच्छेदन आवश्यक होऊ शकते. 

 1. ऑस्टियोमायलायटिस साठी औषधे

ऑस्टियोमायलायटिस साठी औषधे

ऑस्टियोमायलायटिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Blumox Ca खरीदें
Bactoclav खरीदें
Mega CV खरीदें
Erox Cv खरीदें
Moxclav खरीदें
Moxikind CV खरीदें
Cetil खरीदें
Pulmocef खरीदें
Omnikacin खरीदें
Clavam खरीदें
Altacef खरीदें
Advent खरीदें
Augmentin खरीदें
Clamp खरीदें
Ceftum Tablet खरीदें
Stafcure LZ खरीदें
Zocef खरीदें
Amicin Injection खरीदें
Mikacin Injection खरीदें
Zemox Cl खरीदें
Aceclave खरीदें
Cat Xp खरीदें
Camica खरीदें
Amox Cl खरीदें
Zoclav खरीदें

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Osteomyelitis
 2. National Center for Advancing and Translational Sciences. Osteomyelitis. Genetic and Rare Diseases Information Center
 3. National Health Portal [Internet] India; Osteomyelitis
 4. Momodu II, Savaliya V. Osteomyelitis. [Updated 2019 Apr 3]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Osteomyelitis
 6. healthdirect Australia. Osteomyelitis. Australian government: Department of Health
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें