शीघ्रपतन - Premature Ejaculation in Marathi

शीघ्रपतन
शीघ्रपतन

सारांश

शीघ्र वीर्यपतन एक लैंगिक अक्षमतेचे प्रकार आहे, ज्यामध्ये पुरुष लिंगाचा ताठरपणा कायम ठेवण्यास असमर्थ होतो, ज्यामुळे त्याचे संभोगापूर्वी आणि एका मिनिटांतच वीर्यपतन होते. या परिस्थितीमध्ये अमाप संकोच व तणाव निर्माण होऊन जोडीदारांच्या संबंधावर नकारात्मक प्रभाव पडू शकते. शीघ्र वीर्यपतन प्राथमिक(जीवनपर्यंत) किंवा दुय्यम( प्राप्त) असू शकतो. या परिस्थितीची कारणे शरीरशास्रीय, मानसशास्त्रीय किंवा जनुकीय असू शकतात. विभिन्न उपचारप्रणालींचे समायोजन उदा. तणाव व्यवस्थापन, औषधोपचार, मानसशास्त्रीय समुपदेशन आणि व्यायामाने परिस्थिती सुधारण्यास मदत होते. तीव्र समस्या असलेल्या लोकांना उपचाराच्या अभावाने अमाप तणाव होऊ शकतो. खूप वेळा, वीर्य योनीमध्ये प्रवेश करू शकत नसल्यामुळे, प्रजननक्षमतेच्या समस्या निर्माण होतात. मात्र, वैद्यकीय साहाय्य मिळवल्यानंतर, बहुतांश लोकांमध्ये शीघ्र वीर्यपतनाचे यशस्वी समाधान झालेले आहे.

शीघ्रपतन ची लक्षणे - Symptoms of Premature Ejaculation in Marathi

डीएसएम-5 प्रमाणें, व्यक्तीला पुढील लक्षणे असल्यास शीघ्र वीर्यपतन असल्याचे म्हटले जाते:

  • योनीमध्ये प्रवेश मिळवल्याच्या एका मिनिटाच्या आत पतन होणें.
  • सहा महिने किंवा अधिक काळ शीघ्र वीर्यपतनाची निरंतर परिस्थिती.
  • कमीत कमी 75% ते 100% वेळा शीघ्र वीर्यपतन होणें.
  • जोडीदारांमध्ये लैंगिक असंतोष, चिडचिड आणि ताणतणाव
  • अशा परिस्थितीला कारणीभूत ठरणारे मानसिक आजार किंवा वैद्यकीय परिस्थिती असणें.
  • भूतकाळात शीघ्र वीर्यपतनाला जवाबदार असलेल्या मादक पदार्थांचे किंवा काही औषधांचे सेवन करणें.

शीघ्रपतन चा उपचार - Treatment of Premature Ejaculation in Marathi

उपचाराच्या पर्यायांमध्ये समुपदेशन, औषधोपचार, व्यवहारतंत्र आणि सहज मिळणार्या भूलसदृश औषधांचेही समावेश आहे.

  • समुपदेश आणि संभोग उपचार
    समुपदेश म्हणजे समुपदेशकासोबत लैंगिक जीवनातील समस्यांबद्दल खुली व प्रामाणिक चर्चा. तुमचे डॉक्टर किंवा समुपदेशक प्रदर्शनसंबंधी चिंता व तणावाचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र व पद्धती सांगतील. संभोग उपचार व संबंध समुपदेश जोडीदारांना परत एकत्र आणू शकतात.
  • औषधोपचार
    वीर्यपतन उशिरा होण्यास साहाय्य करणारी विविध औषधे विहित केली जाऊ शकतात. यामध्ये विविध अवसादविरोधी, वेदनाशामक आणि फॉस्फोडायस्टीरेस-5 इन्हिबिटर सामील असतात. वीर्यपतन उशिरा होणें हे या औषधांचे सहप्रभाव आहे(पण यासाठीत त्यांना एफडीएची स्वीकृती मिळालेली नाही). तुमचे डॉक्टर, तुमच्या एकूण आरोग्याप्रमाणे, या औषधांना स्वतंत्रपणें किंवा काही औषधांच्या जोडीने विहित करू शकतात. स्वतःच्या मनाने औषधोपचार केल्यास, गंभीर समस्या निर्माण होत असल्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेणें टाळावे.
  • व्यवहारतंत्र
    अनेक लोकांमध्ये, व्यवहारामध्ये सामान्य बदल केल्यानेच शीघ्र वीर्यपतनाची समस्या सुटू शकते. योनीगत संभोग टाळून लैंगिक अंतरंगतेच्या इतर प्रकारांवर लक्ष दिल्याने लैंगिक प्रदर्शनसंबंधी तुमचा तणाव निघतो आणि याने खूप मदत होते. तुमचे डॉक्टर वीर्यपतनावर नियंत्रण मिळवण्यासाठी इतर पद्धतीही सुचवू शकतात.
  • सहज मिळणारी भूलसदृश औषधे
    तुमचे डॉक्टर भूलसदृश क्रीम व स्प्रे विहित करू शकतात, जे लिंगाला शिथिल करून अतीप्रतिक्रिया टाळतात व याद्वारे वीर्यपतनावर नियंत्रण आणतात. ही उत्पादने संभोगाच्या 10 ते 15 मिनिटांपूर्वी लावता येतात. यांपैकी काही स्प्रे सहज मिळतात, तर काहींना विहित करायची गरज असते. बहुतांश अशी औषधे शीघ्र वीर्यपतनात साहाय्य करत असली तरी, ही उत्पादने वापरल्यानंतर संवेदनशीलता हरपणें आणि स्त्री व पुरुष दोघांमधील आनंद घटणे इ. निदर्शनास आले आहेत.
  • व्यायाम
    ओटीपोटीच्या स्नायूंचे व्यायाम केल्याने वीर्यपतन उशिरा करण्याच्या क्षमतेत सुधार होऊ शकतात, कारण ओटीपोटीच्या अशक्त स्नायूंमुळेही शीघ्र वीर्यपतन होऊ शकते.
    • योग्य स्नायू ओळखणें
      संबंधित स्नायू ओळखण्यासाठी, धारेच्या मध्येच लघवी थांबवावी. हाच तो स्नायूओ आहे, ज्यामुळे वीर्यपतनावर नियंत्रण होतो. हे स्नायू अयोग्य वेळी अपानवायू सोडण्यास मदत करणारे स्नायूच असतात व शीघ्र वीर्यपतनातही उपयोगी पडतात.
    • स्नायूंना बळकट करणें
      तुमच्या ओटीपोटीतील स्नायू 3 ते 4 सेकंद संकुचित करावीत आणि मग त्यांना सोडावे. हे व्यायाम 4 ते 5 वेळा करावे. स्नायू बळकट झाल्यामुळे,दिवसांतून तीनदा यापासून सुरू करून 10 वेळा करण्यापर्यंत हे व्यायाम वाढवावे.
  • पॉस-स्क्वीझ पद्धत
    ही पद्धतसुद्धा शीघ्र वीर्यपतनात सहाय्य्क असते. नेहमीप्रमाणें फोरप्ले करा. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही ताठरपण्यावर ताबा ठेवू शकत नाही आणि वीर्यपतन होईल, तेव्हा तुमच्या जोडीदाराला लिंग जकडून तिथे धरण्यास सांगा, जिथे हेड ग्लॅंड शाफ्टला मिळतो. तिने वीर्यपतनाची आच जाईपर्यंत असे करावे. ही प्रक्रिया परत परत तोपर्यंत करावी, जोपर्यंत तुम्ही  वीर्यपतनाशिवाय तुमच्या जोडीदाराच्या योनीमध्ये प्रवेश करू शकत नाही. शेवटी, तुम्ही वीर्यपतनावर ताबा मिळवण्यास शिकाल व  वीर्यपतनावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राची गरज पडणार नाही.
  • निरोधांचे वापर
    एका जाड पदार्थापासून बनलेले निरोध वापरल्यास लिंगाची संवेदनशीलतेत उशीर होतो आणि परिणामी  वीर्यपतनावर नियंत्रण/विलंब साधता येतो. असे 'क्लायमेक्स कंट्रोल' निरोध काही देशांमध्ये सहज मिळतात. या निरोधांमध्ये संवेदनशीलतेत घट आणणारे व शिथिलता आणणारे पदार्थ असतात.

स्वकाळजी:

शीघ्र वीर्यपतनाचा लैंगिक जीवन व संबंधातील अंतरंगतेवर विपरीत परिणाम होऊन जोडीदारांमधील अंतर व ताण वाढतो. संशोधनाप्रमाणे दर 3 पैकी 1 पुरुष जीवनात कधी न कधी शीघ्र वीर्यपतनाचा अनुभव घेतात. बहुतांश अशा घटना एक-दोन वेळा घडतात आणि नंतर सगळेकाही सामान्य होते.

प्रदर्शनसंबंधी चिंता व तणाव समस्या बिघडवतात. त्यापेक्षा मनाला सैल सोडावे आणि लैंगिक अनुभवाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. तुमचे वीर्यपतन शीघ्र  होत  असल्यास, ताण टाळावे. नेहमी लक्षात ठेवावे की, तुमच्या जोडीदाराला संतुष्ट ठेवण्याच्या व अंतरंगता टिकून ठेवण्याच्या अनेक पद्धती असतात.तुम्हाला मदतीची गरज आहे असे वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात संकोच वाटून घेऊ नये.

जीवनशैली व्यवस्थापन

शीघ्र वीर्यपतन अनेक शरीरशास्रीय व मानसशास्त्रीय घटकांचा परिणाम असतो. तणाव व प्रदर्शनसंबंधी चिंता प्राप्त शीघ्र वीर्यपतनात महत्त्वाची भूमिका बजावतात. तणावाचे व्यवस्थापन करणें आणि जोडीदाराबरोबर मुक्त व प्रामाणिक संवाद केल्याने परिस्थितीत खूप आटोक्यात येते. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉयड समस्या आणि प्रोस्ट्रेट आजारासारख्या काही जीवनशैलीसंबधी रोगांमुळे परिस्थितीत भर पडते आणि या आजारांची काळजी घेतल्यास या समस्येचे निवारण व उपचार यास मदत मिळते.



संदर्भ

  1. Arie Parnham, Ege Can Serefoglu. Classification and definition of premature ejaculation. Transl Androl Urol. 2016 Aug; 5(4): 416–423. PMID: 27652214
  2. Dr Michael Lowy Premature Ejaculation. Healthy Male (Andrology Australia) May 2018; Auatralian Government; Department of Health
  3. Pekka Santtila, Patrick Jern, Lars Westberg, Hasse Walum, Christin T. Pedersen, Elias Eriksson, Nils Kenneth Sandnabba. The Dopamine Transporter Gene (DAT1) Polymorphism is Associated with Premature Ejaculation. 07 April 2010; Wiley Online Library
  4. Am Fam Physician. 2016 Nov 15;94(10):820-827. [Internet] American Academy of Family Physicians; Erectile Dysfunction.
  5. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Premature-ejaculation. Harvard University, Cambridge, Massachusetts.

शीघ्रपतन चे डॉक्टर

शीघ्रपतन साठी औषधे

Medicines listed below are available for शीघ्रपतन. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for शीघ्रपतन

Number of tests are available for शीघ्रपतन. We have listed commonly prescribed tests below: