myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी म्हणजे काय?

प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी म्हणजेच डिम्बग्रंथीचा प्राथमिक अपुरेपणा स्त्रियांमधील एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हार्मोनलचे असंतुलन आणि 40 वर्षापूर्वी मेनोपॉज होतो. अन्यथा, अकाली मेनोपॉज अगदी क्वचितच होते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

गर्भधारणा करण्यात असमर्थता ही प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असलेल्या व्यक्तीचे मुख्य आणि निश्चित लक्षण आहे, त्याव्यतिरिक्त इतर स्पष्ट चिन्हे आणि लक्षणे याप्रकारे आहेत:

 • अनियमित किंवा अनुपस्थित मासिक पाळी.
 • रात्रीच्या वेळी घाम येणे.
 • कमी होणारी सेक्स ड्राइव्ह.
 • संपूर्ण शरीरात उबदार वाटणे, याला हॉट फ्लॅशेस असेही म्हटले जाते.
 • अकारण चिडचिडेपणा आणि एकाग्रता कमी होणे.
 • डिम्बग्रंथीची भिंत पातळ होणे आणि गर्भधारणा किंवा सेक्स दरम्यान वेदना यामुळे योनी (योनिच्या ऊतींचे नुकसान किंवा नाश) हळुहळू नष्ट होत जाते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सीचे कारणं नैसर्गिक असू शकतात किंवा हे हार्मोनल असंतुलन किंवा अनुवांशिक विकृतीमुळे होऊ शकते. यापैकी काही मुख्य कारणांमुळे अशी स्थिती उद्भवलीः

 • टर्नर सिंड्रोम - या विकारात पेशींमध्ये एक्स गुणसूत्र संपूर्णपणे लोप पावतात किंवा अनुपस्थित असतात.
 • एक्स गुणसूत्राची असामान्यता - डिम्बग्रंथीच्या कार्यांमधील असमर्थता एक्स गुणसूत्रांच्या कोणत्याही असामान्यता किंवा लोप पावण्याशी संबंधित आहेत.
 • ऑटोसोमल डिसऑर्डर सारखे आनुवंशिक विकार जसे गॅलेक्टोसेमिया (गॅलेक्टोसचे चयापचय करणाऱ्या एंझाइमच्या अनुपस्थितीमुळे शरीरात गॅलेक्टोजचा संचय) आणि गोनाडोट्रोपिन रिसेप्टर डिसफंक्शन (सेक्स हार्मोन्सच्या रिसेप्टरचे डिसफंक्शन).
 • पर्यावरणातील विषारी पदर्धाच्या उपस्थितीमुळे किंवा अगदी धूम्रपानमूळे देखील प्रजननक्षमतेवर दुष्परिणाम होतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

चिकित्सक किंवा स्त्रीरोगतज्ज्ञ अयशस्वी गर्भधारणेच्या आधारावर अनेक निदान चाचणी सुचवू शकतात. डिम्बग्रंथि निकामी होणाचा संशय असल्यास काही परीक्षणे सुचवली जातात, जसे:

 • फॉलिकल स्टिम्युलेटींग हार्मोन टेस्ट (एफएसएच) - अकाली डिम्बग्रंथिच्या अपुरेपणाच्या स्थितींमध्ये, एफएसएचचे प्रमाण बरेच जास्त असते.
 • एस्ट्राडिऑल चाचणी - रक्तप्रवाहात एस्ट्राडिऑलची पातळी अकाली डिम्बग्रंथि अपुरेपणाच्या स्थितीत फारच कमी असल्याचे आढळून येतेअ.
 • कॅरियोटाइप - गुणसूत्रांचा अभ्यास करणे.
 • एफएमआर 1 जीनची चाचणी.

उपचाराचा मुख्य उद्देश शरीरामध्ये एस्ट्रोजेनचे उत्पादन करणे आहे, जे अखेरीस हॉट फ्लॅशेस आणि अनुपस्थित मासिक पाळीसारखे लक्षणे दूर करण्यात मदत करते. प्रोजेस्टेरॉनसह एस्ट्रोजेन देऊन गर्भाशयाचे अस्तर संरक्षित करण्यास मदत होते.

 1. प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी साठी औषधे

प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी साठी औषधे

प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Divigel खरीदें
Oestrogel खरीदें
E 2 खरीदें
Evolon खरीदें
Cameron खरीदें
Prostium E खरीदें
Femoston Tablet खरीदें
Femoston खरीदें
Emgra खरीदें
Endofert खरीदें
Endothik खरीदें
Enrifol खरीदें
Estrobuild खरीदें
Evadiol खरीदें
EV खरीदें
Myestra खरीदें
Rogen (Dahlia) खरीदें
Progynova Tablet खरीदें
Valest खरीदें
Carried खरीदें
Edval खरीदें

References

 1. Mahbod Ebrahimi, Firoozeh Akbari Asbagh. Pathogenesis and Causes of Premature Ovarian Failure: An Update . Int J Fertil Steril. 2011 Jul-Sep; 5(2): 54–65. PMID: 24963360
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Primary Ovarian Insufficiency
 3. Eunice Kennedy Shriver National Institute of Child Health and Human; National Health Service [Internet]. UK; Primary Ovarian Insufficiency (POI): Condition Information
 4. American College of Obstetricians and Gynecologists [Internet] Washington, DC; Primary Ovarian Insufficiency in Adolescents and Young Women
 5. Office on Women's Health [Internet] U.S. Department of Health and Human Services; Early or premature menopause.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें