myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

संवेदनशील दात म्हणजे काय?

दातांची संवेदनशीलता एक सामान्य दंत विकार आहे ज्यामुळे अस्वस्थता आणि दातदुखी होते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जर काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने आणि विशिष्ट तापमानाशी संपर्क यामुळे सौम्य ते तीव्र अस्वस्थता जाणवत असेल, तर तुमचे दात संवेदनशील असण्याची शक्यता आहे.विविध लोकांमध्ये सौम्य ते तीव्र लक्षणे दिसून येऊ शकतात आणि कधीकधी हे काही कारणाशिवाय होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

खालील ट्रीगर्सची प्रतिक्रिया म्हणून वेदना होऊ शकतात:

 • गरम किंवा थंड पेय.
 • थंड हवा.
 • थंड पाणी.
 • दात घासणे.
 • मिष्टान्न आणि गोड पेय.
 • अ‍ॅसिडिक खाद्यपदार्थ आणि पेय.

इनॅमल हा दाताचा सर्वात बाहेरचा थर आहे जो क्राउन च्या डेंटिनला कव्हर करतो. इनॅमल किंवा सिमेंटम ला नुकसान झाल्याने दात संवेदनशील बनतात.हे खालील कारणांमुळे होऊ शकते

 • खूप जोरात किंवा कडक ब्रिसल्स असलेल्या टूथब्रश ने दात घासणे.
 • पोटातील अ‍ॅसिडशी संपर्क (अ‍ॅसिड रिफ्लक्स रोग).
 • रात्री दात वाजवणे.
 • वारंवार अ‍ॅसिडिक खाद्यपदार्थ खाणे किंवा पेय पिणे.
 • फ्रॅक्चर झालेला दात.
 • जुने फिलिंग.
 • दात ब्लीच करणे.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

सामान्यतः रुग्ण स्वतः दातांच्या संवेदनशीलतेची तक्रार घेऊन कॅव्हिटीसाठी तपासायला डॉक्टर कडे जातो. दंतवैद्य इरोडेड इनॅमल किंवा सुजलेल्या हिरड्यांसाठी दातांची सखोल तपासणी करतात. पुढे गरम आणि थंड चाचणी करून डॉक्टर दातांच्या संवेदनशीलतेची पुष्टी करतात. तोडांचा एक्स रे काढून टूथ कॅरिजची शक्यता वगळली जाते.

फ्रॅक्चर झालेल्या फिलिंग्सला आणि कॅरियस लीजन्स साठी व्यवस्थित पुनर्वसन करावे लागते. इरोडेड इनॅमल चे उपचार सेंसेटिव्ह टूथपेस्ट वापरून किंवा फ्लोराइड वॉर्निश वापरून केले जातात.

जर कॅव्हिटी खोलवर असेल किंवा पल्प दिसून येत असेल, तर थंड आणि गरम अन्नाची तिशीव्र संवेदनशीलता दिसून येते. यावर उपाय म्हणजे रूट कॅनल.

हिरड्यांचा आजार असल्यास सेंसटिव्ह माउथवॉश वापरून उपचार केले जातात.

 

 1. संवेदनशील दात साठी औषधे

संवेदनशील दात साठी औषधे

संवेदनशील दात के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
NitraNitra Oral Solution46.0
TriguardTriguard 0.2% Mouth Wash39.5

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...