खांदा निखळणे - Separated Shoulder in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

खांदा निखळणे
खांदा निखळणे

खांदा निखळणे काय आहे?

खांदा निखळणे म्हणजे कॉलरबोन (क्लेव्हिकल) आणि खांद्याचे टोक (अँक्रियन) च्या भागाच्या दरम्यान असलेले अस्थिबंधन फाटणे किंवा दुखापत होणे. याची प्रकरणे अस्थिबंधनात सौम्य ताणापासून ते अस्थिबंधन फाटेपर्यंत वेगवेगळी असू शकतात. हे सहसा खांद्याचे टोक आणि कॉलरबोन एकमेकांपासून वेगळे झाल्यामुळे होते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

खांदा निखळण्याची चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

  • दुखापत झाल्यास सांध्यामध्ये वेदना दीर्घकाळ राहते.
  • प्रभावित बाजूला हात वळवण्यास अडचण होते.
  • सांध्यामध्ये सूज आणि जखम.
  • नाजूकपणा.
  • कॉलरबोनची बाह्य बाजू विस्थापित दिसू शकते.
  • प्रभावित भागात टेंगूळ किंवा विकृती.

याची मुख्य कारणं काय आहेत?

खांद्याला जोरात धक्का लागून किंवा खांद्यावर जड वस्तू पडून, कार दुर्घटना किंवा खेळामध्ये दुखापत झाल्यामुळे खांदा निखळणे सर्वात सामान्य आहे.

धोक्याच्या घटकांमध्ये फुटबॉल, हॉकी, स्कीइंग, व्हॉलीबॉल आणि जिम्नॅस्टिकसारख्या खेळांचा समावेश होतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक परीक्षा खांदा निखळण्याचे निदान करण्यात मदत करते; पण, सौम्य प्रभावाच्या दुखापती केवळ एक्स-रे द्वारे शोधल्या जाऊ शकतात.

तपासण्यांमध्ये खालील चाचण्यांचा समावेश होतो:

  • एक्स-रे.
  • एमआरआय.
  • अल्ट्रासोनोग्राफी.

प्रभावित बाजूच्या हातात वजन धरून ठेवल्यास त्रास होतो आणि त्यामुळे निदान पुष्टी करण्यात मदत होते.

निखळलेल्या खांद्याचा उपचार दुखापतीच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.

डॉक्टर लक्षणाच्या उपायांसाठी ॲनल्जेसिक्सचा सल्ला देऊ शकतात. कोणतीही हालचाल प्रतिबंधित करण्यासाठी नैसर्गिकरित्या घाव भरून निघण्यासाठी प्रभावित भागाला बांधून ठेवले जाते. दुखापतीच्या तीव्रतेनुसार काही आठवड्यांसाठी हालचाली प्रतिबंधित केल्या जातात.

त्यानंतर ताठरपणा कमी करण्यासाठी आणि हालचालीत सुधारणा आणण्यासाठी फिजियोथेरपी केली जाते.

उपचारानंतर 8 ते 12 आठवडे कोणत्याही जड वस्तू उचलणे काटेकोरपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

गंभीर प्रकरणांमध्ये जसे हाडे विस्थापित होणे साठी शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.

स्वतः घेण्याची काळजी :

  • कोणत्याही शारीरिक कष्टाच्या क्रिया टाळा.
  • तुमच्या खांद्याला जास्तीत जास्त विश्रांती देणे आवश्यक आहे.
  • थंड शेक दिल्याने वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

 



संदर्भ

  1. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Shoulder Separation.
  2. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Separated Shoulder
  3. University of Michigan, Michigan, United States [Internet] Shoulder Separation
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Shoulder separation - aftercare
  5. HealthLink BC [Internet] British Columbia; Shoulder Separation