myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

धूम्रपानाचे व्यसन म्हणजे काय?

धूम्रपान करण्याचे व्यसन हे धूम्रपानावरील शारीरिक निर्भरता आहे,  जे बऱ्याच काळापासून चालू राहिल्यास होते. संशोधनातून असे कळते की, जी व्यक्ती जीवनात लवकर धूम्रपान सुरू करते त्या व्यक्तीत व्यसन होण्याचा अधिक धोका असतो. असे आढळून आले आहे की केवळ 6% धूम्रपान करणारे यशस्वीरित्या धूम्रपान सोडू शकले आहेत.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जरी धूम्रपान करणाऱ्याला धूम्रपान करण्यामुळे आधीपेक्षा शांत वाटते, पण यामुळे खोकला, फुफ्फुसाचा संसर्ग, कर्करोग आणि मृत्यू यांसारख्या अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. कोणत्याही व्यसनाप्रमाणे, जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा खालीलप्रमाणे लक्षणे दिसू शकतात:

 • असामान्य उदासीनता.
 • राग येणे किंवा चिडचिड होणे.
 • लक्ष केंद्रित करण्याची अक्षमता.
 • हार्ट रेट कमी होणे.
 • वाढलेली भूक आणि वजन वाढणे.
 • अनिद्रा.

याची मुख्य कारणं काय आहेत?

धूम्रपानाचे व्यसन बहुधा मानसिक आणि भावनिक अशांतीशी संबंधित असते. काहीजण तणाव टाळण्यासाठी धूम्रपान करतात, इतर काही सहकर्मचाऱ्यांच्या दबावामुळे करतात. एकदा धुम्रपानाची सुरुवात झाली, की शरीराला निकोटिनचे व्यसन लागते आणि जास्त प्रमाणात गरज भासते यामुळे धूम्रपान करणे वाढते. अशा प्रकारे, शारीरिक आणि भावनात्मकपणे अवलंबन वाढते आणि व्यक्ती व्यसनाधीन बनते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रुग्णाचा इतिहास आणि धूम्रपान व्यसनाच्या लक्षणांबद्दल विचारून डॉक्टर धूम्रपानाच्या व्यसनाचे निदान करतात. रक्त तपासणी केली जाते आणि निकोटिनची पातळी मोजली जाते. मूत्र, लाळ आणि केसांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले जातात.

उपचार:

व्यसनाचे चक्र तोडण्यासाठी विविध एफडीए-मान्यताप्राप्त उपचार उपलब्ध आहेत. निकोटिन रिप्लेसमेंट  थेरपी, यात डॉक्टर गम्स किंवा पॅचेस लिहून देतात, यामुळे धुम्रपानावरील अवलंब बंद होते.

वैद्यकीय उपचारांसारख्या काही गैर-औषधीय पद्धती जसे बिहेविअरल थेरपी देखील धूम्रपान सोडण्यात मदत करू शकते. स्वतःला व्यस्त ठेवून चेन तोडण्यास आणि धूम्रपान व्यसनातून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. कॉउंसिलिंगद्वारे तणाव योग्यप्रकारे कसा हाताळावा, हे शिकून मदत मिळू शकते.

 1. धूम्रपानाचे व्यसन साठी औषधे
 2. धूम्रपानाचे व्यसन चे डॉक्टर
Dr. Anil Kumar Kumawat

Dr. Anil Kumar Kumawat

Psychiatry
5 वर्षों का अनुभव

Dr. Dharamdeep Singh

Dr. Dharamdeep Singh

Psychiatry
6 वर्षों का अनुभव

Dr. Ajay Kumar

Dr. Ajay Kumar

Psychiatry
14 वर्षों का अनुभव

Dr. Saurabh Mehrotra

Dr. Saurabh Mehrotra

Psychiatry
24 वर्षों का अनुभव

धूम्रपानाचे व्यसन साठी औषधे

धूम्रपानाचे व्यसन के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Nicotex खरीदें
Nicomel TZ खरीदें
2BACONIL TTS 30 N7 21MG TABLET खरीदें
Frenquit खरीदें
Niclonz खरीदें
Nicogum खरीदें
Nicorette खरीदें
Nicotex Mint Plus Chewing Gum खरीदें
Nicotine Polacrilex खरीदें
Nulife खरीदें
Quitsure खरीदें
Goodkha खरीदें
Kwiknic खरीदें
Smoke Free खरीदें
Nicotex Patch खरीदें
2 Baconil Nicotine Gum खरीदें
Champix खरीदें
Kwitz खरीदें
Atydep खरीदें
Bulet खरीदें
Bupep खरीदें
Bupraset खरीदें
Bupron SR खरीदें

References

 1. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; Why People Start Smoking and Why It’s Hard to Stop?.
 2. American Association of Clinical Chemistry. [Internet] United States; Nicotine and Cotinine.
 3. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Reasons People Smoke.
 4. National Institutes on Drug Abuse. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; What are treatments for tobacco dependence?.
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Quitting Smoking.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें