एच आय व्ही एड्स - in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

December 14, 2018

March 06, 2020

एच आय व्ही एड्स
एच आय व्ही एड्स

सारांश

एचआयव्ही म्हणजे ह्युमन इम्युनोडिफेशिअन्सी वायरस, ज्यामुळे एड्स अर्थात् अक्वायर्ड इम्युनोडिफेशिअन्सी सिंड्रोम होतो. हा विषाणू सामान्यपणें, लैंगिक संबंधांतून शरिरातील द्रव्यांच्या आदानप्रदानाने, संक्रमित सूईद्वारे रक्तामार्फत किंवा एखाद्या संक्रमित गरोदर आईकडून बाळामध्ये पसरतो. विषाणू प्रतिरोधप्रणालीला बाधित करून शरिराच्या सुरक्षाव्यवस्थेलाच तोडून टाकतो आणि संक्रमित व्यक्तीला इतर संक्रमण आणि रोगांचा धोका वाढतो. विषाणूचे दोन प्रकार आहेत, एचआयव्ही-1 आणि एचआयव्ही -2. आजार तीव्रपासून घातक टप्प्यात जातो, आणि शेवटी एड्स होतो, ज्यामध्ये जीवनाची अपेक्षा कमी असते. पहिल्या टप्प्यात फ्लूसारखी लक्षणे असतात, तर दुसर्र्या टप्प्यात लक्षणे अधिक बिघडतात आणि शेवटी तिसर्र्या टप्प्यात कर्करोग व अवयव निकामी पडण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. मादक पदार्थांचे सेवन करणारी, असुरक्षित संभोग करणारी व सुंता नसलेल्या व्यक्तींना एचआयव्हीची लागण होण्याचा अधिक धोका असतो.

रक्तचाचण्या आणि काही घरगुती चाचण्यांनी परिस्थितीचे निदान होण्यात साहाय्य होतो, पण परिणामाची पुष्टी करण्यासाठी त्यांनंतर व्हेस्टर्न ब्लॉट चाचणी केलीच पाहिजे. एचआयव्ही/एड्सवर काहीच उपचार नाही, पण एंटीरेट्रोव्हायरल थेरपीने भरपूर नियंत्रण मिळवता येते. एचआयव्हीची बहुतांश औषधे इन्हिबिटर असतात, जे विषाणू दुप्पट होण्यास साहाय्य करणार्र्या विशिष्ट प्रथिनांचे उत्पादन टाळते, आणि इतर औषधे विषाणूला सीडी4 नावाच्या विशेष प्रतिरोध कोशिकांमध्ये प्रवेश करू देत नाही, ज्यांच्या माध्यमातून विषाणू व्यक्तीच्या प्रतिरोधाच्या गर्भावर प्रभाव पाडू शकतात. आहारामध्ये काही परिवर्तन आणि उपचार प्राप्त करणें व मानसिक व शारीरिक तणावाला सामोरे जाण्यातील कुटुंबाचे साहाय्य यांद्वारे, परिस्थिती बरी हाताळता येते. उपचाराचे सहप्रभाव आणि संलग्न रोगांसारख्या अनेक गुंतागुंती असू शकतात, ज्यामुळे तिसर्र्या टप्प्यात अशक्त प्रतिरोधप्रणाली आणि कर्करोगांसारखे परिणाम होतात. वेळीच उपचार केल्यास, एचआयव्ही असलेले लोक संक्रमणासह सक्रीय जीवन 50 वर्षांपर्यंत जगू शकतात, तर एड्स असलेल्या लोकांचे अपेक्षित आयुर्मान 10 वर्षांपर्यंत असते.

एच आय व्ही एड्स ची लक्षणे - Symptoms of HIV-AIDS in Marathi

एचआयव्ही संक्रमणाची लक्षणे आजाराच्या टप्प्याप्रमाणे वेगवेगळी असतात. उदा.:

तीव्र एचआयव्ही संक्रमण

संक्रमण झाल्याच्या पहिल्या चार आठवड्यांमध्ये, तीव्र टप्प्यात पुढील लक्षणे दिसू शकतात:

या टप्प्यातील लक्षणे काही वेळानंतर कमी होतात.

घातक एचआयव्ही संक्रमण

या टप्प्यामध्ये, तीव्र टप्प्यातील लक्षणे शमायला सुरवात होते, पण व्यक्ती अजूनही संक्रमणाला संग्राहक असतो. या टप्प्यात व विशेषकरून शेवटी, विषाणू सीडी4 कोशिकांवर हल्ला करतात आणि शेवटी, विषाणू खूप शक्तिशाली होऊन सीडी4 कोशिकांची संख्या घटते. व्यक्ती तिसर्र्या आणि शेवटच्या टप्प्याकडे जात असतांना, लक्षणांमध्ये वाढ होते.

एड्स

या टप्प्यात शरीर सर्वांत अशक्त असतो. अनेक अवसरात्मक संक्रमण प्रकट व्हायला सुरु होते. हे संक्रमण संक्रमित व्यक्तीच्या अशक्त झालेल्या प्रतिरोधप्रणालीमुळे होतात आणि त्यांपैकी अनेकांची लक्षणे एचआयव्ही नसलेल्या निरोगी व्यक्तीत दिसत नाहीत. यांपैकी काही संक्रमणे खालीलप्रमाणे:

एच आय व्ही एड्स चा उपचार - Treatment of HIV-AIDS in Marathi

एचआयव्ही संक्रमण आणि एड्स अशा दोघांवरही काहीच उपचार नसल्यामुळे, उपचाराचे लक्ष विषाणूवर नियंत्रण आणून, परिस्थिती बिघडण्यापासून रोखणें यावर केंद्रित असते. या प्रकारच्या पद्धतीला एंट्रीरेट्रोव्हायरल थेरपी म्हणतात, ज्यामध्ये विशेषकरून विषाणू व त्याचे कार्य आटोक्यात आणण्यासाठीच्या विविध औषधांचे समायोजन असते.या प्रक्रियेला सहाय्यक औषधोपचार आहेत:

 • नॉन-न्युक्लिओसाइड रिव्हर्स ट्रांस्क्रिप्टेस इन्हिबिटर्स( एनएनआरटी) अशी औषधे असतात, जे काही प्रथिनांचे उत्पादन नाहीसे करण्यात साहाय्य करतात. ते एचआयव्हीला दुप्पट होण्यासाठी हवे असतात.
 • प्रोटीस इन्हिबिटर्स( एनएनआरटी) अशी औषधे असतात, जे प्रोटीस नावाच्या प्रथिनाचे उत्पादन नाहीसे करण्यात साहाय्य करतात.तेही एचआयव्हीला दुप्पट होण्यासाठी हवे असतात.
 • फ्युझन इन्हिबिटर नावाची औषधे एचआयव्हीला सीडी4 कोशिकांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखून सीडी4 कोशिकांची संख्या तशीच ठेवतात.
 • इंटिग्रेस इन्हिबिटर नावाची औषधे, इंटिग्रेस नावाचे एक आवश्यक प्रथिन नियंत्रणात ठेवून एचआयव्हीमधील जनुकीय पदार्थाला सीडी4 कोशिकांत मिश्रण होण्यापासून रोखतात.

जीवनशैली व्यवस्थापन

एचआयव्ही संक्रमण/एड्ससाठी उपचार घेत असलेल्यांना मित्र आणि कुटुंबापासून खूप मदत हवी असते. उपचार दीर्घकालिक आणि थकाऊ असल्याने, या लोकांना अशा प्रकारची मदत हवी असू शकते:

 • आरोग्य सोयीच्या ठिकाणापर्यंत आणि तेथून प्रवास.
 • आर्थिक साहाय्य
 • रोजगारसंबंधी साहाय्य .
 • कायदेशीर साहाय्य.
 • स्वतःची व बाळाची निगा.
 • मित्र, कुटुंब व समाजाकडून भावनात्मक आधार व स्वीकार.

जीवनशैली बदलांमध्ये मादक पदार्थ व मद्यपान सोडणें आणि निरोगी खाण्याच्या सवयी लावणें सामील आहे. खाण्याच्या निवडी अशा असाव्यात:

 • अधिक फळे, भाज्या व धान्य खाणें.
 • अंडी व कच्चे मांस, आणि अन्नप्रसारित संक्रमण लागण्याची शक्यता वाढवणारे खाद्यपदार्थ टाळणें. शक्य तेवढे शिजवलेले पदार्थ घ्यावेत.
 • वेळेवर उपचार घेणें.
 • प्रतिरोध सशक्त करण्यासाठी पर्यायी उपचार घेणें.
 • संभाव्य संक्रमणाची चाहूल लागताच त्वरीत वैद्यकीय साहाय्य घेणें, कारण संक्रमण वाढतात आणि एचआयव्ही संक्रमण असलेल्या लोकांमध्ये झपाट्याने असाध्य होतात.


संदर्भ

 1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; HIV/AIDS
 2. University of California San Francisco [Internet]. San Francisco, CA: Department of medicine; Superinfection
 3. National Institutes of Health; Office of Dietary Supplements. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; HIV Overview.
 4. Ferri FF. Ferri's Clinical Advisor 2018. In: Ferri's Clinical Advisor 2018. Philadelphia, Pa: Elsevier; 2018.
 5. National Institutes of Health; Office of Dietary Supplements. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; USPHS/IDSA Guidelines for the Prevention of Opportunistic Infections in Persons Infected with Human Immunodeficiency Virus.

एच आय व्ही एड्स साठी औषधे

एच आय व्ही एड्स के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।