अब्सेंस सीझर - Absence Seizures in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 19, 2018

March 06, 2020

अब्सेंस सीझर
अब्सेंस सीझर

अबसेन्स सीझर म्हणजे काय?

अबसेन्स सीझर म्हणजे थोड्या काळासाठी अचानक भान किंवा शुद्ध हरपून एकटक पाहत राहणे.

अबसेन्स सीझर साधरणतः 15 सेकंद राहतो आणि ह्या वेळेत मनुष्य भावनाशून्य एकटक बघत राहतो असे वाटते (म्हणूनच याला स्टेअरिंग स्पेल्स देखील म्हणतात). काही क्षणानंतर, मनुष्य पुन्हा भानावर येऊन सतर्क होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

भावनाशून्य होऊन टक लावून पाहत राहणे अबसेन्स सीझरचे पहिले लक्षण आहे. पण, हे अनवधानाने केल्या जाते आणि व्यक्तीला त्याची जाणीव नसते. अबसेन्स सीझरचे इतर लक्षणे खालील प्रमाणे आहेत :

  • पापण्या फडफडणे.
  • बोटं चोळणे.
  • हातांनी लहान हालचाली करणे.
  • वारंवार चघळण्याची क्रिया करणे किंवा ओठ चाटणे.
  • 10-20 सेकंदासाठी एकटक पाहत राहणे.

सीझर अनुभवतांना व्यक्ती करत असलेले काम अचानक बंद करतो, जसे:

  • अचानक चालणे थांबवून काही सेकंदांनी पुन्हा चालायला लागतो.
  • बोलता बोलता अचानक अर्ध्या वाक्यात थांबून काही सेकंदांनी पुन्हा बोलायला लागतो.

सीझर अनुभवल्यानंतर , व्यक्ती लगेच सतर्क होतो आणि त्याला सीझर आला होता ह्याची जाणीव नसते. सीझर माणसाला गोंधळवत नाही. अबसेन्स सीझरचा दौरा आल्यावर माणूस सहसा पडत नाही.

काही व्यक्तींना एका दिवसात अनेक वेळा अबसेन्स सीझरचे दौरे येऊ शकतात. मुलांमध्ये अबसेन्स सीझरचे लक्षणे शाळेच्या कामगिरीमध्ये व्यत्यय आणू शकते. खरं तर अबसेन्स सीझरला डेड्रीमिंग किंवा लक्ष वेधून घेणे समजले जाऊ शकते.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

अबसेन्स सीझर मेंदूमधील असाधारण क्रियाकलापांच्या परिणामास्तव होते. आपल्या मेंदूतील पेशी विद्युत आवेग आणि रासायनिक सिग्नलद्वारे संवाद साधतात. अबसेन्स सीझर नसल्यास या विद्युतीय सिग्नल्सची वारंवार पुनरावृत्ती होते. अनुवांशिक कारणामुळे देखील अबसेन्स सीझर होऊ शकते. अबसेन्स सीझरचा चा धोका वाढवणारे इतर घटक खालील प्रमाणे आहे: 

  • आकुंचनासाठी फेनिटोइन आणि कार्बामाझेपीनसारखे औषधं.
  • वेगवान आणि उथळ श्वसनक्रिया किंवा हायपरव्हेन्टिलेशन.
  • फ्लॅश लाइट मारणे.

मुलांमध्ये अनुवांशिक कारणामुळे ही स्थिती बघितली जाऊ शकते. 4-14 वर्षांच्या वयोगटातील मुलांमध्ये अबसेन्स सीझर होण्याची शक्यता अधिक असते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

अबसेन्स सीझरची साधारणपणे वैद्यकीय समस्या म्हणून नोंद नसल्यामुळे औपचारिक निदान करण्यास बरेचदा विलंब होतो. खालील चाचण्यांचा वापर अबसेन्स सीझरच्या निदानासाठी केला जाऊ शकतो:

  • सीझरचे इतर रोगजनक कारण शोधण्यासाठी ब्लड टेस्ट.
  • मेंदूतील विकृती शोधण्यासाठी एमआरआय आणि सीटी स्कॅन. 
  • मेंदूतील विद्युत क्रिया तपासण्यासाठी इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ईईजी).

अबसेन्स सीझरच्या उपचारामध्ये अँटी-सीझर औषधं दिली जातात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, जीवनशैलीतील बदल सीझरचा सामना करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, मुलांच्या बाबतीत, शिक्षकांना मुलाच्या स्थितीबद्दल माहिती देणे उपयुक्त ठरू शकते. खूप दुर्लभ प्रकरणांमध्ये, सीझरची पुनरावृत्ती कमी करण्याकरीता शस्त्रक्रियांची गरज भासू शकते.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Absence seizure
  2. Johns Hopkins Medicine [Internet]. The Johns Hopkins University, The Johns Hopkins Hospital, and Johns Hopkins Health System; Absence Seizures
  3. Ewa Posner. Absence seizures in children. BMJ Clin Evid. 2008; 2008: 0317. PMID: 19450342
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Types of Seizures
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Seizures