अटोपिक डर्माटायटीस - Atopic Dermatitis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS

November 27, 2018

March 06, 2020

कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो
अटोपिक डर्माटायटीस
सुनिए कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

अटोपिक डर्माटायटीस काय आहे?

अटोपिक डर्माटायटीस ज्याला एक्झीमा (गजकर्ण) म्हणून पण ओळखले जाते एक सामान्य त्वचेचा आजार आहे ज्यामध्ये त्वचेला खाज सुटते किंवा खवल्या येतात. हा प्रौढांपेक्षा लहान मुलांना होण्याची शक्यता जास्त असते. हा नवजात मुलांमध्ये म्हणजे आयुष्याच्या सुरवातीच्या 6 महिन्यांमध्ये दिसणारा विकार आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • वैद्यकीयदृष्ट्या एक्झीमा (गजकर्णाची) लक्षणं प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात पण यात विशेषत: त्वचा कोरडी पडते आणि लाल होऊन खूप खाजवते.
 • त्वचा खाजवल्याने तिथे जळजळ होते किंवा तिथून रक्त येते.
 • क्वचित जर त्यामध्ये पस असला तर तो फुटून बाहेर येतो जो एका संसर्गाचा संकेत आहे. जर संसर्ग असेल तर तो शरीरातील इतर अवयवांना देखील होऊ शकतो.
 • बाकी लक्षणांमध्ये त्वचेवरील रॅशेस मध्ये द्रव भरलेले असते किंवा सुरकुत्या आलेल्या असतात. या परिस्थितीमध्ये डोळे आणि ओठांभोवतीचा भाग गडद होतो.
 • रात्रीच्यावेळी जास्त खाजवू शकते ज्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो.
 • एक्झीमा (गजकर्णाच्या) तीव्र परस्थिती मध्ये त्यासोबत तुम्हाला अस्थमा, पराग ज्वर किंवा इतर ॲलर्जी होऊ शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

 • जरी यासाठी एक कारण नसलं तरी गजकर्णाला ट्रिगर करणारे बरेच घटक आहेत.
 • यासाठी अनुवांशिक दुवा असू शकतो ज्यामध्ये कुटुंबातील अनेक सदस्यांना हा आजार असू शकतो अशी संशोधकांची मान्यता आहे.
 • ज्या वातावरणात खूप प्रदूषण किंवा खूप शुश्क आणि थंड असेल तिथे हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.
 • विशिष्ट अन्नपदार्थाची ॲलर्जी, पराग कण, लोकरीचे कपडे, धूळ, त्वचेची उत्पादने आणि तंबाकूचा धूर. ही गजकर्णाला ट्रिगर करणारे इतर घटक असू शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • एक त्वचारोगतज्ञ एक्झीमासाठी त्वचेची तपासणी करतात. यात सामन्यतः त्वचा लाल,शुष्क बनते आणि त्यावर खाज सुटते.
 • सामान्यतः वैद्यकीय दृष्ट्या या स्थानिक विकाराचे निदान करता येत असल्यामुळे कुठल्याही रक्त तपासणी किंवा इमेजिंगची गरज नसते.
 • जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला इतर लक्षणांसोबत सतत ताप असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला रक्त तपासणी करायला लावतील.
 • जरी हा आजार पूर्णपणे बरा करता आला नाही तरी ॲन्टी-हिस्टामाइन्स, ॲन्टीबायोटिक्स आणि स्टेरॉइड्स क्रिम च्या वापाराने तुम्हाला आराम मिळू शकेल.
 • या आजाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तुम्ही काही सावधगिरी बाळगली पाहिजे जसे की आजार कशामुळे ट्रिगर होतो ते ओळखून ते टाळणे, साबण आणि इतर त्वचेची उत्पादने वापरताना ते तपासणे आणि प्रत्येकवेळेस स्वच्छता पाळणे.
 • अंघोळ झाल्यावर तुमच्या मुलांचे अंग व्यवस्थित कोरडे करुन त्याला दिवसातून कमीत कमी दोनदा मॉइस्चराइझ करा.संदर्भ

 1. David Boothe W, Tarbox JA, Tarbox MB. Atopic Dermatitis: Pathophysiology. Adv Exp Med Biol. 2017;1027:21-37. PMID: 29063428
 2. Journal of Clinical Investigation. New insights into atopic dermatitis. American Society for Clinical Investigation. [internet].
 3. National institute of allergy and infectious diseases. Eczema (Atopic Dermatitis). National Institutes of Health. [internet].
 4. National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Diseases. Atopic Dermatitis. U.S. Department of Health and Human Services Public Health Service.
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Atopic Dermatitis

अटोपिक डर्माटायटीस साठी औषधे

अटोपिक डर्माटायटीस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

दवा का नाम

कीमत

₹97.3

20% छूट + 5% कैशबैक


₹99.57

20% छूट + 5% कैशबैक


₹347.83

20% छूट + 5% कैशबैक


₹144.84

20% छूट + 5% कैशबैक


₹211.0

20% छूट + 5% कैशबैक


₹93.34

20% छूट + 5% कैशबैक


₹301.0

20% छूट + 5% कैशबैक


₹24.5

20% छूट + 5% कैशबैक


₹128.0

20% छूट + 5% कैशबैक


₹75.0

20% छूट + 5% कैशबैक


Showing 1 to 10 of 314 entries