पित्ताशयाला सूज येणे, - Cholecystitis in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 29, 2018

July 31, 2020

पित्ताशयाला सूज येणे,
पित्ताशयाला सूज येणे,

पित्ताशयाला सूज येणे काय आहे?

कलेसीस्टायटिस म्हणजे पित्ताशयाला सूज येणे. पित्ताशय नलिका, सिस्टीक नलिका किंवा पित्ताशयात होणाऱ्या पित्ताच्या खड्यांमुळे अशी सूज येते. पुरूषांपेक्षा स्त्रियांमधे ही समस्या जास्त आढळून येते. पुरूषांच्या तुलनेत वयाच्या चाळीशीच्या आधी पित्ताचे खडे होण्याचे प्रमाण स्त्रियांमधे जास्त आहे. दक्षिणेच्या तुलनेत उत्तर भारतात हे अधिक प्रमाणात दिसून येते. अमेरिकेत दरवर्षी जवळजवळ एक लाख लोकांना म्हणजे 10-15% प्रौढाना पित्ताच्या खड्याचा त्रास होतो अशी माहिती आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

काही व्यक्तींना किंचित पोटदुखी सोडल्यास इतर कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. प्रमुख लक्षणे अशी आहेत :

  • ओटीपोटाच्या वर उजव्या बाजूस अचानक तीव्र वेदना होणे.
  • मळमळ.
  • उलट्या.
  • हलकासा ताप.
  • डोळे पिवळसर होणे.
  • चहाच्या रंगाची लघवी.
  • मलाचा रंग फिकट होणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कलेसीस्टायटिस हे दोन प्रकारचे आहेत: मुतखड्यामुळे होणारा आणि मुतखड्यामुळे न होणारा कलेसीस्टायटिस त्यानुसार त्याची कारणदेखील आहेत:

  • मुतखड्यामुळे होणारा कलेसीस्टायटिस.
    • सर्वसामान्यत: आढळणारा कमी त्रासदायक प्रकार.
    • 95% रोग्यांमधे दिसून येतो.
    • मुख्य सिस्टीक नलिकेमधे अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो.
    • नलिकेत पित्ताच्या खड्यामुळे किंवा पित्तामुळे अडथळे निर्माण होतात.
  • मुतखड्यामुळे न होणारा कलेसीस्टायटिस
    • कलेसीस्टायटिसचा अतिशय त्रासदायक आणि दुर्मिळ प्रकार.
    • पित्ताशयाचा एखादा जुना आजार किंवा संसर्ग किंवा त्याला झालेली एखादी इजा ह्यामुळे सुद्धा कलेसीस्टायटिस उद्भवतो.
    • ह्याचे कारण शस्त्रक्रियेच्या वेळी चुकून झालेली इजा, भाजणे, रक्तातील विषबाधा, कुपोषण किंवा सेप्सीस हेही असू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

शारिरीक तपासणीच्यावेळी रूग्ण सामान्य वाटतो. कधीकधी पित्ताशयाजवळ हलकीशी वेदना होत असल्यासारखे वाटते. तपासणी केल्यावर मर्फी चाचणी सकारात्मक येते.

  • रक्त चाचण्या: एखादा संसर्ग किंवा काही कॉम्प्लिकेशन आहे का हे तपासण्यासाठी केल्या जातात.
  • एक्स-रे चाचण्या:
    • ओटीपोटाची अल्ट्रासोनोग्राफी.
    • कॉंप्युटेड टॉमोग्राफी (सीटी स्कॅन).
    • चुंबकीय रेसोनांस कोलॅंजीओपॅंक्रीॲटोग्राफी (एमआरसीपी).
    • एंडोस्कोपीक रेट्रोग्रेड कोलॅंजीओपॅंक्रीॲटोग्राफी (ERCP).

उपचार पद्धती:

  • प्राथमिक उपचार : पित्ताशय आतून स्वच्छ करण्यासाठी रूग्णाला काही खाऊ दिले जात नाही. ह्या वेळी शरीरातील पाण्याची पातळी सामान्य ठेवण्यासाठी शिरेतून द्रव पदार्थ दिले जाते.
  • वैद्यकीय उपचार : लक्षणीय पित्तखड्यांवर वैद्यकीय उपचार दिले जातात. या औषधांमुळे पित्ताचे खडे विरघळतात आणि पित्तनलिकेतील किंवा इतर ठिकाणचे संभाव्य अडथळे टाळले जातात.
  • शस्त्रक्रिया उपचार : लॅपरोस्कोपिक कॅलेसिस्टेक्टॉमी ही शस्त्रक्रिया पध्दत पित्ताशय काढून टाकण्यासाठी वापरली जाते. या शस्त्रक्रियेमुळे पित्तखड्याची समस्या पुन्हा उद्भवत नाही.

विना – शस्त्रक्रिया उपचार पद्धती :

  • एक्स्ट्राकोर्पोरियल शॉकव्हेव लिथोट्रिप्सी : उच्च उर्जेच्या ध्वनी लहरींच्या सहाय्यानी पित्ताचे खडे नष्ट केले जातात.
  • पर्क्यूटेनीअस उपचार.
  • एंडोस्कोपीक पध्दतीने पित्ताशयाचे स्टेंटींग.

जीवनशैलीत बदल :

  • कलेसीस्टायटिस ची समस्या उद्भवू नये म्हणून पुढील पदार्थ खाऊ नयेत
    • कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ.
    • साखर.
    • काही विशिष्ट प्रकारची कडधान्ये जसे चवळी, हरभरा वगैरे.
    • कांदा, सिमला मिरची.
    • कॅफिनयुक्त पेय.
  • आहारात तंतूमय पदार्थ भरपूर असावेत जसे की फळं, भाज्या, कठीण कवचाची फळे इत्यादी. आणि मासे, ऑलिव्ह तेल यासारख्या आरोग्यपूर्ण स्निग्ध पदार्थांचा वापर करावा.

आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे पालन केल्यास कलेसीस्टायटिसचा धोका कमी होतो.



संदर्भ

  1. World Gastroenterology Organisation. The Growing Global Burden of Gallstone Disease. Milwaukee, WI; [Internet]
  2. Dr Alok Chandra Prakash et al. Prevalence and Management of Cholelithiasis in East India. Department Of General Surgery, Ranchi,Jharkhand,India. Volume 15, Issue 12 Ver. V (December. 2016), PP 34-37
  3. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Symptoms & Causes of Gallstones
  4. National Health Service [Internet]. UK; Acute cholecystitis
  5. Jones MW, O'Rourke MC. Acute Cholecystitis. Acute Cholecystitis. StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.

पित्ताशयाला सूज येणे, साठी औषधे

Medicines listed below are available for पित्ताशयाला सूज येणे,. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.