myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

ऑलिव्ह तेल आणि पोषण

ऑलिव्ह तेल भूमध्य पाककलेचे एक अविभाज्य भाग असले, तरी वैश्विक स्तरावर प्रत्येक आरोग्य जागरूक व्यक्तीच्या स्वयंपाकघराचे पटकन प्रिय बनले आहे. शहरी स्वयंपाकात त्याला “ट्रेंड” किंवा “नवीन वस्तू” म्हणून हिणवले जात असले, तरी माझा विश्वास करत असाल तर असे काही नाही. ऑलिव्ह आणि ऑलिव्ह तेलाचे खूप लांबलचक आणि रुचिकर इतिहास आहे.

तुम्हाला इतिहास किंवा खेळाची आवड असली तर, तुम्ही निश्चितपणें ऑलंपिक खेळाबद्दल ऐकले असेल. तुम्हाला माहीत होते का की ऑलिव्हचे स्मृतिचिन्ह प्राचीन ग्रीक खेळांच्या विजेत्यांना दिले जात होते? हो, हे दस्तऐवजात असून ते सत्य आहे, पण आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ऑलिव्हचे एखाद्या प्रतीकात्मक पदकाशी काय बरे संबंध असू शकते? तुम्हाला जाणून घेण्यास आवडेल की ग्रीक धर्मशास्त्रामध्ये ऑलिव्हच्या झाडाला देवी “एथेना”कडून मिळालेले एक उपहार समजले जात होते. एखाद्या वेळेस तुम्हाला माहीत नसल्यास, एथेना बुद्धि आणि साहसाची देवी आहे. एथेनाच्या नांवावर एथेंस शहर बसवले गेले होते. नैसर्गिकरीत्या, ऑलिव्हचे झाड आणि शाखा यांना उच्चतम स्थान दिले गेले आहे. वास्तविक पाहता, ग्रीक अजूनही ऑलिव्हला समॄद्धीचे चिन्ह समजतात. 2004 उन्हाळी ऑलंपिक्समधील विजेत्यांना ऑलिव्ह शाखांचे स्मृतिचिन्ह मिळाले होते.

ऑलिव्ह तेलाला औषधशास्त्राचे जनक हिपोक्रेट्स द्वारे “महान उपचारकर्ता” असे म्हटले गेले आहे. म्हणून, हे सांगण्यात काही गैर नाही की ऑलिव्ह खूप वेळ त्याच्या औषधशास्त्रीय आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी विख्यात होते.

इतिहासकारांप्रमाणें, ऑलिव्ह झाडाच्या शेतीचे सर्वांत जुने अभिलेख जवळपास 7000 वर्ष जुने आहे. ऑलिव्ह झाडाचे यूनानमध्ये मिळालेले पुरातत्त्वीय नमुने 3000 वर्ष एवढे जुने आहेत. ऑलिव्हचे औषधशास्त्रीय आणि उपचारात्मक फायद्यांना प्राचीन ग्रीक साहित्यामध्ये स्थान दिले गेले आहे. हेच नाही, तर प्राचीन ग्रीक लेखक होमर यांनी ऑलिव्ह तेलासाठी “तरळ सोने” ही संज्ञा वापरली होती.

तुम्ही हे जाणून चकित व्हाल की केवळ ग्रीकांनीच त्यांच्या तरळ सोन्याला नावाजले आणि सुरक्षित ठेवले नव्हते. कुरानमध्येही ऑलिव्हच्या फळाला एक कृपांकित फळ मानले आहे आणि या फळाचे दाखले बायबलच्या जुन्या करारातही सापडतात. इजिप्शिअम ऑलिव्हच्या पानांना ममीकरण पद्धतींमध्ये वापरत होते. आज, हे आश्चर्य जगातील जवळपास प्रत्येक प्रमुख देशात पोचले आहे आणि शाकाहारी खाद्य तेल, सूर्यफूल तेल आणि अन्य सॅच्युरेटेड तेलांना एक निरोगी पर्याय म्हणून त्याची गणती होते.

 1. ऑलिव्ह तेलचे वापर आणि आरोग्य फायदे - Olive oil uses and health benefits in Marathi
 2. चांगले ऑलिव्ह तेल कसे ओळखावे - How to identify good olive oil in Marathi
 3. रोज किती ऑलिव्ह तेल घ्यावे - How much olive oil to take per day in Marathi
 4. एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह तेल आणि त्याचे वापर - Extra virgin olive oil and its uses in Marathi
 5. ऑलिव्ह तेलाचे सहप्रभाव - Olive Oil Side Effects in Marathi

आपल्यापैकी बहुतेक लोक ऑलिव्ह तेलाच्या बाटल्यांना आमच्या स्वयंपाकघरात ठेवतात आणि दैनंदिन स्वयंपाकात वापरतात. पण हे पाकशास्त्रीय संपदा केवळ स्वयंपाकघरापर्यंत मर्यादित नाही. ऑलिव्ह तेलाचे आरोग्य आणि शरिराच्या उत्कर्षावर खूप लाभदायक प्रभाव  होतात. चला, आपण ऑलिव्ह तेलाच्या बिगर पाकशास्त्रीय वापर पाहू या:

 • केसांसाठी: ऑलिव्ह तेल तुमच्या डोक्याच्या त्वचेला योग्य पोषण देतात आणि तुमच्या केसांना मऊ, निरोगी आणि चकाकदार ठेवतात.
 • त्वचा आणि चेहर्र्यासाठी: ऑलिव्ह तेलामध्ये एंटीऑक्सिडेंटचे अनेक मिश्रण आहेत, जे तुमच्या त्वचेसाठी उत्कृष्ट आहे. ते न केवळ तुमच्या त्वचेला मऊ आणि पोषित ठेवतात, तर बारीक रेषा आणि सुरकुतीही काढण्यास मदत करतात.
 • हृदयासाठी: ऑलिव्ह तेलातील प्रचुर एंटीऑक्सिडेंट सामग्री ऑक्सिडेटिव्ह तणावाशी आणि आहारामध्ये घेतल्यास हृदयाच्या क्षतीशी झगडण्यात मदत करतात. नियमित वापरल्याने हृदयविकाराचा झटका, एथेरोस्क्लेरोसिस आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी एलडीएल कॉलेस्टरॉल पातळी ही कमी होते.
 • मधुमेहासाठी: अभ्यासातून निष्पन्न झाले आहे की ऑलिव्ह तेल घेतल्याने मधुमेहाचा धोका कमी  होतो आणि रक्तशर्करा स्तर कमी होऊन त्याच्या प्रबंधनात ही मदत होते.
 • पोटातील अल्सरसाठी: काही अभ्यासांचा दावा आहे की ऑलिव्ह तेलाचे वापर एच पायलोरी प्रजातींविरुद्ध सूक्ष्मजीवरोधी प्रभावाद्वारे पोटातील अल्सरचे ही प्रबंधन होते.
 • लहान मुलांसाठी: ऑलिव्ह तेलाच्या मसाजाद्वारे लहान मुलांची त्वचा मऊ होण्यास मदत होते आणि आराम मिळतो आणि ते डायपर रॅशविरुद्ध ही प्रभावी आहे.
 • कर्करोगाविरुद्ध: ऑलिव्ह तेलामधील एंटीऑक्सिडेंट कर्करोगाची वाढ आणि संभावना यांना नियंत्रित करून कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
 1. केसांसाठी ऑलिव्ह तेल - Olive oil for hair in Marathi

केसांसाठी ऑलिव्ह तेल - Olive oil for hair in Marathi

ऑलिव्ह तेलाचे वापरकर्ते या तेलाच्या पोषक आणि आर्द्रतादायक केसासाठीच्या फायद्यांबद्दल खूप बोलतात. वैद्यकीय तज्ञांनुसार, ऑलिव्ह तेल स्क्वॅलीन आणि ऑयलिक एसिडसारख्या जैवरसायन ही प्रचुर असतो, ज्याचे केसांवर मऊ करणारे प्रभाव होते. ऑलिव्ह तेलामध्ये उपस्थित वसा आणि जीवनसत्त्व केसांसाठी त्याला उत्कृष्ट पोषक पदार्थ बनवतात. ऑलिव्ह तेल नियमितपणें वापरल्याने तुम्हाला शुष्क आणि तळपे असलेल्या डोक्याच्या कातडीपासून बचावतो. तसेच, ते तुमच्या हेअर फॉलिकलला पोषित करतो आणि तुमच्या केसांना मऊ आणि चकाकदार ठेवतो.

ऑलिव्ह तेल भूमध्यीय आहाराचे स्थानीय वृक्ष आहे आणि दक्षिणपूर्व युरोप, पश्चिम एशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांपर्यंत पसरले आहे. पारंपरिकरीत्या, ऑलिव्ह तेल ऑलिव्ह झाडाच्या (ऑलियुरोपिया) फळामधून हाताने काढून आणि दगडाने पाडून मिळते. पण, तंत्रज्ञान प्रगत झाल्याने, गतिशील आणि अधिक बेहतर उपकरण त्वरित जुन्या पद्धतींची जागा घेत आहे.

ऑलिव्ह तेलच्या तज्ञांप्रमाणें, ऑलिव्ह तेलची चव ऑलिव्हचे प्रकार आणि पिकण्याची अवस्था याप्रमाणें बदलते, ज्याचे वापर तेलाचे बॅच तयार करतांना होते. सामान्यपणें, फळ जेवढे पिकलेले असेल, तेल तेवढेच कमी कडू असेल. पिकण्याचे स्तर सुद्धा तेलाच्या  रंगाला हिरव्यापासून हिरवेसर सोनेरीमध्ये बदलते आणि पिकलेल्या ऑलिव्हमध्ये गरम सोनेरी होते.

आता, एवढे फायदे वाचून तुम्हाला आता तुमचा पहिला बॉटल घेण्याची घाई झाली असेल. पण तुम्हाला बाजारात अनेक निवडी उपलब्ध असतील, ज्या तुम्हाला सहजच भांबावून सोडतील. अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंड  ऑलिव्ह तेल विकतात आणि त्याच्या शुद्धता व मानकांबद्दल वेगवेगळे दावे करतात. म्हणून, अशा वेळेस तुम्हाला भारावून घेणारा पहिला बॉटल विकत घेण्यासाठी पळू नका. याऐवजी, ऑलिव्हतज्ञ अधिक गडद बॉटल किंवा टिन विकत घेण्याचा सल्ला देतात, जे थेट प्रकाशासाठी तेलाला मोकळे सोडत नाहीत. याचे कारण असे की थेट प्रकाश आणि प्राणवायूमध्ये अधिक वेळ मोकळे सोडल्याने तेलाची गुणवत्ता कमी करणारा प्रभाव होऊ लागतो. तसेच, चांगल्या प्रतीच्या ऑलिव्ह तेलाचे तुमच्या तोंडात फळाचे आणि नंतर भाजी आणि गवताचा चव येतो. तुम्हाला ती रॅंसिडिटी वाटत असल्यास, त्या विशिष्ट गुणवत्तेला टाळलेलेच बरे आहे.

अन्न एवं औषध प्रशासनानुसार (एफडीए, अमेरिका) 15-20 ग्रॅम ऑलिव्ह तेल दिवसात आदर्शरीत्या घेतले जाऊ शकते. तथापी, त्याच विधानामध्ये, हे ही म्हटले गेले होते की तुमच्या सॅच्युरेटेड फॅटचे पर्याय म्हणून ऑलिव्ह तेल वापरावे आणि अतिरिक्त पूरक तत्त्व म्हणून नव्हे. याचे अर्थ असे की तुम्ही औषध म्हणून हे तेल पिण्याऐवजी तुमच्या नियमित तेलाचे पर्याय म्हणून वापरले पाहिजे. याचे कारण असे की ऑलिव्ह तेलाचे खूप आरोग्य फायदे आहेत, पण तरी वसा खूप अधिक आहे. तुमच्या शरिराला तुळनेने कमी प्रमाणात वसाची आवश्यकता असल्याने, अधिक ऑलिव्ह तेल घेऊ नये. ऑलिव्ह तेल वापरण्याच्या योग्य पद्धतीबद्दल डॉक्टराशी बोललेले बरे, हे सांगणे न लगे, जेणेकरून तुम्हाला ऑलिव्हमधून सर्वाधिक फायदे मिळतील.

एक्स्ट्रा वर्जिन म्हणजे ऑलिव्ह तेलाच्या उत्पादनाची पद्धतीकडे बोट दाखवते. एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव्ह तेलाची प्रत आहे, जिची परिभाषा केलेली नाही. आदर्शरीत्या, त्याला ऑलिव्ह तेलाचे सर्वोत्तम प्रकार समजले जाते. संशोधकांप्रमाणें, परिष्करण ऑलिव्ह तेलातील काही महत्त्वपूर्ण रासायनिक यौगिकांना काढतो. ऑलिव्ह विविध इटॅलिअन आणि ग्रीक पाककॄतींमध्ये स्वयंपाकाचे घटक म्हणून थेट वापरता येतात. ऑलिव्ह तेल स्वयंपाकाचे माध्यम आणि साबण, शॅंपू, आणि कंडिशनर आणि विशिष्ट सौंदर्यशास्त्रीय उत्पादनांमध्ये खूप वापरले जाते.

ऑलिव्ह  तेल स्थानिकरीत्या लावल्यानंतर त्वचेच्या अलर्जींचे काही प्रसंग पाहण्यात आलेले आहेत. म्हणून, तुमची आंतरिकरीत्या संवेदनशील किंवा तैलीय त्वचा असल्यास, तुमच्या त्वचेवर ऑलिव्ह तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. अभ्यास सुचवतात की ऑलिव्ह तेल एक्झेमा आणी सॉरिअसिससारख्या काही त्वचा परिस्थितींना अजून बिघडवू शकतात. म्हणून, कोणत्याही त्वचा परिस्थितींसाठी ऑलिव्ह तेल वापरण्यापूर्वी त्वचारोगतज्ञाचा सल्ला घेतलेला बरा.

गरोदरपणादरम्यान ऑलिव्ह तेलाच्या वापराला आधार देण्यासाठी पर्याप्त प्रमाण उपलब्ध नाही. म्हणून, गरोदर महिलांना त्यांच्या आहारात ऑलिव्ह तेल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ऑलिव्ह तेल नैसर्गिक हायपोग्लायसेमिक आहे ( रक्तशर्करा स्तर कमी करतो), म्हणून मधुमेह असलेल्या लोकांनी त्यांच्यासाठी ऑलिव्ह तेलाची वास्तविक मात्रा निर्धारित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

और पढ़ें ...