क्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया (सीएमएल) - Chronic Myelogenous Leukemia (CML) in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS

November 30, 2018

March 06, 2020

क्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया
क्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया
कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

क्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया (सीएमएल) म्हणजे काय?

क्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया (सीएमएल), क्रोनिक मायलोइड ल्युकेमिया म्हणून देखील ओळखला जातो. हा एक प्रकारचा रक्त पेशी आणि अस्थिमज्जा चा कर्करोग आहे. अस्थिमज्जा एक मऊ भाग असून त्यामध्ये रक्त पेशींचे उत्पादन होते. सीएमएल ल्यूकेमिया चा प्रकार असून यामध्ये  पांढऱ्या रक्त पेशींची अनियंत्रित वाढ होते.  

याची मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?

 • क्रोनिक फेजमध्ये सीएमएल असणार्‍या रुग्णांना कोणतेही लक्षणं दिसून येत नाही.
 • आजारातील नंतरचा कालावधी ज्याला ॲक्सलरेटेड फेज म्हणतात, त्यामध्ये रुग्णांना रात्रीचा घाम, थकवा, वजन कमी होणे आणि सतत ताप येणे सारखी सामान्य लक्षणे दिसून येतात.
 • ब्लास्टिक फेज मध्ये रुग्णांमध्ये वेदना, संसर्ग आणि आपोआप रक्तस्त्राव अशी तीव्र लक्षणे दिसून येतात.
 • पांढऱ्या रक्त पेशींच्या संख्या आणि संरचनेतील असामान्यपणामुळे, प्लीहावर देखील परिणाम होतो. प्लीहा वाढल्यामुळे रुग्णाच्या वरच्या ओटीपोटात वेदना होतात.

याची मुख्य करणं काय आहेत?

 • दुर्दैवाने, सीएमएलचे अचूक कारण अद्याप ही समजले नाही आहे.
 • अतिप्रमाणत किरणोत्सर्गाच्या संपर्कात येणे हा सर्वात धोकादायक घटक आहे.
 • सीएमएलने ग्रासलेल्या रुग्णांमध्ये सामन्यपणे असे निदर्शनास आले आहे की हा कर्करोग मनुष्याच्या क्रोमोझोम 22 मधील दोषाशी निगडीत आहे. या क्रोमोझोमला फिलाडेल्फिया क्रोमोझोम असे म्हणतात.
 • ही स्थिती मध्यम-वयाच्या व्यक्तींमध्ये अधिक कॉमन आहे, आणि महिलांपेक्षा पुरुषांवर याची बाधा जास्त होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • बेसिक शारिरीक तपासणी केल्याने तुमच्या डॉकटरांना रक्तदाब,हृदय गति आणि नाडी या महत्त्वाच्या घटकांचा अंदाज येतो. लिम्फ नोड किंवा प्लीहा मध्ये सूज आहे का ते सुद्धा तपासले जाते.
 • रक्त तपासणी ने रक्त पेशीतील स्वरुप आणि संख्येमधील असामन्यता दिसून येते.
 • फिलाडेल्फिया क्रोमोझोमची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी केली जाते, जसे पॉलिमिरेझ चेन रिॲक्शन टेस्ट.
 • अस्थिमज्जातील दुर्बलता जाणून घेण्यासाठी अस्थिमज्जेची बायोप्सी केली जाते.
 • दोषयुक्त जीन असलेल्या सर्व पेशी नष्ट करणे कठीण आहे परंतु या पेशी नष्ट करण्याच्या हेतूने उपचार केले जातात.
 • किमोथेरपी व्यतिरिक्त, सीएमएल रुग्णांसाठी टार्गेटेड ड्रग्स म्हणून ओळखली जाणारी विशिष्ट औषधे आहेत. जर एखादी व्यक्तीत एखाद्या टार्गेटेड ड्रग्स साठी प्रतिकारशक्ती निर्माण होत असेल तर त्यांना दुसरे औषध दिले जाते.
 • रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यानंतर बोनमॅरो नवीन निरोगी पेशींचे उत्पादन करते.
 • चांगल्या उपचार पर्यायांसाठी संशोधन चालू असूनही, विशेषतः प्रतिरोधक सीएमएलच्या उपचारांसाठी,  रोगनिदानची स्थिती वाईट आहे.संदर्भ

 1. Saubele S, Silver RT. Management of chronic myeloid leukemia in blast crisis. Ann Hematol. 2015 Apr;94 Suppl 2:S159-65. PMID: 25814082
 2. Kaleem B, Shahab S, Ahmed N, Shamsi TS. Chronic Myeloid Leukemia--Prognostic Value of Mutations. Asian Pac J Cancer Prev. 2015;16(17):7415-23. PMID: 26625737
 3. Blood. Chronic myeloid leukemia (CML) with P190BCR-ABL: analysis of characteristics, outcomes, and prognostic significance. American Society of Hematology; Washington, DC; USA. [internet].
 4. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Chronic Myelogenous Leukemia Treatment (PDQ®)–Health Professional Version
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Chronic Myeloid Leukemia

क्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया (सीएमएल) साठी औषधे

क्रोनिक मायलोजनिस ल्यूकेमिया (सीएमएल) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।