डीवीटी (डीप वेन थ्रोम्बोसिस) - Deep Vein Thrombosis (DVT) in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

November 30, 2018

July 31, 2020

कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो
डीवीटी
डीवीटी
कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस (डीव्हिटी) काय आहे?

डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस (डीव्हिटी) ही एक परिस्थिती आहे ज्यात एका रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, त्या विशेषतः पाय मध्ये बनतात. हे सामान्यतः 60 वर्षांवरील कोणासही प्रभावित करु शकते. भारतात ह्याचे प्रमाण दर सुमारे 8% -20% आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

पायाला सूज हे मुख्य लक्षण आहे. फारच क्वचितच, दोन्ही पायांवर सूज दिसून येते.

या अंतर्गत अजून लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

 • पाय दुखणे.
 • पायावर लालसर डाग पडणे.
 • पायात उबदारपणा जाणवणे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष केले गेले तर ही रक्ताची गुठळी त्या जागेवरून हालू शकते आणि रक्तप्रवाहातून फुफ्फुसांपर्यंत जाऊ शकतो. यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे पल्मनरी एम्बॉलिझस (फुफ्फुसांच्या रक्ताभिसरणात अडथळा) होतो.

फुफ्फुसांच्या रक्ताभिसरणास अडथळ्याच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

रक्त प्रवाह अडकवणारी कोणतीही गोष्ट डीव्हीटीमध्ये परिवर्तित शकते. त्याची मुख्य कारण खालील प्रमाणे आहेत:

 • रक्तवाहिनीला दुखापत.
 • शस्त्रक्रिया.
 • कर्करोग, हृदयरोग किंवा गंभीर संसर्ग यासारखे मोठे आजार.
 • काही औषधे.
 • दीर्घ काळ निष्क्रियता.

डीव्हिटी होण्याचा धोका वाढवू शकणारे घटक:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

रोगनिदान मुख्यत्वे रुग्णालयातील वैद्यकीय इतिहासावर आणि प्रभावित अवयवाचे शारीरिक परीक्षण यावर अवलंबून असते. औषधांचा इतिहास देखील घेतला जातो. निदानाच्या इतर टप्प्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • डी-डायमर चाचणी.
 • अल्ट्रासाऊंड.
 • व्हेनोग्राफी.
 • सीटी किंवा एमआरआय स्कॅन.
 • पल्मनरी अँजिओग्राफी.

डीव्हीटीचे मूलभूत कारण शोधू शकणाऱ्या चाचण्या:

 • रक्त तपासणी.
 • छातीचा एक्स-रे.
 • ईसीजी.

डीव्हीटीसाठी उपचार लक्ष्यामध्ये वेदना आणि सूज यापासून मुक्ती समाविष्ट असते. औषधे, विशेषतः रक्त-पातळ  करणाऱ्या कारकाला प्राधान्य दिले जाते.

प्रतिबंधक टप्पे :

 • जर आपण बेड रेस्ट घेत असाल तर शक्य तितक्या लवकर हालचाल करा. आपण जितक्या लवकर हे कराल तितकीच डीव्हिटीची शक्यता कमी होईल.
 • बऱ्याच काळापासून असलेला ताठरपणा टाळण्यासाठी पायांच्या स्नायूंचा व्यायाम करा.
 • रक्ताची गुठळी होणे टाळण्यासाठी पोटरीला घट्ट दाबून ठेवणारे पायमोजे वापरा.
 • हालचाली आणि रक्ताभिसरणात अडथळे टाळण्यासाठी सैल कपडे वापरा.
 • एका सक्रिय जीवनशैलीचे पालन करा.
 • रक्त-पातळ होणारे औषध सुरु असताना रक्तस्त्राव होण्याच्या घटनांवर जवळून लक्ष ठेवा.संदर्भ

 1. Dhanesh R. Kamerkar et al. Arrive: A retrospective registry of Indian patients with venous thromboembolism. Indian J Crit Care Med. 2016 Mar; 20(3): 150–158. PMID: 27076726
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Deep Vein Thrombosis
 3. Society for Vascular Surgery. Deep Vein Thrombosis. Rosemont, Ill. [Internet]
 4. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Venous Thromboembolism
 5. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Deep Vein Thrombosis (DVT)
 6. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; What is Venous Thromboembolism?

डीवीटी (डीप वेन थ्रोम्बोसिस) साठी औषधे

डीवीटी (डीप वेन थ्रोम्बोसिस) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

दवा का नाम

कीमत

₹322.05

20% छूट + 5% कैशबैक


₹606.9

20% छूट + 5% कैशबैक


₹46.9

20% छूट + 5% कैशबैक


₹154.0

20% छूट + 5% कैशबैक


₹230.0

20% छूट + 5% कैशबैक


₹4400.0

20% छूट + 5% कैशबैक


₹517.66

20% छूट + 5% कैशबैक


₹271.89

20% छूट + 5% कैशबैक


Showing 1 to 10 of 164 entries