बरगडीचा अस्थिभंग - Fractured Rib in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 30, 2018

March 06, 2020

बरगडीचा अस्थिभंग
बरगडीचा अस्थिभंग

बरगडीचा अस्थिभंग काय आहे ?

बरगडीचा अस्थिभंग म्हणजे छातीच्या बरगडीला जे छातीच्या रक्षणासाठी पिंजरा बनवतात त्यांना भेग पडणे किंवा तुटणे होय. जेव्हा एकपेक्षा जास्त बरगडी तुटतात, तेव्हा त्याचे रूपांतर फ्लेल छातीमध्ये होते (तुटलेल्या  बरगडीचा तुकडा बाकीच्या छातीच्या पिंजऱ्यापासून अलग होतो). बरगड्याना छातीच्या हाडाशी जोडणाऱ्या स्नायू किंवा कार्टिलेज चे तुटण्याला सुद्धा बरगडीचा अस्थिभंग म्हणतात, इथे प्रत्यक्ष बरगड्याना हानी झालेली नसते.

बरगड्या छातीच्या आतील महत्वाच्या अवयवांचे रक्षण करतात. ते फुफुसांच्या बाजूला थोडी जागा तयार करतात, त्यामुळे ते आरामात हवा आत घेऊ शकतात. असा प्रहार जो तुमच्या बरगडीचा अस्थिभंग करू शकतो तो आतील महत्वाच्या अवयवांना सुद्धा अपाय करू शकतो. सर्वसाधारणपणे जास्तवेळा, फुफुसांमध्ये छिद्र पडणे किंवा खराब होणे (न्यूमोथोराक्स) हे बरगडीच्या अस्थिभंगाशी संबधित असू शकते.

याचे मुख्य खुणा आणि कारणे काय?

बरगडीचा अस्थिभंगामुळे खालील गोष्टी होऊ शकतात:

याचे मुख्य कारणे काय आहे?

छातीवर सरळ आघात झाल्यामुळे बरगडीचा अस्थिभंग होऊ शकतो. काही दुर्मिळ केसेस मध्ये खूप जोऱ्यात खोकलल्याने किंवा मेटास्टॅटिक कॅन्सर मुळे छातीचा अस्थिभंग होऊ शकतो. तरीही, छातीच्या अस्थिभंगाचे काही सर्वसामान्य कारणे खालील प्रमाणे आहे:

  • अपघात किंवा आघात.
  • फुटबॉल किंवा हॉकी सारखे एकमेकांना स्पर्श होणारे खेळ.
  • ऑस्टिओपोरोसिस.
  • कार्डीओपल्मोनरी रेसुसीटेशन (सीपीआर) मूळे बरगडी चा अस्थिभंग होऊ शकतो यात डॉक्टरांकडून हृदयाला सूरु करताना  छातीवर जास्त दाब दिला जाऊ शकतो.

याचे  निदान आणि  उपचार काय आहे ?

तुमचे डॉक्टर तुमची लक्षणे आणि पडल्याचा किंवा अपघाताचा इतिहास लक्षात घेतील. डॉक्टर छातीवरील जखमा आणि खरचटन्याच्या तीव्रतेचे निरीक्षण करतील. योग्य निदानासाठी एक्स - रे ची मदत होईल. तरीही, एक्स- रे हाडाच्या बाहेरील अस्थिभंगा चे निदान करू शकत नाही. तेव्हा, सिटी ची गरज सुद्धा लागू शकते.

निदानाचे निरीक्षण करून, बरगडी च्या अस्थिभंगासाठी शस्त्रक्रियेची आणि व्हेंटिलेटर च्या आधाराची गरज पडू शकते. दाह कमी करणारे आणि वेदना कमी करणारे औषधे अस्वस्थता कमी करण्यासाठी मदत करतात. एक तुटलेली बरगडीला ठीक होण्यासाठी साधारणपणे सहा आठवड्याचा कालावधी लागतो. आराम करत असतांना एका तासातून एकदा तरी लांब श्वास घेण्याचा सल्ला दिला जातो त्यामूळे  न्यूमोनिया  किंवा फुफुसे निकामी होत नाही.

बरे होण्याच्या काळात, तुम्ही खेळापासून दूर राहायला पाहिजे. बरगडी बऱ्या होत असताना त्यांच्या वर एखादी गोष्ट घट्ट न गुंडाळण्याचा सल्ला दिला जातो.



संदर्भ

  1. University of Michigan Health System. Fractured Rib. [Internet]
  2. National Center for Biotechnology Information. fractured rib diagnosis . U.S. National Library of Medicine; [Internet]
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Rib fracture - aftercare
  4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Rib injuries
  5. Michael Bemelman et al. Rib Fractures: To Fix or Not to Fix? An Evidence-Based Algorithm. Korean J Thorac Cardiovasc Surg. 2017 Aug; 50(4): 229–234. PMID: 28795026