हृदय रोग काय आहे ?
हृदय रोग म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये हृदयावर आणि रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो. आज च्या काळात, हृदय रोग हा मृत्यू होण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे आणि त्यात अरिथमिआ, कोरोनरी अरटेरी रोग आणि जन्मजात हृदय रोग यांचा समावेश आहे. जगभरात हृदय विकाराचा झटका आणि हार्ट फेल होणे हे हृदय रोगाच्या प्रकारांपैकी दोन सामान्य प्रकार आहे.
याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ॲथरोस्केरॉटिक (रक्त वाहिन्यांचे आकुंचन) रोगाशी संबंधित लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- छातीत दाटून येणे, वेदना (पुरुषांमध्ये सामान्य) आणि अस्वस्थता( महिलांमध्ये सामान्य).
- धाप लागणे.
- छातीत दुखणे जे जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटापर्यंत वाढत जाते.
- बधिरता ,हात आणि पायात अशक्तपणा येणे.
हृदयाची लय नसण्याचे संबंधित लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- हृदयाची स्पंदन वाढणे.
- धडधडणे आणि चक्कर येणे.
- टचकार्डिया (हृदयाचा वेग वाढणे).
- ब्रॅडिकार्डिया (हृदयाचा वेग कमी होणे).
- श्वास घ्यायला त्रास होणे.
हृदय दोष किंवा हार्ट फेल ची संबंधित लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- निस्तेज, नवजात बाळांमध्ये त्वचा निळसर होणे.
- खातांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे खाण्याकडे दुर्लक्ष होणे, त्यामुळे बाळाचे वजन न वाढणे.
- हातापायाला आणि पोटावर सूज येणे.
- व्यायाम केल्यानंतर किंवा काही शारीरिक काम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटणे.
हृदयाच्या संसर्गाशी संबंधित लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- रात्री झोपेत घाम येणे आणि थंडी वाटणे.
- खोकला.
- हार्ट मरमर.
- छातीत, पोटात, हातापायांच्या बोटात वेदना होणे.
याचे मुख्य कारण काय?
हृदय रोगांची कारणे रोगांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळी असू शकतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश होतो:
- ॲथरोस्केरॉटिक हृदय रोग: पौष्टिक नसलेला आहार, बैठी जीवनशैली, जास्त वजन आणि धूम्रपान करणे.
- हृदयात लय नसणे: जन्मजात (जन्मापासून असणे) हृदय दोष, मधुमेह, उच्य रक्तदाब, ड्रुग्स चा वापर, धूम्रपान आणि तणाव.
- हृदयातील दोष : गर्भवती आईची काही औषधे किंवा तब्बेतीच्या कारणामुळे किंवा अनुवांशिक घटकांमूळे गर्भाच्या हृदयाच्या वाढीवर परिणाम होतो.
- हृदयातील संसर्ग : रक्तातून हृदयापर्यंत पोहोचणारे बॅक्टरीया, विषाणू आणि परजीवी मूळे होते. संधिवात हृदय रोग , सिफिलिस, वॅलव्ह्यूलर हृदय रोग आणि हृदयाच्या आणि तोंडाच्या शस्त्रक्रियेमुळे हृदयाचा संसर्ग होण्याचे चान्सेस वाढतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते ?
हृदय रोगाचे निदान करण्यासाठी वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासण्या सोबत बऱ्याच तपासण्या केल्या जातात त्या खालील प्रमाणे आहेत:
- कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरॉईड्स ची पातळी तपासण्यासाठी रक्तताची तपासणी.
- तणाव चाचणी.
- इलेकट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी).
- इकोकार्डिओग्रॅम (2 डी एको).
- टिल्ट चाचणी.
- इलेकट्रॉफिसिओलॉजिक चाचणी.
- कोरोनरी अँजिओग्राम.
- सीटी (संगणकीय टोमोग्राफी) स्कॅन.
हृदय रोगाच्या उपचारामध्ये औषधाशिवाय जीवनशैलीत बराच बदल करावा लागतो. धूम्रपान आणि अतिरिक्त दारू पिणे टाळा.
तुमचे डॉक्टर तुम्हाला कमी चरबीयुक्त आहार घ्यायला सांगतील आणि व्यायाम किंवा रोज 30 मिनिटे चालायला सांगतील. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कमी घनतेचे लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करण्यासाठी औषधांची गरज लागेल.
रोगाचे प्रकार आणि किती मोठा आहे ,यावरून तुमचे डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात. हृदयातील कोरोनरी आर्टरी मध्ये अडथळा निर्माण झाल्यास धातूचे स्टेण्ट (अँजिओप्लास्टी) टाकायची गरज पडू शकते किंवा रक्तवाहिन्यांसाठी (बायपास शस्त्रक्रिया) साफ रक्तवाहिन्या पायातून किंवा छातीतून सोडून (ग्राफ्ट) नवीन मार्ग बनवावा लागू शकतो.