आयडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा (आयटीपी) - Idiopathic Thrombocytopenic Purpura (ITP) in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

आयडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा
आयडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा

आयडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा (आयटीपी) काय आहे?

आयडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा (आयटीपी) हा एक रक्ताचा विकार आहे ज्यामध्ये कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय प्लेटलेटची संख्या कमी होते. या आजारामुळे प्लेटलेटच्या संख्येवर परिणाम होतो पण त्यांच्या कार्यावर नाही. आयटीपीमध्ये, आपले शरीर प्लेटलेट्स विरूद्ध अँटीबॉडी तयार करते; म्हणूनच,हा एक स्व-प्रतिरक्षक विकार आहे.

याची मुख्य लक्षणे आणि कारणे काय आहेत?

रक्तस्त्राव थांबविण्यासाठी प्लेटलेटची आवश्यकता असल्याने, आयटीपी प्रामुख्याने जास्त रक्तस्त्रावाशी संबंधित आहे. याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

जरी आयटीपीची कारणं अज्ञात असली तरी या रोगात खालील दोन प्रक्रियांचा समावेश आहे, ज्यामुळे प्लेटलेटची संख्या कमी झाल्याचे दिसून येते:

 • प्रथम - अँटीबॉडीज प्लेटलेट्स नष्ट करतात.
 • दुसरे - अँटीबॉडी हाडांच्या मज्जातंतूमधील प्लेटलेट-उत्पादक पेशी देखील नष्ट करतात. प्लेटलेटच्या उत्पादनासाठी प्रोटीन थ्रोम्बोपोएटिन (टीपीओ) आवश्यक आहे. त्यामुळे, प्लेटलेटसच्या कमी संख्येमुळे टीपीओचा स्तर वाढत नाही.

याचे उपचार आणि निदान कसे केले जातात?

डॉक्टर संपूर्ण शारीरिक तपासणी करतात आणि हा विकार वैद्यकीय इतिहासाशी संबंधित आहे का हे पाहतात. प्लेटलेट मोजण्यासाठी पूर्ण रक्त गणना (सीबीसी) करण्यास सांगितले जाऊ शकते आणि कोणत्याही संभाव्य संसर्गाची तपासणी करण्यासाठी आणि रक्तस्त्राव किती वेळ होतो याचे मूल्यांकन करण्यासाठी मूत्र चाचणी केली जाऊ शकते. अस्थिमज्जामधील असामान्यता दूर करण्यासाठी अस्थिमज्जाची तपासणी केली जाते.

उपचारांचा हेतू रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढविणे हा असतो.

 • कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा वापर जळजळ कमी करण्यासाठी केला जातो तर इम्यूनोग्लोब्युलिन प्लेटलेट संख्या वाढविण्यासाठी वापरले जाते.
 • प्लेटलेट नष्ट होण्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्प्लेनेक्टॉमी केली जाते.
 • गंभीर प्रकरणांमध्ये प्लेटलेट ट्रान्सफ्युजं आवश्यक आहे.
 • रिटुझान (रिटुक्सीमाब) नावाचे एक औषध क्रॉनिक आयटीपीसाठी वापरले जाते.

 संदर्भ

 1. MedlinePlus Medical: US National Library of Medicine; Immune thrombocytopenic purpura (ITP)
 2. L.Kayal, S.Jayachandran, Khushboo Singh. Idiopathic thrombocytopenic purpura. Contemp Clin Dent. 2014 Jul-Sep; 5(3): 410–414. PMID: 25191085
 3. Children’s Hospital of Philadelphia. Idiopathic Thrombocytopenic Purpura (ITP) Causes, Symptoms and Treatment. The Children’s Hospital of Philadelphia, USA. [internet].
 4. Blood. How I treat idiopathic thrombocytopenic purpura (ITP). American Society of Hematology; Washington DC, USA. [internet].
 5. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Immune Thrombocytopenia

आयडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा (आयटीपी) साठी औषधे

आयडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा (आयटीपी) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।