myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

आम्हा प्रत्येकाला विचार, व्यवहार व भावनांवर प्रभाव पडण्याचे अनुभव होतातच. हे एखादी घटना किंवा व्यक्तीला प्रतिसाद म्हणून किंवा आम्ही अपेक्षा किंवा पूर्वानुमान न केलेल्या घटनांचे परिणाम म्हणून समोर येतात. टोकाच्या व अत्यधिक प्रमाणामध्ये आढळल्यास, या अवस्था किंवा लक्षणे काही पूर्वनिकषित निकषांच्या आधारे, मानसिक आजार मानले जातात. मानसिक आजारांची कारणे विविध असू शकतात उदा. धक्कादायक घटना, उपेक्षा, एखाद्या अपघातामुळे झालेले दिव्यांगत्त्व, प्रिय व्यक्तीचे निधन, जनुकीय घडण विस्कळीत पडणें, मेंदूतील दोष किंवा त्याला इजा, विकासात्मक प्रभाव इ. मानसिक आजारावरील उपचार अंतर्निहित कारणावर अवलंबून असते आणि त्याच्यामध्ये समुपदेशन, मानसिक उपचार, संमोहन उपचार, औषधोपचार, इलेक्ट्रोकंवल्झिव्ह थेरपी आणि शस्त्रक्रिया सामील असतात. प्राप्त मानसिक आजाराचे निवारण जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोण ठेवणें, ध्यानधारणा, जीवनातील विविध घटना व तणांवात हातळण्याचे शिक्षण मुलांना देणें, निरोगी आहार, शारीरिक गतिविधी आणि काम व जीवन संतुलित करणारे छंद जोपासणें यांद्वारे शक्य आहे.

 1. मानसिक आजार ची लक्षणे - Symptoms of Mental Disorder in Marathi
 2. मानसिक आजार चा उपचार - Treatment of Mental Disorder in Marathi
 3. मानसिक आजार साठी औषधे
 4. मानसिक आजार चे डॉक्टर

मानसिक आजार ची लक्षणे - Symptoms of Mental Disorder in Marathi

प्रत्येक प्रकारच्या मानसिक आजाराची लक्षणे वेगळी असतात. ही पुढीलप्रकारे असतातः

अस्वस्थतेची लक्षणे

अस्वस्थेच्या आजारांची अनेक रूपे असतात, आणि त्यापैकी प्रत्येक रूप आपल्या पद्धतीने वेगळे आहे. अस्वस्थतेत दिसणारी काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणें:

 • करिअर,पैसा आणि आरोग्य इ. यांसारख्या जीवनातील परिस्थिती आणि घटनांची सतत चिंता राहणें.
 • झोपेची व्यवस्था विस्कळीत होणें किंवा निद्रानाश
 • डोके, अंग किंवा स्नायूंमध्ये निष्कारण वेदना
 • व्यक्ती अनुभव करू शकेल असे,हृदयाचे ठोके अनियमित, गोंगाटी आणि जलद पडणें.
 • मळमळ आणि चक्कर येणें.​​

अवसादाची लक्षणे

अवसादग्रस्त मनामध्ये  खूप काही चाललेले असते. त्यापैकी काही निव्वळ दाबलेले विचार असू शकतात, जे स्पष्ट ओळखू येत नाहीत. तथापी, काही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये लगेच धोक्याचा गजर वाजू शकतो.

 • दुःख किंवा रिकामेपणाची भावना.
 • खूप खाणें किंवा उपाशी राहणें, ज्यामुळे अनुक्रमे वजनात वाढ किंवा घट होईल.
 • झोप न लागणें किंवा अत्यधिक झोपणें.
 • थकव्याची सतत जाणीव.
 • शरिरात विविध प्रकारच्या वेदना
 • पचनात्मक समस्या
 • आशावादाचे अभाव.
 • अनुपयोगितेची भावना.
 • अस्वस्थता आणि अपराधीपण्याची भावना
 • आत्महत्येचे विचार व प्रवृत्ती.

स्किझोफ्रेनिआची लक्षणे

स्किझोफ्रेनिआची लक्षणे व्यक्तीपरत्त्वे वेगळी असतात, विशेषकरून किशोर आणि प्रौढांमध्ये.

 • किशोर
  • हॅल्युसिनेशन (अस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवणें).
  • झोप न लागणें.
  • एकलकोंडेपणा.
  • उत्साह कमी होणें.
  • शैक्षणिक प्रदर्शन खाली येणें.
 • प्रौढ व्यक्ती
  • असत्य विश्वास आणि हॅल्युसिनेशन.
  • अस्पष्ट, अप्रासंगिक व अपूर्ण संवाद
  • माघारपूर्ण व्यवहार, राग किंवा आक्रमकतेचे झटके, प्रतिक्रियात्मकता.
  • स्वतःची योग्य निगा व स्वच्छता न राखणें.
  • सामाजिक मेलजोलीपासून पळणें.

ऑटिझम

ऑटिझमची विविध लक्षणे असू शकतात, पण दृश्य लक्षणांची संख्या या आजारात कमालीची आहे. यापैकी सर्वांत स्पष्ट दिसणारी आणि सामान्य लक्षणे पुढील पैलूंवर प्रभाव पाडतातः

 • संवाद
  यामध्ये उशीर होऊ शकते आणि काही वेळा ते दोन वर्षाच्या वयातही होत नाही, आणि बाळ बोलण्यापासून बोबडेपण्याकडे माघार घेऊ शकते. त्याचबरोबर, मुले आपल्या संवादात भावना प्रकट करण्यास असमर्थ असतात, कटाक्ष समजत नाहीत, बोलवल्यावर प्रतिसाद देत नाहीत आणि संवाद करतांना संवेदना प्रकट करू शकत नाहीत.
 • व्यवहार 
  सर्वात लक्षणीय सवय म्हणजे पुनरावर्तनात्मक घडण, ज्यामध्ये फडफड किंवा डळमळ सामील असू शकते. मुलांमध्ये अजब वस्तूंशी नजीकपणा असतो. त्यांना अनेक सूचनांचे आकलन होत नाही आणि त्यांच्या एकाग्रतेचा काळावधीफ फार कमी असतो. त्यांच्यात हस्तकौशल्य नसते आणि ते पकड आणि हालचालीमध्ये अव्यवस्थित असतात. प्रकाश, ध्वनी आणि स्पर्शालाही ते खूप संवेदनशील असतात.
 • समाजात मिसळणें 
  मुले साधारणपणें एकटे राहतात आणि मर्यादित किंवा न्यूनतम प्रमाणात समाजात मिसळतात. ते आपल्यातच खूष राहतात आणि दीर्घकाळ एकच कोणतेतरी काम करत राहतात. भावना प्रकट होतील, असे नेत्रसंपर्क ते बनवू शकत नाहीत आणि काही विचारल्यावर एक शब्द किंवा काही शब्दांतच उत्तर देतात.
 • माघार 
  लक्षणांमध्ये सुधार दिसून येऊनही परत मुलाच्या अवस्थेकडे माघार घेणें अतिशय सामान्य आहे.

मानसिक प्रगतिरोधाची लक्षणे

याची लक्षणे सामान्यीकृत करण्यास अवघड असतात, कारण ती प्रकाराप्रमाणें वेगवेगळी असतील. काही लक्षणे प्रत्येक प्रकरणात दिसू शकतात, उदा.:

 • बसणें, रेंगाळणें, उभा राहणें आणि चालणें यांसारख्या वाढीच्या टप्प्यांमध्ये उशीर.
 • उशिरा बोलायला सुरू करणें किंवा अस्पष्ट बोलणें.
 • वयाला साजेसे नसलेले व्यवहार.
 • ७०पेक्षा कमी बुद्ध्यांक.
 • दैंनदिन गतिविधी किंवा स्वतःचा सांभाळ करू न शकणें.
 • स्मरणशक्ती कमी असणें.
 • तर्कशुद्ध विवेकाचे अभाव किंवा कृतींच्या परिणामांचा अंदाज न घेऊ शकणें.
 • प्रतिक्रियात्मकता असणें व जिज्ञासा नसणें.
 • निर्भरता आणि कमी स्वाभिमान.
 • एकाग्रतेची उणीव, हट्टीपणा आणि निराशा.
 • सामाजिक गतिविधींत निष्क्रियता आणि माघार.

एकाग्रताहीनता अतीसक्रीयता रोगाची(एडीएचडी) लक्षणे.

एडीएचडीची काही सामान्य लक्षणें याप्रमाणें आहेतः

 • लक्ष न लागणें.
 • एकाग्रता खूप कमी असणें.
 • पटकन लक्ष निघून जाणें.
 • विसराळूपणा.
 • नेमलेले काम न करू शकणें.
 • सूचना न पाळू शकणें.
 • थोडा वेळ ही शांत किंवा स्थिर बसणें अवघड असणें.
 • अस्वस्थता आणि लहरी प्रवृत्ती.
 • दुसरे बोलत असतांना व्यत्यय आणणें.

मानसिक आजार चा उपचार - Treatment of Mental Disorder in Marathi

अस्वस्थेतवरील उपचार

अस्वस्थतेसाठी कोणतेही विशिष्ट प्रकारचे उपचार विहित केलेले नाही, कारण वेगवेगळे लोक विभिन्न पद्धतींना अनुकूल प्रतिसाद देतात. तथापी, बहुतांश प्रकरणांमध्ये, उपचाराच्या विभिन्न प्रकारांचे समायोजन वापरले जाते.

 • सांगोपांग वैद्यकीय सल्ला हे निश्चित करण्यासाठी आवश्यक आहे की, परिस्थिती निव्वळ शारीरिक नाही आणि एखाद्या शारीरिक अवस्थेमुळे झालेली नाही.
 • लक्षणे शमवण्यात मदत म्हणून औषधे विहित केले जात. टोकाच्या प्रकरणांमध्ये अवस्थताशामक औषधांची गरज पडू शकते.
 • प्रतिसादात्मक व्यवहार उपचारपद्धत व्यक्तीच्या भावना सखोलपणें समजून त्यांना सामोरे जाण्याच्या योग्य पद्धती शोधण्यासाठी वापरली जाते.

अवसादाचे उपचार

अवसादाचे उपचार त्रिआयामी असते. उपचाराच्या मुख्य क्रमामध्ये या गोष्टींचा समावेश असतो:

 • अवस्थेचे उपचार करण्यासाठी अवसादरोधी औषधांचा वापर होतो. त्यांना बहुतांशी तीव्रतेच्या प्रकरणांमध्ये विहित केले जाते आणि मुलांच्या बाबतीत कधीच नाही.
 • मानसिक उपचार वैय्यक्तिक स्वरूपाच्या समस्यांचे व्यवस्थापन व हाताळणी यावर केंद्रित असते. काही वेळा, सामूहिक पद्धतीचा सल्लाही दिला जाऊ शकतो.
 • अवसादाला सामोरे जाण्यासाठी  प्रायोगिक उपाय सुचवायला सहकारी,मित्र, शेजारी आणि कुटुंबीयांसारखे साहाय्यगटे महत्त्वाची असतात आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती व्यक्तीला मदत करतात.
 • टोकाच्या व विक्षिप्त अवसादाच्या प्रकरणांमध्ये, इलेक्ट्रोकंव्हल्झिव्ह थेरपी केली जाऊ शकते.

स्किझोफ्रेनिआवरील उपचार

स्किझोफ्रेनिआवरील उपचारामध्ये विविध उपाय, समस्येला सोडवण्यासाठी आणि निरंतर सुधाराची खात्री देण्यासाठी अवलंबले जातात. उपचारामध्ये खाली मुद्द्यांचा समावेश असतोः

 • औषधोपचार
  एंटी-सायकोटिक औषधे म्हणजे सर्वांत सामान्यरीत्या विहित केली जाणारी औषधे. यामुळे वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांना हाताळता येते. एंटीसायकोटिक्स वापरून केल्या जाणार्र्या उपचारामध्ये शक्यतो सर्वांत कमी मात्रेला प्राधान्य दिला जातो.
 • इलेक्ट्रोकन्वल्झिव्ह आणि चुंबकीय थेरपी
  हॅल्युसिनेशन होणार्र्या व्यक्तींना याचा सल्ला दिला जातो.
 • मानसिक-सामाजिक उपचार
  ही क्लिष्ट उपचारपद्धत असून यामध्ये प्रतिक्रियात्मक व्यवहार पद्धत, सामूहिक पद्धत, पुनवर्सनसाठी कौशल्यआधारित प्रशिक्षण आणि मद्य व मादक पदार्थांच्या व्यसनाला लढा देण्यासाठी उपचार सामील असतात.

ऑटिझमवरील उपचार

ऑटिझमवरील उपचार वास्तविकरीत्या असंभव आहे आणि सर्व वैद्यकीय हस्तक्षेपांचा भर व्यक्ती व कुटुंबाला परिस्थितीला महत्तम तोंड देण्यास सज्ज करण्यावर असतो.

 • वांछित व्यवहाराला प्रोत्साहन व अवांछित गोष्टींना न्यूनतम करण्यासाठी व्यवहार व्यवस्थापन.
 • व्यक्तीचे विचार, भावना व अवस्था सामान्य करण्यावर केंद्रित असलेली प्रतिक्रियात्मक व्यवहार पद्धत.
 • काही प्रमाणात स्वावलंबिता विकसित करून इतरांवर विसंबून राहणें कमी करण्यासाठी कार्यात्मक पद्धत.
 • सामान्य शारीरिक हालचाली आणि बारीक परिचालनात्मक कौशल्य विकसित करण्यासाठी शारीरिक उपचार.
 • वाचेत स्पष्टता आणण्यासाठी व विचार आणि भावना प्रकट करणें शक्य होण्यासाठी वाचिक उपचार.
 • मुलांना वातावरणात मिसळणें आणि अर्थपूर्ण संबंध बनवणें शक्य होण्यासाठी सामाजिक कौशल्य उपचार.
 • आरोग्य सुधारून कमतरतेचे रोग टाळता यावेत, म्हणून पोषण उपचार.
 • आकड्या किंवा अवसाद येत असलेल्या प्रकरणांमध्ये औषधे विहित केली जाऊ शकतात.

मानसिक प्रगतिरोधावरील उपचार

यावरील उपचार एक खूप दीर्घ काळाची प्रक्रिया असून, त्यामध्ये नियमित समुपदेशानी गरज असते. विशिष्ट अनुरूपीकृत कार्यक्रम मुलांसाठी विहित केले जातात, जेणेकरून त्यांना शाळेत जाण्यास मदत मिळावी. तेव्हा एका विशेष शिक्षकाची गरज असते, जो न केवल मुलाच्या वैय्यक्तिक गरजांवर लक्ष ठेवणे, तर त्याला जीवनकौशल्य लवकर प्राप्त करण्यास साहाय्यही करेल.

अशा प्रकरणांमध्ये तडजोडीचे महत्त्वाचे निकष म्हणजे शिक्षणातील गोष्टी शक्य तेवढे अधिक अनुभव करायला मुलांना शिकवणें आणि सामाजिक व जीवन कौशल्य सुधारणें. हे उपलब्ध करता यावे म्हणून, खालीलपैकी काही उपचारांच्या समायोजनाचे वापर केले जाऊ शकते:

 • समुपदेशन
 • कार्यात्मक पद्धत
 • व्यवहार पद्धत
 • औषधोपचार (खूप कमी प्रकरणांमध्ये)

एडीएचडीवरील उपचार

उपचाराचे विभिन्न क्रम असतात, ज्यामध्ये पर्यायी व नैसर्गिक उपचारपद्धतींचा समावेश आहे. संप्रेरक व बिगरसंप्रेरकांच्या रूपात मेंदूमधील डॉपमाइन किंवा नोरेपाइनफ्रीनचे स्तर वाढवण्यासाठी औषधे दिली जाऊ शकतात. फायदे स्पष्टपणें होत असले, तरी सहप्रभावही होऊ शकतात.

नैसर्गिक उपचारांमध्ये निरोगी आहार, शारीरिक गतिविधींमध्ये गुंतणें आणि झोपेच्या व्यवस्थेचे पालन करणें सामील आहे. योग आणि ध्यानधारणासारख्या कृतींचेही एकाग्रता वाढवण्या आणि तणाव कमी करण्यातील प्रभाव दिसून आले आहे.

Dr. Saurabh Mehrotra

Dr. Saurabh Mehrotra

मनोचिकित्सा

Dr. Om Prakash L

Dr. Om Prakash L

मनोचिकित्सा

Dr. Anil Kumar

Dr. Anil Kumar

मनोचिकित्सा

मानसिक आजार साठी औषधे

मानसिक आजार के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Trinicalm PlusTrinicalm Plus 5 Mg/2 Mg Tablet12
ADEL 31 Upelva DropADEL 31 Upelva Drop200
BenzyzineBenzyzine 10 Mg/2 Mg Tablet0
Espazine PlusEspazine Plus 5 Mg/2 Mg Tablet21
FluhexetteFluhexette Tablet11
Fluhex ForteFluhex Forte Tablet21
FluhexFluhex Tablet17
Halocalm PlusHalocalm Plus Tablet17
HexyzineHexyzine 5 Mg/2 Mg Tablet6
KivicalmKivicalm 10 Mg/2 Mg Tablet0
Lacalm PlusLacalm Plus 5 Mg/2 Mg Tablet0
Bjain Stramonium LMBjain Stramonium 0/1 LM39
Maphyl ForteMaphyl Forte 5 Mg/2 Mg Tablet11
Nucalm PlusNucalm Plus 5 Mg/2 Mg Tablet33
Olcam PlusOlcam Plus 5 Mg/2 Mg Tablet10
PeradylPeradyl 5 Mg/2 Mg Tablet12
ChlorfluhexChlorfluhex 50 Mg/2 Mg/5 Mg Tablet19
Relicalm PlusRelicalm Plus 10 Mg/2 Mg Tablet12
Egret PlusEgret Plus 50 Mg/2 Mg/5 Mg Tablet20
Schizonil HSchizonil H 2.5 Mg/1 Mg Tablet8
Lacalm ForteLacalm Forte 50 Mg/2 Mg/5 Mg Tablet16
Schizonil PlusSchizonil Plus 5 Mg/2 Mg Tablet0
Psycolam FortePsycolam Forte Tablet10

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Mental Disorders
 2. American Psychological Association [internet] St. NE, Washington, DC. Anxiety.
 3. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Anxiety Disorders. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
 4. National Institutes of Health; [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Understanding Anxiety Disorders.
 5. American Psychiatric Association [Internet] Washington, DC; What Are Anxiety Disorders?
 6. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Depression. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
 7. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Depression
 8. Markowitz, J.C., Weissman, M. (2004, October). Interpersonal psychotherapy: principles and applications. World Psychiatry. 3(3): 136–139. Retrieved from http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1414693/. PMID: 16633477
 9. Fischer BA, et al. Robert W Buchanan. Schizophrenia in adults: Clinical manifestations, course, assessment, and diagnosis; [Internet]
 10. Health Harvard Publishing, Published: June, 2010. Harvard Medical School [Internet]. Schizophrenia treatment recommendations updated. Harvard University, Cambridge, Massachusetts.
 11. Stone WL, Basit H, Los E. Fragile X Syndrome. [Updated 2019 Apr 25]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-
 12. Am Fam Physician. 2008 Dec 1;78(11):1301-1305. [Internet] American Academy of Family Physicians; AAP Releases Guidelines on Identification of Children with Autism Spectrum Disorders.
 13. Eunice Kennedy Shriver National Institute of Child Health and Human; National Health Service [Internet]. UK; What are the treatments for autism?
 14. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Facts About Intellectual Disability
 15. National Institutes of Health; [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Intellectual and Developmental Disabilities.
 16. Bonath B, et al. (2016). Regional gray matter volume differences between adolescents with ADHD and typically developing controls: Further evidence for anterior cingulate involvement. DOI: J Atten Disord. 2018 May;22(7):627-638. PMID: 26748338
 17. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Attention-Deficit/Hyperactivity Disorder. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
 18. Zylowska L, et al. (2007). Mindfulness meditation training in adults and adolescents with ADHD: A feasibility study. DOI: J Atten Disord. 2008 May;11(6):737-46. Epub 2007 Nov 19. PMID: 18025249
और पढ़ें ...