myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

मायड्रियासिस काय आहे ?

जेव्हा लाईट डोळ्यातून परावर्तित होते, तेव्हा अंधारात डोळ्याची बाहुली /प्यूपील  जास्त लाईट येण्यासाठी विस्तारते किंवा रुंद होते आणि प्रकाशात आकुंचन पावते. मायड्रियासिस  अशी परिस्थिती आहे जिथे डोळ्यांची बाहुली सहा मिलीमीटर पेक्षा जास्त आकारामध्ये विस्तारते. लाईट मध्ये आल्यावर डोळ्यांची बाहुली आकुंचन पावत नाही.

याचे मूख्य  चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • याचे विशिष्ट लक्षणे म्हणजे प्यूपील चा आकार लाईट च्या प्रमाणाबरोबर बदलत नाही. ते सामान्य पेक्षा मोठे राहते.
 • अंधुक दृष्टी.
 • डोळ्यांच्या बाजूला आणि कपाळावर आकुंचन वाटणे.   
 • डोकेदूखी.
 • चक्कर येणे.
 • डोळ्यांमध्ये जळजळ होणे.
 • डोळ्यांच्या हालचाली कठीण होणे .
 • पापण्या मलूल होणे.

याचे मूख्य कारणे काय आहेत?

मायड्रियासिस चे मूख्य कारण आहे:

 • आघात.
 • अँटी-हिस्टामीन सारखी औषधे आणि स्नायू शिथिल करणारी औषधे.
 • ड्रग अब्युज आणि व्यसन.
 • प्यूपिलरी मज्जातंतूला इजा होणे.
 • क्लोज -अँगल ग्लुकोमा.
 • जिम्सन वीड, अँजेल्स टृम्पेट आणि बेलाडोना कुटुंबातील सदस्य यासारखे झाडे.
 • वारंवार डोकेदूखी होणे/मायग्रेन चा इतिहास असणे.
 • तणाव.
 • ऑक्सिटोसिन च्या मात्रेत वाढ होणे.
 • क्रेनियल नर्व्ह ला इजा होणे, मेंदूला इजा होणे किंवा मेंदूतील दाब वाढणे.
 • संसर्ग किंवा डोळ्याला दुखापत होणे.
 • मधूमेह.

याचे निदान आणि उपचार काय आहे ?

निदान :

 • वैद्यकीय आणि औषधांचा इतिहास कारण लक्षात घेण्यासाठी जाणून घेणे.
 • प्रखर वातावरणात प्यूपील वारंवार रुंद होत असल्याच्या खुणा दिसत असेल तर ते लक्षात घेणे.
 • डोळ्यांच्या स्नायू चे कार्याचे परीक्षण करण्यासाठी व्हिजुअल ॲक्यूटी आणि ऑक्युलर मोटिलिटी सारख्या टेस्ट करणे.
 • 1% पिलोकार्पीन ड्रॉप्स सांगितले जाते, जे साधारणपणे डोळ्यात टाकल्याच्या 45 मिनिटानंतर प्यूपिलचे आकुंचन करतात.

प्रतिबंध:

 • डायरेक्ट सूर्यप्रकाश टाळा.
 • प्रखर वातावरणात जातांना सनग्लासेस चा वापर करा.
 • डोळ्यांच्या जवळ घेवून वाचणे टाळा.

उपचार:

 • डोळ्यांचे कार्य वाचवण्यासाठी उपचार दिले जातात. कारणे लक्षात घेऊन त्यावर आधारित उपचार केले जातात.
 • डोळ्यांची रचना किंवा मज्जातंतू ला झालेली इजा ठीक करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

 

 

 

 

 

 

 

 1. मायड्रियासिस साठी औषधे

मायड्रियासिस साठी औषधे

मायड्रियासिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Sunephrine H खरीदें
Optimide Plus खरीदें
Tropac P खरीदें
Tropicacyl Plus खरीदें
Opulus खरीदें
Tropicon Plus खरीदें
Tropicamet Plus खरीदें
Atropine Sulphate खरीदें
Atropin (Life) खरीदें
Atrosulph खरीदें
Atrosun खरीदें
Atrowok खरीदें
Atro खरीदें
Bell Mfc खरीदें
Opthopin खरीदें
Topin खरीदें
Tropine खरीदें
Ataron खरीदें
Atpin खरीदें
Atromet खरीदें
Atropa खरीदें
Atropine Sulphate (Pharmtak) खरीदें
Atropine खरीदें

References

 1. Spector RH. The Pupils. In: Walker HK, Hall WD, Hurst JW, editors. Clinical Methods: The History, Physical, and Laboratory Examinations. 3rd edition. Boston: Butterworths; 1990. Chapter 58.
 2. American Academy of Ophthalmology [Internet] California, United States; Pupil Efferent Defects.
 3. Wilhelm H,Wilhelm B,Schiefer U. Mydriasis caused by plant contact. Fortschr Ophthalmol. 1991;88(5):588-91. PMID: 1757054
 4. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Lidocaine Usage for Pupil Dilatation (Mydriasis).
 5. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Optimal Method for Mydriasis in Cataract Surgery.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें