myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सारांश

मेंदूची गाठ म्हणजे मेंदूच्या पेशींची असामान्य वाढ. या गाठी हानीरहित (सौम्य) किंवा कर्करोगास कारणीभूत  (घातक) होऊ शकतात. मेंदूच्या आत ज्या गाठी बनतात त्यांना प्राथमिक मेंदूची गाठ म्हटले जाते. दुस-या प्रकारची गाठ किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर, जे शरीराच्या इतर भागामध्ये कर्करोग होऊन मेंदूच्या भागाकडे सरकल्याने होतो. मेंदूतील गाठीची लक्षणे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतात उदा. गाठीचा आकार, गाठीच्या वाढीची गती आणि गाठ असलेले स्थान. मेंदूतील गाठीच्या काही प्रारंभिक आणि सामान्य लक्षणांमध्ये डोकेदुखीचे बदलते व्यवहार, वारंवार आणि तीव्र डोकेदुखी, बोलण्यातील समस्या आणि शरीराचा संतुलन राखण्यात अडचण यांचा समावेश होतो. गाठीवरील उपचार गाठीचा प्रकार , आकार व स्थान यांवर अवलंबून असतात.

 1. मस्तिष्क अर्बुद काय आहे - What is Brain Tumour in Marathi
 2. मस्तिष्क अर्बुद ची लक्षणे - Symptoms of Brain Tumour in Marathi
 3. मस्तिष्क अर्बुद चा उपचार - Treatment of Brain Tumour in Marathi
 4. मस्तिष्क अर्बुद साठी औषधे
 5. मस्तिष्क अर्बुद चे डॉक्टर

मस्तिष्क अर्बुद काय आहे - What is Brain Tumour in Marathi

मेंदूतील गाठ म्हणजे असा मांसाचा गोळा किंवा मांसाची वाढ, जो मेंदूतील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे तयार होतो. मेंदूच्या पेशींच्या या अनियंत्रित वाढीचे अचूक कारण अजून स्पष्ट नाही. तथापी, गाठ होण्याच्या 20 कारणांपैकी एक, अनुवांशिकतेतून मिळालेल्या एखादे जनुक असे आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या प्राणांना मेंदूची गाठ होण्याचा अधिक धोका असतो.

130 पेक्षा अधिक प्राथमिक मेंदू व मज्जातंत्रातील गाठी आहेत, जे वेगवेगळ्या गटांत विभागले जातात आणि त्यांची नावे मेंदूतील त्याच्या स्थानावर, कोणत्या पेशी विकसित होतात आणि त्या किती लवकर वाढतात व पसरतात यावर आधारित आहेत. घातक किंवा कर्करोगयुक्त असलेल्या मेंदूच्या गाठी दुर्मिळ आहेत (अशा गाठी प्रौढांमधील सर्व कर्करोगांपैकी जवळजवळ 2% एवढी असतात) . मेंदूंची गाठ असलेल्या लोकांमध्ये वाचण्याचा दर अत्यंत कमी राहिला आहे, ज्याच्या परिणामी इतर प्रकारचय कर्करोगांच्या तुलनेत रुग्णाच्या जगण्याचे प्रमाण कमी असते. पण मेंदूची गाठ नक्की काय आहे आणि ती कशी बनते? मेंदूच्या गाठी का होतात? आणि या गाठींवर होणारे नेमके उपचार कोणते आहेत? मेंदूच्या गाठीबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.

मस्तिष्क अर्बुद ची लक्षणे - Symptoms of Brain Tumour in Marathi

मेंदूच्या गाठीच्या प्रकारावरून आणि स्थानानुसार, त्या गाठींची भिन्न लक्षणे ठरविली जातात. शरीराच्या भिन्न कार्यांची मेंदूच्या वेगवेगळ्या भागांवर जबाबदारी असल्यामुळे, गाठीद्वारे प्रभावित भागांत त्यानुसार लक्षणे दिसतात. मेंदूतील गाठीची काही सामान्य लक्षणे येथे देतआहोत:

 • डोकेदुखी
  त गाठ असलेल्या रुग्णांपैकी सुमारे 20% रुग्णांमधील प्रारंभिक लक्षण डोकेदुखी हे आहे. गाठ असलेल्या व्यक्तीमधील डोक्याचे दुखणें अनियमित असू शकते, पहाटे असे दुखणें वाढू शकते, त्यानंतर दिवसाच्या मध्यभागी उलट्या होऊ शकतात किंवा ही डोक्याचे दुखणें, खोकल्याने किंवा शारिरीक स्थितीत बदल करतांना (उदा. उठून बसतांना व बसून उभे राहत असतांना) आलेल्या डोक्याच्या कवटीवर दबावाने, वाढू शकते.
 • ग्लानी
  ची गाठ असलेल्या काही व्यक्तींमध्ये, डोकेदुखीऐवजी, ग्लानी येणे हे मेंदूच्या गाठीचे पहिले लक्षण असू शकते. मेंदूतील काही असामान्य विद्युतीय क्रियांमुळे ग्लानींचे झटके येऊ पाहतात. मेंदूत गाठ असलेल्या व्यक्तीमध्ये हे झटके, अचानक आपली चेतना गमावण्याच्या, शारीरिक कार्यांवर नियंत्रण गमावण्याच्या, किंवा कमी काळासाठी (30 सेकंद एवढ्या वेळेसाठी) श्वासोच्छवासाची क्रिया न होऊ शकल्याने त्वचेचे निळे पडण्याच्या स्वरूपात येऊ शकतात.
 • स्मृतीभ्रंश
  मेंदूच्या गाठीमुळे रुग्णाला स्मृतीच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. विकिरण किंवा शस्त्रक्रियेसारख्या उपचारांमुळेही त्याला स्मृतीच्या समस्या होऊ शकतात. मेंदूत गाठ असलेल्या रुग्णांमध्ये, थकवा, स्मृतीच्यासमस्या आणखी वाढू शकतात. दीर्घकालिक स्मृतीपेक्षा रुग्णाची अल्पकालिक स्मृती अधिक प्रभावित होते (मिळवतांना हवा असलेला दूरध्वनी क्रमांक विसरणे). (अधिक वाचा: स्मृतीभ्रंश - त्यामागील कारणे)
 • निराशा
  संशोधकांचे असे देखील म्हणणे आहे की मेंदूत गाठ असलेल्या चारमधील एक रुग्णाला मोठ्या पातळीचे अवसादात्मक आजार होऊ शकते. या आजारात अवसाद रुग्णालाच न होता त्याच्या आप्तेष्टांमध्येही दिसू शकते. आधी करायला, पहायला किंवा ऐकायला रुचिकर वाटत होत्या, त्या गोष्टींमध्ये रुग्णाचे मन न लागणें, निद्रानाश, ऊर्जा कमी असल्यासारखे वाटणें, आपण अनुपयोगी असल्याची भावना, कोणत्याही परिस्थितीत उदास राहणें आणि हेच काय, तर आत्महत्येचे विचारही येऊ शकतात आणि या सगळ्या अवसादाच्या सूचना आहेत.
 • रुग्णाच्या व्यक्तिमत्वातील बदल आणि मूड स्वींग्स
  तील गाठी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात बदल देखील घडवू शकतात. जी व्यक्ती आधी स्वयंप्रेरित आणि गतिशील होती, तीच व्यक्ती नकारात्मक आणि निष्क्रीय होऊ शकते. गाठ व्यक्तीच्या विचार आणि क्रियाशीलतेवर प्रभाव पाडू शकते. तसेच, कीमोथेरपी आणि विकिरण यांसारख्या उपचार प्रक्रियांमुळे मेंदूच्या कार्यांमध्ये आणखी व्यत्यय येऊ पाहतो.  मेंदूत गाठ असलेल्या रुग्णांमध्ये सामान्यतः अचानक आणि अस्पष्ट मूड स्विंग दिसतात.
 • विचार करण्याशी संबंधित कार्ये
  त गाठ असलेल्या रुग्णांमध्ये एकाग्रता व लक्ष केंद्रित करण्याची शक्ती बदलते, संवाद व भाषा बदलते आणि बुद्धीमत्ता कमी होते. मेंदूच्या वेगवेगळ्या ठिकाणी उदा. पॅरिएटल, फ्रन्टल किंवा टेम्पोरल लोब्समधे, तयार झालेल्या गाठी एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करू शकतात.
 • केंद्रीय लक्षणे
  केंद्रीय लक्षणे किंवा स्थानीकृत लक्षणे अशी आहेत जी मेंदूच्या केवळ विशिष्ट भागाला प्रभावित करू शकतात. ही लक्षणे गाठीचे ठिकाण ओळखण्यास मदत करू शकतात. दुहेरी दृष्टी, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, डोके दुखणें किंवा डोके बधीर वाटणे ही काही विशिष्ट केंद्रीय लक्षणे आहेत. ही लक्षणे स्पष्टपणे गाठीमुळे आणि त्याच्या मेंदूतील स्थानामुळे आहेत.
 • मास इफेक्ट
  कवटीमधल्या घट्ट जागेतील गाठीच्या वाढीमुळे, गाठ त्याच्या भोवतील निरोगी तंतूंवर दबाव आणण्यास सुरूवात करते, आणि याच्या परिणामाला मास इफेक्ट (मोठ्या प्रमाणावरील प्रभाव) असे म्हणतात. गाठीजवळ द्रव्य तयार होत असल्यामुळे, मेंदूतील दबावात आणखी वाढ होते. मास इफेक्टच्या लक्षणांमध्ये वर्तनातील बदल, गुंगी, उलटी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
 • थकवा
  ची गाठ असलेल्या रूग्णांमध्ये सामान्यतः थकव्याची विशिष्ट लक्षणे जसे निद्रानाश, अशक्तपणा, चिडचिड, अचानक थकल्यासारखे वाटणे आणि एकाग्रतेतील अडचणी दिसून येतात.

मस्तिष्क अर्बुद चा उपचार - Treatment of Brain Tumour in Marathi

मेंदूतील गाठीचे उपचार गाठीचे स्थान, आकार आणि गाठीची वाढ, रुग्णाची एकूण आरोग्य स्थिती आणि रुग्णाच्या उपचार प्राथमिकतांसारख्या बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. मेंदूच्या गाठीवरील उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या काही उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेतः

 • शस्त्रक्रिया
  तील गाठीचे स्थान पोचण्यासारखे असल्यास, डॉक्टर शस्त्रक्रिया करून शक्य तितक्या गाठी काढून टाकतात. कधीकधी गाठ लहान असते आणि  मेंदूच्या इतर पेशींपासून वेगळा करता येतो. म्हणून, शस्त्रक्रिया करणे सोपे असते. शस्त्रक्रिया करुन काही प्रमाणात गाठ वेगळे केल्याने, शस्त्रक्रिया मेंदूच्या गाठीची लक्षणे कमी करण्यास मदत होते. कानांशी जोडलेल्या गाठीवरील शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव, संक्रमण किंवा इतर जोखमा असू शकतात.
 • विकिरण पद्धत
  क्षकिरण किंवा प्रोटॉनसारखे उच्च-ऊर्जा किरण, गाठीच्या पेशी मारण्यासाठी विकिरण पद्धतीचे भाग म्हणून वापरले जातात. हे करताना एक तर उपकरण रुग्णाच्या शरिराबाहेर ठेऊन बाहेरील बीम रेडिएशन करतात किंवा रुग्णाच्या शरिरात, मेंदूच्या गाठीशेजारी ठेऊन (ब्रॅचीथेरपी) रेडिएशन देतात. प्रोटॉन थेरेपी केल्याने, जो विकिरणाचा एक नवीन प्रकार आहे, गाठ मेंदूच्या संवेदनशील भागाच्या जवळ असल्यास, विकिरणसंबंधी  अवांछित परिणामांचा जोखम कमी होतो. संपूर्ण मेंदूचे विकिरण शरीराच्या इतर भागांपासून पसरलेल्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी केले जाते. कर्करोगात अनेक गाठी बनतात , तेव्हाही हे वापरले जाते. विकिरणादरम्यान किंवा पद्धतीच्या नंतर लगेचचे दुष्परिणाम विकिरणाची मात्रा आणि रुग्णाला दिल्या गेलेल्या  विकिरण प्रकारावर अवलंबून आहे.
 • रेडिओसर्जरी
  छोट्या भागातील गाठीच्या पेशी मारण्यासाठी रेडिओसर्जरी पद्धतीमध्ये एकाधिक रेडिएशन बीम वापरतात. मेंदूतील गाठीच्या रेडिओसर्जरीमध्ये वापरला जाणारा गामा चाकू किंवा रेखीय प्रवेगकही अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानांपैकी एक आहे. ही शस्त्रक्रिया सामान्यतः एक-दिवसीय उपचारपद्धती आहे आणि बहुतेक रुग्ण त्याच दिवशी घरी जातात.
 • कीमोथेरपी
  कीमोथेरपी एक कर्करोगाचा उपचार आहे, ज्यात गोळ्या किंवा लसीकरणाचा वापर होतो व त्यामुळे गाठीच्या पेशी मरतात. मेंदूच्या गाठीचा प्रकार आणि चरणावर अवलंबून, कीमोथेरपीची अनेक उपचारांपैकी एक पर्याय म्हणून सल्ला दिला जाऊ शकतो. मेंदुच्या गाठीच्या केमोथेरपीमध्ये सर्वसाधारणपणे वापरली जाणारी औषधे म्हणजे टेम्पोजोलोमाइड , जी गोळी म्हणून दिली जातात. गाठीमुळे किंवा कोणत्याही सुरू असलेल्या उपचारांमुळे आलेली सूज कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा उपयोग औषधोपचारांमध्ये केला जातो. औषधे आणि त्यांचे दुष्परिणाम केमोथेरपीसाठी वापरल्या जाणाऱ्या मात्रा आणि प्रकारांवर अवलंबून असतात.
 • केंद्रित औषधोपचार
  हे उपचार कर्करोगाच्या पेशींमध्ये आढळून येणाऱ्या विशिष्ट असामान्यतांवर लक्ष केंद्रित करते. याथेरपीमध्ये वापरल्या जाणारी औषधे कर्करोगाच्या पेशींना लक्ष करतात आणि त्यांना मारतात. औषध देण्याच्या प्रणालींच्या विविध प्रकारांवर परीक्षण व विकास चालू आहे.
Dr. Ashok Vaid

Dr. Ashok Vaid

Oncology
31 वर्षों का अनुभव

Dr. Susovan Banerjee

Dr. Susovan Banerjee

Oncology
16 वर्षों का अनुभव

Dr. Rajeev Agarwal

Dr. Rajeev Agarwal

Oncology
42 वर्षों का अनुभव

Dr. Nitin Sood

Dr. Nitin Sood

Oncology
23 वर्षों का अनुभव

मस्तिष्क अर्बुद साठी औषधे

मस्तिष्क अर्बुद के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Evertor खरीदें
Dexoren S खरीदें
Gliotem खरीदें
Gliozolamide खरीदें
Glioz खरीदें
Low Dex खरीदें
Nublast खरीदें
Temcad खरीदें
Temcure खरीदें
Temodal खरीदें
Temokem खरीदें
Dexacort खरीदें
Temonat खरीदें
Dexacort Eye Drop खरीदें
4 Quin DX खरीदें
Temoside खरीदें
Solodex खरीदें
Apdrops Dm खरीदें
Tariflox D खरीदें
Glistroma खरीदें
Lupidexa C खरीदें
Dexcin M खरीदें
Imozide खरीदें
Ocugate Dx खरीदें

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Brain Tumors
 2. McKinney PA. Brain tumours: incidence, survival, and aetiology. J Neurol Neurosurg Psychiatry. 2004 Jun;75(suppl 2):ii12-7. PMID: 15146034
 3. Accelerate Brain Cancer Cure [Internet] Washington DC; Tumor Grades and Types
 4. American Association of Neurological Surgeons. [Internet] United States; Classification of Brain Tumors
 5. American Society of Clinical Oncology [Internet] Virginia, United States; Brain Tumor: Grades and Prognostic Factors
 6. American Brain Tumor Association [Internet] Chicago; Signs & Symptoms
 7. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; What Causes Brain and Spinal Cord Tumors in Adults?.
 8. Accelerate Brain Cancer Cure [Internet] Washington DC; Staying Healthy
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें