myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

अकाली प्रसव वेदना म्हणजे काय?

अकाली प्रसव वेदना ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये गर्भाशयाचे नियमित आकुंचन आणि सर्व्हिक्स मध्ये बदल झाल्यामुळे बाळाचा जन्म गरोदरपणाचे 37 आठवडे पूर्ण होण्यापूर्वी होतो.

याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

अकाली प्रसव वेदनेचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात वेगळं चिन्हं आहे प्रसूतीपूर्व गरोदर स्त्रीची गर्भाशयातील पाणी असणारी पिशवी फुटणे म्हणजेच लीक होणे. यामुळे त्यातील सर्व द्रव बाहेर पडतो आणि त्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे.

प्रसव वेदना सुरू होण्यापूर्वीचे इतर चिन्हे आणि लक्षणे देखील दिसून येण्याची शक्यता आहे, ती चिन्हे आहेत:

 • योनि मार्गे जास्त प्रमाणात स्त्राव होणे.
 • योनि मार्गे होणाऱ्या स्त्रावाच्या प्रकारात बदल जसे की रक्त किंवा म्युक्स जाणे.
 • ओटीपोट आणि पेल्व्हीक भागांमध्ये जास्त दाब मिळत असल्याची जाणीव.
 • रोजच्या रोज आकुंचना ची भावना जी वेदनादायक असू किंवा नसू शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अकाली प्रसव वेदनेची कारणे विविध घटकांवर अवलंबून असतात जे प्रसूतीपूर्व ते जन्मपूर्व काळजी आणि वापरण्यात येणाऱ्या औषधांवर आधारित असते. अकाली प्रसव होण्यासाठी यापैकी काही कारणं सुध्दा कारणीभूत असू शकतात जसे की:

 • पूर्वीची प्रसूती ही अकाली झालेली आहे.
 • जुळे,तिळे किंवा अधिक गर्भ असलेली प्रसूती.
 • पूर्वीच्या प्रसूतीनंतर अवघ्या 6-7 महिन्यात पुढील प्रसूती.
 • धूम्रपान, मद्यपान, किंवा स्त्रीरोगतज्ञांनी लिहून न दिलेल्या औषधांचे सेवन करणे.
 • स्थूलता.
 • उच्च रक्तदाब किंवा उच्च साखरेची पातळी सारख्या स्थिती असणे.

याचे निदान आणि उपचार काय आहेत?

अकाली प्रसव चे काही चिन्हे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर पेल्व्हिक ची तपासणी करून सर्व्हीक्समध्ये काही बदल झाला आहे का ते तपासतील; त्याचबरोबर होणाऱ्या आईला देखरेखीखाली ठेवून ठराविक कालावधी नंतर प्रगती तपासली जाईल आणि प्रसूती घडवून आणण्याची गरज आहे का ते तपासले जाईल. त्याच बरोबर, प्रसूतीच्या योग्य वेळेचे निदान करण्यासाठी तुमचे स्त्रीरोगतज्ञ तुमची ट्रान्सवजायनल अल्ट्रासाउंड करण्याचे सुचवतील ज्यामुळे सर्व्हिक्स किती उघडलं आहे याचा ते अंदाज घेतील.

जर काही निकाल अकाली प्रसूतीची चिन्हे दर्शवित असतील तर, मग होणाऱ्या आईला ॲडमिट करून इंट्राव्हेन्स (आयव्ही) ड्रीप लावून योनि मार्गे प्रसूती साठी आकुंचना ची देखरेख केली जाते किंवा जर योनि मार्गे प्रसूती मध्ये काही गुंतागुंत असेल तर शस्त्रक्रियेची तयारी केली जाते. काही स्थितींमध्ये जर अकाली प्रसव वेदनेने जर बाळाला इजा पोहचण्याची शक्यता असेल तर, काही औषधं देऊन प्रसव वेदना कमी केल्या जातात. प्रसव वेदना आणि प्रसूती लांबवण्याकरिता गरोदर स्त्रीला टोकोलिटिक्स किंवा मॅग्नेशियम सल्फेट सारखी औषधं दिली जाऊ शकतात.

योग्य वेळेस प्रसूती ही गरोदर स्त्रीच्या अवतीभोवतीच्या वातावरणावर आणि तिला मिळणाऱ्या काळजी वर अवलंबून असतं. चांगली काळजी आणि लक्ष देणारं वातावरण वेळेत प्रसूती आणि निरोगी आणि सुदृढ बालकाला जन्म देण्यास कारणीभूत असतं. यामध्ये दुर्लक्ष झालं तर त्याचे परिणाम बिकट किंवा त्वरित असू शकतात, जे धोकादायक असू शकतात.

 1. अकाली प्रसव वेदना साठी औषधे

अकाली प्रसव वेदना साठी औषधे

अकाली प्रसव वेदना के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Proluton खरीदें
Hpg Depot खरीदें
Hyprocap खरीदें
Uniprogestin खरीदें
Wrolution Depot खरीदें
Cor 9 खरीदें
StayHappi Allylestrenol Tablet खरीदें
Suprex SR खरीदें
Gzltin Tablet खरीदें
Pregtec खरीदें
Astanol खरीदें
Dubnil (Alchemist) खरीदें
Gestin खरीदें
Gravion खरीदें
Lutanin खरीदें
Nidagest खरीदें
Nidanol खरीदें
Pregular खरीदें
Profar खरीदें
Prolin A खरीदें
Anin खरीदें
Fetugard खरीदें

References

 1. American Pregnancy Association. [Internet]; Premature Labor.
 2. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Preterm Birth
 3. Eunice Kennedy Shriver National Institute of Child Health and Human; National Health Service [Internet]. UK; What are the risk factors for preterm labor and birth?
 4. Eunice Kennedy Shriver National Institute of Child Health and Human; National Health Service [Internet]. UK; Preterm Labor and Birth: Condition Information
 5. National Health Portal [Internet] India; Preterm birth
 6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Preterm labor
 7. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Premature infant
 8. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Pregnancy - premature labour
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें