myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

स्कार म्हणजे काय?

जखम बरी झाल्यानंतर त्वचेवर कायमचे खूण /चट्टा पडण्याला स्कार म्हणतात. शरीरावर काप, खरुज किंवा भाजल्या नंतर बरे झाल्यावर ते होतात; याशिवाय त्वचेचे रोग जसे कांजण्या आणि पिंपल, उपचार केल्यावर काही खूणा मागे सोडतात. स्कार गुलाबी किंवा लाल आणि चमकदार दिसते आणि त्वचेवर होते.

याचे चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जखमांच्या प्रकार, प्रभाव आणि त्याचे प्रमाण यावर अवलंबून, या स्कारचे आकार,माप आणि दिसणे भिन्न असते.

 • हायपरट्रॉफिक स्कार.
  • त्वचेतून उंचावलेला / बाहेर आलेला.
  • लालसर किंवा गुलाबी रंगाचा.
  • जखमेच्या सीमेत असणारा.
 • केलोइड्स.
  • त्वचेतून उंचावलेला / बाहेर आलेला.
  • तपकिरी लाल रंगाचा.
  • सामान्य त्वचेवर पसरणारा.
 • यौवनपीटिका /पिंपलची खूण.
  • तीव्र पिंपल गेल्यानंतर देखील खूण राहते.
 • कॉन्ट्रॅक्चर स्कार.
  • भाजल्यानंतर दिसतात.
  • त्वचा घट्ट आणि आकसून जाते.
  • प्रभावित क्षेत्रात कमी हालचाल आणि स्नायू आणि नसा प्रभावित होऊ शकतात.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

जेव्हा त्वचेवर जखम होते आणि ऊतक फाटतात तेव्हा जखमेच्या जागेवर कोलेजन प्रोटीन सोडले जाते आणि गोळा होते. घाव बरा होण्यास सुरवात होते आणि क्लॉट/खपली मजबूत होण्यास सुरू होते. जर जखम मोठी असेल तर कोलेजन तंतुं बनवण्यासाठी आणि जमा होण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात आणि ते जाड, उंच, लाल,आणि गोळा झाल्यासारखे दिसतात.

या खुणांचे काही विशिष्ट कारणं नाहीत, परंतु मोठ्या जखमांवरील, कापल्यास, भाजल्यास आणि कधीकधी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते होण्याची जास्त शक्यता असते. जे लोक वृद्ध आहेत किंवा ज्यांची गडद त्वचा असते त्यांना स्कार होण्याची शक्यता अधिक आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

सामान्यतः, योग्य वैद्यकीय इतिहास आणि संपूर्ण क्लिनिकल तपासणी निदानात मदत करतात. ती कोणत्या प्रकारची खूण आहे हे देखील ठरवण्यास मदत करते. पण, निदानाची पुष्टी करण्यासाठी कधीकधी त्वचेची बायोप्सी (खुणाच्या टिश्यूची बायोप्सी) केली जाते.

या खुणा पूर्णपणे काढून टाकणे कठीण आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक काही वर्षांत स्वत: निघून जातात. काही उपचार पद्धती या खुणांना लवकर काढण्यात मदत करतात किंवा त्यांना कमी दृश्यमान बनवण्यास मदत करतात:

 • स्कारवर सिलिकॉन जेल लावणे.
 • स्कारचा आकार कमी करण्यासाठी स्कारच्या टिश्यूवर आणि सभोवताल भागावर स्टेरॉईडचे इंजेक्शन देणे.
 • एक्सीशन / छेदन आणि स्किन ग्राफ्टिंग यासारख्या शस्त्रक्रिया करणे.
 • उंचावलेला स्कार खाली करायला लेझर थेरपी, तर कधी स्कार काढून टाकायला अब्लेटिव्ह लेझर थेरपी.


 

 1. स्कार साठी औषधे

स्कार साठी औषधे

स्कार के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
ADEL 56Adel 56 Habifac Drop215.0
ADEL Graphites DilutionGraphites Dilution 1 M155.0
Dr. Reckeweg Graphites DilutionGraphites Trituration Tablet 3 X190.0
Schwabe Graphites PentarkanGraphites Pentarkan Tablet280.0
SBL Graphites OintmentGraphites Gel55.0
ADEL 9Adel 9 Cri Regen Drop215.0
Schwabe Topi Graphites CreamTopi Graphites Cream60.0
Dr. Reckeweg R13Reckeweg R13 Hemorrhoidal Drop200.0
Dr. Reckeweg R56Reckeweg R56 Worms Drop200.0
Dr. Reckeweg R59Reckeweg R59 Obesity And Weight Drop200.0
Dr. Reckeweg R65Reckeweg R65 Psoriasis Drop200.0
ADEL 13Adel 13 Fattex Drop215.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...