Slipped Disc - Slipped Disc in Marathi

Slipped Disc
Slipped Disc

सारांश

स्लिप डिस्क म्हणजे हर्निएटेड डिस्क किंवा बल्जिंग डिस्क सारख्या वर्टेब्रल डिस्कच्या अवस्थांसाठीची एक सामान्य संज्ञा आहे. स्लिप डिस्क तंतूंची झीज या वयाशी निगडीत कारणामुळे वयस्कर असलेल्या लोकांची ही एक  सामान्य समस्या आहे. तथापी, लठ्ठपणा आणि अयोग्य पवित्र्यासारखे इतर धोक्यातील घटक वास्तविक रीत्या स्लिप डिस्कचा धोका वाढवतात. स्लिप डिस्क याचे सर्वांत सामान्य प्रकार म्हणजे पाठीच्या खालच्या भागाला प्रभावित करणारे लंबर स्पाइन स्लिप डिस्क आहे. स्लिप डिस्क यामुळे नसावर दाब पडून वेदना व दाह होऊ शकतात. तथापी, काही लोकांमध्ये लक्षणे दिसत नाही, असेही होऊ शकते. निदानात्मक पद्धती उदा. शारीरिक चाचणी आणि इमेजिंग चाचणी स्लिप डिस्कचे स्थान ओळखून तिचे गांभीर्य निश्चित करतात. स्लिप डिस्क असलेल्या बहुतांश लोकांना 3-4 आठवड्यांत देखील बरे वाटते, तरी फिझिओथेरपी आणि वेदनाशामक याने पुनर्लाभाची ही प्रक्रिया लवकर देखील होऊ शकते. अत्यवस्थ प्रसंगांमध्ये, डॉक्टरांद्वारे शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.

Slipped disc symptoms

स्लिप डिस्कची वेदना बहुतेक शरिराच्या एका बाजूला होते. लक्षणे नष्ट झालेल्या डिस्कच्या स्थानाप्रमाणें वेगळी असतात.

स्लिप डिस्कची (मज्जेच्या लंबर भागात किंवा पाठीच्या खालच्या भागात) सर्वांत सामान्य लक्षणे:

 • पाठदुखी
 • वाकवतांना तीक्ष्ण वेदना
 • बसल्याने किंवा कोणतीही हालचाल केल्याने अचानक वेदना.
 • पायदुखी
 • एक पाय किंवा बाहात सुंदपणा
 • पायांत खाली जाणारी वेदना
 • एका पायात अशक्तता
 • गुदाशयात वेदना
 • मांडी किंवा तळव्यात वेदना .

स्लिप डिस्क मज्जेच्या सर्व्हिकल भागात असल्यास, वेदना मानेत किंवा बाहात अनुभवली जाते. स्लिप डिस्कची लक्षणे पुढील प्रकारे असू शकतात:

 • रुग्णाच्या मानेत निष्कारण अस्वस्थता होणें.
 • रुग्णाची मान हलवतांना वेदना होणें.
 • रुग्णाच्या मानेच्या मुळाला शूटिंग पेन प्रकारची वेदना होणें
 • शोल्डर ब्लेड याजवळ वेदना (अधिक वाचा - खांदेदुखीवरील उपचार) होणें
 • बाहापासून बोटांपर्यंत उतरणारी वेदना होणें
 • मान, खांदा किंवा बाहामध्ये शिथिलता येणें
 • मानदुखीसह, बोटांमध्ये झिणझिण्या येणें.

लक्षणांची तीव्रता, डिस्क किती प्रमाणात तेथील नसावर दाब देत आहे, याने ठरते. स्लिप डिस्क याची वेदना शारीरिक हालचाल करत असतांना बळावते. काही वेळा, शरिराला वाहन चालवणें, खोकणें, शिंकणें आणि पळणें यादरम्यान सौम्य झटके मिळाल्याने या वेदनेचे उद्दीपन होते. वेदनेचे असे उद्दीपन एक आकस्मिक हालचाल याद्वारे नसावर अधिक दाब दिल्याने होते.

Slipped disc treatment

स्लिप डिस्कच्या अनेक रुग्णांमध्ये  3-4 आठवड्यांत, तर काही इतर रुग्णांना  3-4 महिन्यांत सुधारणा दिसते. तथापी, इतरांना पुनरावर्ती वेदना होते. स्लिप डिस्कच्या योग्य व्यवस्थापनामध्ये पुढील उपचार सामील आहेत:

बिगर शस्त्रक्रिया उपचार

स्लिप डिस्कमध्ये वेदनेसारख्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी बिगर शस्त्रक्रिया उपचार महत्त्वाचे असते, उदा. :

 • पूर्ण विश्रांती
   3 दिवसांपर्यंत विश्रांती खूप लाभकारक असून, क्षती किंवा हानी झालेल्या तंतूला बरे होण्यास वेळ मिळते. तथापी, प्रदीर्घ काळ अक्रीय राहू नये. एकदा लक्षणांमध्ये बरे वाटू लागल्यास, तुम्ही दैनंदिन हालचाल परत सुरू करू शकता, पण पूर्ण खात्री करून घ्यावी की तुमच्याकडून प्रभावित क्षेत्राला ताण देणारी गतिविधी तर होत नाही.
 • वेदनेवरील औषध उपचार
  बिगर स्टेरॉयड दाहशामक औषधोपचार (एनसेड्स) मध्ये आयबूप्रोफेन आणि नॅप्रोक्सेन यांसारखी वेदनाशामके सामील असून, त्या वेदनेपासून आराम मिळवून देतात.
 • फिझिओथेरपी
  तुमच्या पाठीचे स्नायू बळकट करण्यासाठी फिझिओथेरपीचा सगळीकडे सल्ला दिला जातो. विशिष्ट व्यायाम फिझिओथेरपिस्टद्वारे विहित केले जाऊन, तुमच्या हालचाल क्षमतेमध्ये मदत व स्लिप डिस्कच्या लक्षणांमध्ये सुधार करतात. तुमचे उपचारक अन्य उपचार उदा. ताप उपचार, लघुकालिक बॅक /नेक ब्रेसिंग  विहित करून आधार देतात, किंवा तंतू बरे होईपर्यंत वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोथेरपी दिली जाते.
 • एपिड्युरल इंजेक्शन
  एपिड्युरल स्टेरॉयड इंजेक्शनद्वारे या दाहापासून थोडा वेळ आराम मिळू शकते.
 • अन्य औषधे
  इतर औषधांमध्ये मसल स्पाझ्म टाळण्यासाठी स्नायू-शिथिलकारक आणि एंटीकंवल्झॅंट सामील असतात.

स्लिप डिस्कच्या उपचारामध्ये काही आशियाई उपचार पद्धती  कायम मोलाच्या ठरल्या आहेत, उदा. :

 • एक्युपंक्चर (प्रभावित भागातील दाबबिंदू शोधून बारीक सुया लावणें) .
 • रेइकि (विशिष्ट हस्तठेवणांद्वारे वेदनेत आराम मिळवून देणें) .
 • मॉक्सिबक्श्चन (वेदनेत आराम मिळण्यासाठी ऊष्मा वापरणें) .

शस्त्रक्रिया

सामान्यतः स्लिप डिस्कसाठी शस्त्रक्रिया ही केली जात नाही. औषधांनी लक्षणे न शमल्यास तेव्हाच ती केली जाते. स्नायूंमध्ये अशक्तता, हालचाल समस्या किंवा पोट बिघडलेले असल्यास लोकांना शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागू शकते. शस्त्रक्रिया पर्याय पुढीलप्रमाणे:

 • माइक्रोडिसेक्टॉमी
  स्लिप डिस्कच्या उपचारातील सर्वांत सामान्य शस्त्रक्रिया पर्याय. यामध्ये, डिस्कचे उभारी आलेले भाग काढून नसांवरील दाब काढला जातो. शस्त्रक्रियेनंतर, हळूहळू दैनंदिन हालचाली परत सुरू करता येतात, पण उपचार केलेला भाग ताणता किंवा त्यावर दाब देता कामा नये.
 • कृत्रिम डिस्क प्रत्यारोपण
  यामध्ये धातू किंवा बायोपॉलिमर याने बनलेले डिस्क वापरून क्षती झालेल्या डिस्कला पुरते बदलले जाते. आवश्यकता पडली तर, संपूर्ण डिस्क किंवा केवळ डिस्कचे मऊ केंद्र (न्युक्लिअस) बदलले जाते. तथापी, या उपचाराची उपलब्धता तशी कमीच आहे.

जीवनशैली व्यवस्थापन

स्लिप डिस्कच्या उपचारामध्ये अनेक घरगुती उपाय करता येतात, उदाः

 • बसतांना किंवा उभे असतांना पाठीवर दाब कमी करण्यासाठी चांगला पवित्रा  ठेवणें. पवित्र्याबद्दल सर्वांत सामान्य असलेले पण उपयोगी निर्देश म्हणजे सरळ उभा राहणें किंवा बसणें.
 • काही उचलत असतांना, गुडघे व मांड्या वाकाव्यात आणि पाठ सरळ ठेवावी.
 • काही नेत असतांना, नेत असलेली वस्तू शरिराजवळ बाळगावी. याने मज्जेवर कमीत कमी दाब पडेल.
 • स्लिप डिस्कवर उपचार होत असतांना, उंच हील किंवा पाठीवर दाब देणारे कोणतेही पादत्राण टाळावेत.
 • उताणे झोपणें टाळावे.
 • खूप वेळ एका जागेवर बसू नये.
 • फिझिओथेरपिस्ट याच्या सल्ल्याप्रमाणें लवचिकता व्यायामाद्वारे हालचाल परत प्राप्त करावी आणि ताण व पाठदुखी कमी करण्यास मदत मिळवावी.
 • योगासनाने पोटातील स्नायू बळकट होऊन तुमच्या पाठीच्या स्नायूंना आधार मिळते.

अधिकतर लोकांमध्ये, रप्चर झालेले किंवा स्लिप डिस्क आपोआप बरे होते, पण महत्तम विश्रांती आणि काळजी घ्यावी. पूर्वकाळजी सुरू ठेवल्यास, भविष्यात देखील स्लिप डिस्कची शक्यता कमी होईल.

What is a slipped disc

स्लिप डिस्क म्हणजे मज्जेच्या हाडांमधील तंतूची मऊसर गादी ठिकाणावर हलणें असे असते. यामुळे नसांवर दाब पडून खूप गैरसोय होऊ शकते. आपल्या पाठीचे हाड 26 हाडे म्हणजेच व्हर्टेब्रांपासून बनलेले असते. मऊ गादीसारख्या डिस्क या हाडांच्या मध्ये असून त्यांना जागेवर ठेवतात. या डिस्कमुळेच वाकणें किंवा ताणणें या सारख्या हालचाली सुलभ होतात. या डिस्क फाटल्यास किंवा तुटल्यास, स्लिप किंवा बल्जिंग डिस्कची समस्या होते. असे झाल्यास, डिस्कच्या केंद्रातील मऊ जेलीसारखे भाग डिस्कला बाहेर ढकलते आणि स्पायनल कॉर्डविरुद्ध दाबते. स्लिप डिस्क पाठीच्या हाडाचे खालचे भाग (लंबर स्पाइन) यामध्ये सामान्य आहे. ते 30-50 वर्षे वयाच्या लोकांमध्ये सामान्य असून याने तीव्र वेदना होऊ शकते.संदर्भ

 1. Jo Jordon, Kika Konstantinou, John O'Dowd. Herniated lumbar disc. BMJ Clin Evid. 2009; 2009: 1118. Published online 2009 Mar 26. PMID: 19445754.
 2. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Back pain – disc problems.
 3. National Health Service [Internet]. UK; Slipped disc.
 4. InformedHealth.org [Internet]. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-. Slipped disk: Non-surgical treatment options. 2012 Aug 2 [Updated 2017 Jun 1].
 5. North American Spine Society [Internet]; Artificial Disc Replacement (ADR).
 6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Herniated disk.

Slipped Disc चे डॉक्टर

Dr. Tushar Verma Dr. Tushar Verma Orthopedics
5 Years of Experience
Dr. Urmish Donga Dr. Urmish Donga Orthopedics
5 Years of Experience
Dr. Sunil Kumar Yadav Dr. Sunil Kumar Yadav Orthopedics
3 Years of Experience
Dr. Deep Chakraborty Dr. Deep Chakraborty Orthopedics
10 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

Slipped Disc साठी औषधे

Slipped Disc के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।