myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

खांदेदुखी खांदामधील कोणतेही हाड, टेंडन किंवा कार्टिलेजला क्षती झाल्यास होऊ शकते. खांदेदुखीचे सर्वांत प्रचलित कारण म्हणजे रोटेटर कफ डिसॉर्डर, खांद्याचे अस्थिभंग, शोल्डर डिस्लोकेशन आणि फ्रोझेन शोल्डर. खांदेदुखीशी निगडीत धोक्याची घटके म्हणजे वय वाढणें, ताणामुळे खांद्याला इजा, हृदयरोगातील धोक्याचे घटक उदा. उच्च कॉलेस्टरॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह, धूम्रपान आणि काही औषधांचे वापर. योग्य पवित्रा, तसेच ताणणारे व बळावणारे व्यायाम केल्याने अधिकतर खांद्यातील समस्या दूर होतात. खांदेदुखीवरील उपचार औषधांचे समायोजन, विश्रांती आणि व्यायाम असून, अस्थिभंग असल्यास शस्त्रक्रिया करतात. वेळी निदान आणि अवस्थेवरील योग्य उपचाराने कमी वेळात परिणाम मिळतात. खांदेदुखी मानक उपचारांना प्रतिसाद देते आणि अधिकतर लोकांना काही आठवडे किंवा महिन्यांत बरे वाटते. खांदेदुखीतील गुंतागुंती दुर्मिळ असून, भौतिक इजेमुळे होतात. तथापी, अधिकतर गुंतागुंतींमध्ये शस्त्रक्रिया प्रभावी असते. दुर्मिळ प्रकरणांतच, खांदेदुखी हृदयविकारासारख्या गंभीर समस्येची सूचक असू शकते आणि तातडीच्या वैद्यकीय सल्लेची गरज पडते.

 1. खांदा दुखणे ची कारणे - Causes of Shoulder Pain in Marathi
 2. खांदा दुखणे चा उपचार - Treatment of Shoulder Pain in Marathi
 3. खांदा दुखणे साठी औषधे
 4. खांदा दुखणे चे डॉक्टर

खांदा दुखणे ची कारणे - Causes of Shoulder Pain in Marathi

कारणे

खांदेदुखी अनेक कारणांमुळे होते. खांदेदुखीची सर्वांत सामान्य कारणे याप्रमाणे आहेत:

 • रोटेटर कफ डिसॉर्डर
  हे खांदेदुखीचे सर्वांत सामान्य कारण. रोटेटर कफ म्हणजे शोल्डर बॉल भोवती असलेल्या चार टेंडन मिळण्याचे ठिकाण. अधिकतर रोटेटर कफ इजा, वय वाढल्याने आणि कफचा ह्रास झाल्याने होतात, पण त्या अपघाताने ही होऊ शकतात.
 • खांद्याचे अस्थिभंग
  खांद्यातील हाडांना अपघातामुळे इजा होते. क्लऍक्व्हिक किंवा कॉलरबोनमधील हाडचे अस्थिभंग अस्थिभंगाचे सर्वांत सामान्य स्वरूप आहे. ह्युमेरस( बाहाचा वरचा भाग)चे अस्थिभंग 65 पेक्षा अधिक वयात सामान्य असते.
 • शोल्डर डिस्लोकेशन
  याचे अर्थ खांद्याच्या सांध्यातील बॉलचे आपल्या सॉकेटमधून ढकललेले जाणें. हे साधारण पडल्याने किंवा खेळातील इजेमुळे होते. खांद्याभोवतीचे मऊ तंतू झिजतात. काही वेळा, हाडांनाही इजा होते. शोल्डर डिस्लोकेशन आंशिक( आंशिकरीत्या बाहातील बॉल सॉकेटच्या बाहेर येणें) किंवा संपूर्ण ( बाहातील बॉल सॉकेटच्या पूर्ण बाहेर येणें) असू शकते. याला गंभीर खांदा अस्थिरताही म्हणतात.
 • फ्रोझेन शोल्डर
  या अवस्थेत खांद्यात कोणतीही हालचाल होत नाही. खांद्याच्या आतील अस्तरीत दाह किंवा खांद्याच्या कॅप्स्युल यामुळे असे होते. दाहामुळे खांद्याचे कॅप्सुल घट्ट आणि खडतर होऊन वेदना होते.
 • खांद्याचे आर्थरायटीस
  • खांद्याचे आर्थरायटीस विभिन्न प्रकारचे असू शकते. ओस्टिओ आर्थरायटीसचे हे सर्वांत सामान्य प्रकार. यामध्ये, खांद्याच्या हाडांचे टोक झाकणारे मऊ कार्टिलेज झिजते आणि हाडे एकामेकाला घासून वेदना होतात.
  • आर्थरायटीसचे अजून एक प्रकार म्हणजे रूमॅटॉयड आर्थरायटीस, जे स्वयंप्रतिकार रोग आहे, जिथे सायनोव्हिअम( सांध्यांना ल्युब्रिकेट करणारे अस्तर)मध्ये सूज होऊन वेदना आणि ताठरपणा होतात.
  • पोस्ट-ट्रॉमॅटिक आर्थरायटीस आर्थरायटीसचे एक प्रकार आहे, जे भौतिक इजेनंतर होते.
  • रोटेटर कफ आर्थ्रोपॅथीमुळेही आर्थरायटीस होते, ज्यात हाडांच्या थरांना क्षती पोचते.
  • एव्हॅस्कुलर नेक्रोसिस, एक असामान्य अवस्था आहे, जिथे बाहाच्या हाडाच्या वरील टोकाला रक्तपुरवठा कमी होऊन, शेवटी आर्थरायटीस होते.
 • बायसेप्स टेंडनायटीस
  या अवस्थेत अपर बायसेप्सचे टेंडनमध्ये दाह होते.ही अवस्था रोटेटर कफ टेंडनला क्षती झाल्यावर होते. ही अवस्था रेपेटिटिव्ह ओव्हरहेड हालचाल लागणारी गतिविधी केल्याने होते.
 • बायसेप्स टेंडन टिअर
  टेंडन स्नायूंना खांद्याच्या हाडांशी जोडतात. बायसेप टेंडन टिअर एखादी इजा किंवा सामान्य वयवाढीमुळे होते आणि जास्त वापराने टेंडनची ताकद कमी होते.

खांदा दुखणे चा उपचार - Treatment of Shoulder Pain in Marathi

खांदेदुखीवरील उपचार वेदनेच्या कारणावर अवलंबून असते. खांद्याला पुढील क्षती टाळण्यासाठी वेळी निदान व उपचार आवश्यक आहेत.

 • रोटेटर कफला इजा
  • ही फटीच्या रूपात असू शकते. वेळीच इजेवर उपचार न झाल्यास आणि वेदना वाढत राहूनही खांद्याचा वापर होत राहल्यास, फट मोठी होऊ शकते. तुमचे डॉक्टर वेदनेच्या गंभीरतेनुसार शस्त्रक्रियेशिवाय इतर पर्यायेही सुचवू शकतात.
  • सुरक्षित राहण्यासाठी आणि हालचाल टाळण्यासाठी खांदा स्लिंगवापरून हालचाल बंद केली जाऊ शकते.
  • खांदेदुखी वाढवणारी कोणतीही गतिविधी करण्यापासून तुम्हाला मज्जाव केले जाऊ शकते.
 • मौखिक औषधे इंजेक्शन
  तुमचे डॉक्टर काही औषधे विहित करून, तुम्हाला दाह व सुजेपासून आराम देऊ शकतात. मौखिक औषधांमुळे लक्षणे न सुधारल्यास, डॉक्टर स्टेरॉयड इंजेक्शन विहित करू शकतात. हे इंजेक्शन खांद्याचा सांधा व भोवतीच्या तंतूंमधील सूज कमी करण्यास मदत करून, ही लक्षणे सुधारतात. मात्र अशी इंजेक्शने सर्वांसाठी योग्य नसू शकतात.
 • व्यायाम
  तुमचे डॉक्टर खांद्याला इजेनंतर व्यायाम कार्यक्रम किंवा शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात. सुनियोजित व्यायाम कार्यक्रमामुळे स्नायूमधील ताकद आणि लवचिकता वाढवते. बळकट स्नायूंमुळे वेदनेत आराम मिळून लवचिकता वाढते आणि स्नायूंमध्ये सोरनेस करून हालचालीचा परिधी पहिल्यासारखा करतात.
 • शस्त्रक्रिया
  इतर उपचार पर्याय अपयशी ठरल्यास शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो. इजेच्या स्वरूपानुसार खांदेदुखीसाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात.
  • पूर्ण खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
   इतर वैद्यकीय पर्याये संपल्यास किंवा वापरू न शकत असल्यास याचा सल्ला दिला जातो. ऑस्टिओआर्थरायटीस, रिमूटॉयड आर्थरायटीस, रोटेटर कफ टिअर,आर्थ्रोपॅथी आणि विविध प्रकारचे अस्थिभंग असल्यास, या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.
  • प्रतिरूपी पूर्ण खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
   पारंपरिक पूर्ण खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया खांदेदुखीत प्रभावी नसल्यास, या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.ही शस्त्रक्रिया पारंपरिक पूर्ण खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपासून भिन्न असल्यास,ते रोटटर कफ स्नायूंपासून वेगळ्या स्नायूंवर बाह हलवण्यासाठी निर्भर असते. फाटलेले रोटटर कफ याला दुरुस्त केले जाऊ शकत नाही, खांद्यातील जटिल अस्थिभंग, खांद्याची गाठ आणि अपयशी पूर्ण खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यावरील उपचार प्रतिरूपी पूर्ण खांदा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने केले जाते. तुमचे डॉक्टर प्रसंगानुसार या शस्त्रक्रियेचा सल्ला देतील.
  • शोल्डर आर्थ्रोस्कोपी
   कमीत कमी चीर असणारी शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये ओपन सर्जरीपेक्षा लहान इंशिसन कमी करावे लागतात. लहान इंसिशन करून खांद्याच्या सांध्यामध्ये लहानसा कॅमरा ठेवला जातो. कॅमरा स्क्रीनवरील इमेज दाखवतो. शस्त्रक्रिया या छवींना वापरून मिनिएचर शस्त्रक्रिया उपकरणांना दिशा देऊन व हलवून खांद्याच्या सांध्याची दुरुस्ती केली जाते. याने रुग्णांचे बरे होण्याचे वेळ कमी करते.

जीवनशैली व्यवस्थापन

खांद्याच्या अधिकतर समस्या हळूहळू विकसित होतात. योग्य पवित्रा अवलंबून, खांदा ताणून व सशक्त करून खांदेदुखी टळते आणि बरी होते. गंभीर खादा इंजा उदा. डिस्लोकेशन टाळण्यासाठी ताण व वार्म अपचे व्यायाम विशेषकरून लाभकारी असतात.

Dr. Vivek Dahiya

Dr. Vivek Dahiya

ओर्थोपेडिक्स

Dr. Vipin Chand Tyagi

Dr. Vipin Chand Tyagi

ओर्थोपेडिक्स

Dr. Vineesh Mathur

Dr. Vineesh Mathur

ओर्थोपेडिक्स

खांदा दुखणे साठी औषधे

खांदा दुखणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Oxalgin DpOxalgin Dp 50 Mg/325 Mg Tablet27
Diclogesic RrDiclogesic Rr 75 Mg Injection25
DivonDIVON GEL 10GM0
VoveranVOVERAN 1% EMULGEL 30GM105
EnzoflamEnzoflam 50 Mg/325 Mg/15 Mg Tablet91
DolserDolser 400 Mg/50 Mg Tablet Mr0
Renac SpRenac Sp Tablet51
Dicser PlusDicser Plus 50 Mg/10 Mg/500 Mg Tablet46
D P ZoxD P Zox 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet20
Unofen KUnofen K 50 Mg Tablet0
ExflamExflam 1.16%W/W Gel48
Rid SRid S 50 Mg/10 Mg Capsule32
Diclonova PDiclonova P 25 Mg/500 Mg Tablet13
Dil Se PlusDil Se Plus 50 Mg/10 Mg/325 Mg Tablet44
Dynaford MrDynaford Mr 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet29
ValfenValfen 100 Mg Injection10
FeganFegan Eye Drop16
RolosolRolosol 50 Mg/10 Mg Tablet67
DiclopalDiclopal 50 Mg/500 Mg Tablet16
DipseeDipsee Gel57
FlexicamFlexicam 50 Mg/325 Mg/250 Mg Tablet25
VivianVivian 1.16% Gel0
I GesicI Gesic 0.1% Eye Drop26
Rolosol ERolosol E 50 Mg/10 Mg Capsule51
DicloparaDiclopara 50 Mg/500 Mg Tablet0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Arthritis Foundation National Office [Internet] Atlanta,GA; Shoulder Anatomy
 2. American Society for Surgery of the Hand [Internet] Chicago; Shoulder pain
 3. Caroline Mitchell, Ade Adebajo, Elaine Hay, Andrew Carr. Shoulder pain: diagnosis and management in primary care. BMJ. 2005 Nov 12; 331(7525): 1124–1128. PMID: 16282408
 4. American Society for Surgery of the Hand [Internet] Chicago; Rotator cuff injuries
 5. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Shoulder Pain and Common Shoulder Problems.
 6. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Chronic Shoulder Instability.
 7. American Society for Surgery of the Hand [Internet] Chicago; Shoulder arthritis
 8. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Arthritis of the Shoulder.
 9. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Biceps Tendinitis.
 10. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Biceps Tendon Tear at the Shoulder.
 11. Daniëlle A W M van der Windta, Elaine Thomasb, Daniel P Popeb, Andrea F de Wintera, Gary J Macfarlanec, Lex M Boutera, Alan J Silmanb. Occupational risk factors for shoulder pain: a systematic review . Bmj journels [Internet]
 12. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Possible link between shoulder problems and heart disease risk: Published: February, 2017. Harvard University, Cambridge, Massachusetts.
 13. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Rotator Cuff Tears.
 14. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Keep your shoulders strong to stay independent; Published: December, 2015. Harvard University, Cambridge, Massachusetts.
 15. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Rotator Cuff and Shoulder Conditioning Program.
 16. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Shoulder Joint Replacement.
 17. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Reverse Total Shoulder Replacement.
 18. American Academy of Orthopaedic Surgeons [Internet] Rosemont, Illinois, United States; Shoulder Arthroscopy.
 19. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Shoulder pain
और पढ़ें ...