myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

घश्याचा आजार (स्ट्रेप थ्रोट) काय आहे?

घश्याचा आजार म्हणजे स्ट्रॅप्टोकोकस पायोजेनेस बॅक्टेरिया मुळे होणारा संसर्ग आहे. यामुळे घशाला वेदना, सूज आणि अस्वस्थता येते. जरी ते कोणत्याही वयाच्या लोकांना प्रभावित करू शकत असले, तरीही लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • घश्याच्या आजारात सुरुवातीला घशात वेदना आणि अस्वस्थता होते. ही विशेषतः गिळतांना आणि खातांना जाणवते, त्याचवेळी घश्यात खाजही येते. हळूहळू त्यात वाढ होत जाते. हा त्रास कफ मुळे होत नाही.
 • गळ्यामध्ये वाढलेल्या लिम्फ नोड्समुळे टॉन्सिल्सला सूज येते आणि ते लाल होतात.
 • या संसर्गामुळे ताप आणि थंडीची लागण होते.
 • व्यक्तीला थकवा, डोकेदुखी आणि सर्दी होऊ शकते.
 • भूक न लागणे, मळमळ, उलट्या ह्या घश्याच्या आजारात होणाऱ्या सामान्य तक्रारी आहेत.

याची मुख्य कारणं काय आहेत?

 • घश्याचा आजार ग्रूप ए स्ट्रेप्टोकोकस, स्ट्रेप्टोकोकस पायोजेनस या बॅक्टेरियामुळे होतो.
 • हा संसर्ग खोकला किंवा शिंका यातून पसरलेल्या लहान थेंबाद्वारे एका व्यक्तीपासून व्यक्तीमध्ये प्रसारित होतो.
 • संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आपल्याला घश्याच्या आजाराचा धोका असतो. याचा अर्थ वैयक्तिक वस्तूंना स्पर्श करणे किंवा देवाणघेवाण करणे हा होतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • प्रथमदर्शनी या आजाराचा संसर्ग इतर मायक्रोबियल संसर्गासारखाच असतो. एकदा लक्षणे दिसली की, डॉक्टर विशिष्ट तपासणीचा सल्ला देतात ज्याला रॅपिड स्ट्रेस टेस्ट असे म्हणतात. यात बॅक्टेरियाचा शोध घेण्यास मदत होते, ज्यामध्ये घश्यातुन स्वाब  गोळा केला जातो आणि प्रयोगशाळेत तपासला जातो.
 • संसर्गाची तपासणी करण्यासाठी आणि इतर कोणत्याही मोठ्या आजाराची शक्यता फेटाळण्यासाठी रक्त तपासणी केली जाते.

उपचारः

 • घश्याच्या आजारासाठी प्राथमिक उपचार अँटीबायोटिक्स आहेत. हे सुनिश्चित करणे फार महत्वाचे आहे की रुग्ण पूर्णपणे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी अँटीबायोटिकचा डोज टाळत नाही.
 • जर वेदना किंवा ताप आला असेल तर ॲनल्जेसिक आणि अँटिपेट्रेटिक औषधे देखील दिली जातील.
 • औषधांचा कोर्स अपूर्ण सोडल्यास किंवा बॅक्टेरिया औषधांच्या प्रतिकाराने विकसित झाल्यास घश्याचा आजार पुन्हा उद्भवू शकतो.
 1. घश्याचा आजार(स्ट्रेप थ्रोट) साठी औषधे

घश्याचा आजार(स्ट्रेप थ्रोट) साठी औषधे

घश्याचा आजार(स्ट्रेप थ्रोट) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
ADEL 83Adel 83 Bronchi Pertu Syrup340.0
SBL Relaxhed DropsRelaxhed Drop90.0
Dr. Reckeweg Usnea Barbata QUsnea Barbata Mother Tincture Q230.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...