myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

व्हिटॅमिन के ची कमतरता म्हणजे काय?

व्हिटॅमिन के एक चरबीत- विरघळणारा व्हिटॅमिन आहे, म्हणजे मानवी शरीरात त्याचे शोषण करण्यासाठी चरबी आवश्यक आहे. व्हिटॉमिन के दोन स्वरूपात आढळते, उदा. व्हिटॅमिन के 1 (फायलोक्वीनोन), जे वनस्पती स्त्रोतापासून मिळते आणि के 2 (मेनक्विनोन), जे आतड्यां मध्ये सहजपणे संश्लेषित केले जाते. फायलोक्विन्स हे व्हिटॅमिन के चे प्रमुख आहार स्त्रोत आहे, हे सामान्यतः हिरव्या पालेभाज्या जसे पालक, ब्रोकोली आणि कोबीमध्ये आढळते. मेनाक्विनोन सामान्यत: विशिष्ट पशु पदार्थ आणि किण्वित पदार्थांमध्ये सापडते. ते मुळात फरमेंट करणाऱ्या जिवाणूद्वारे उत्पादित केले जाते आणि बहुतेक लोकांमध्ये पुरेश्या  प्रमाणात आतड्यात तयार केले जाते.

व्हिटॅमिन के, शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असणारे, महत्वपूर्ण प्रोटीन्स तयार करते. व्हिटॅमिन केची कमतरता असल्यास शरीरात हे प्रोटिन्स बनत नाही ज्यामुळे रक्तस्रावाचा धोखा असतो.

याचे चिन्हे  आणि लक्षणे काय आहेत?

याची काही चिन्हे आणि लक्षणे खाली दिली आहेत:

 • खूप जास्त रक्तस्त्राव.
 • लगेच जखम होणे.
 • नखांमध्ये रक्तस्त्राव.
 • अन्ननलिके मधून रक्तस्त्राव.
 • निस्तेजपणा आणि अशक्तपणा.
 • गडद किंवा रक्त असलेले मल.
 • लघवीतून रक्त येणे.
 • हाड कमकुवत होणे.
 • पुरळ.
 • हृदयाचे ठोके वाढणे.

याची कारणं काय आहेत?

व्हिटॅमिन केची कमतरता कोणत्याही वयात होऊ शकते पण नवजात बालकांना जास्त धोका असतो. व्हिटॅमिन के च्या कमतरतेची इतर कारणे खालील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

व्हिटॅमिन केच्या कमतरतेचे कारण शोधण्यासाठी रुग्णाचा इतिहास जाणून घेतला जातो. रक्तस्रावाची वेळ ओळखण्यासाठी कोआग्युलेशन चाचणी केली जाते. व्हिटॅमिन केच्या कमतरतेच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी केलेल्या इतर चाचण्या जसे प्रोथ्रॉम्बिन टाईम, ब्लीडींग टाईम, क्लॉटिंग टाईम आणि सक्रिय आंशिक प्रोथ्रॉम्बिन टाइम केल्या जातात.

उपचार पद्धतींमध्ये हे समाविष्ट आहे

 • व्हिटॅमिन के चे तोंडी किंवा इंजेक्शन चे सप्लिमेंट्स.
 • व्हिटॅमिन के-युक्त आहार घेणे जसे हिरव्या पालेभाज्या, मोहरी, कोबी आणि ब्रोकोली.


 

 1. व्हिटॅमिन के ची कमतरता साठी औषधे
 2. व्हिटॅमिन के ची कमतरता साठी डॉक्टर
Dr. B.P Yadav

Dr. B.P Yadav

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

Dr. Vineet Saboo

Dr. Vineet Saboo

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

Dr. JITENDRA GUPTA

Dr. JITENDRA GUPTA

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

व्हिटॅमिन के ची कमतरता साठी औषधे

व्हिटॅमिन के ची कमतरता के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
K NatK Nat 1 Mg Injection30.8
Neo KNeo K 1 Mg Injection24.7
KenadionKenadion 10 Mg Injection48.15

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...