myUpchar प्लस+ के साथ पुरे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

त्वचेवर पुरळ आल्याने त्वचेच्या रंगात आणि दिसण्यात बदल होतो जो सामान्य त्वचेपासून सहजपणे वेगळा असतो. मुलांमधील आणि प्रौढांमधील विविध अंतर्निहित अवस्थांमध्ये दिसणारे हे एक सामान्य लक्षण आहे.बऱ्याच वेळा अन्न किंवा औषधांच्या एलर्जीमुळे हे होते.सूर्यप्रकाशामुळे सुद्धा, विशेषतः उन्हाळ्यात, त्वचेवरील पुरळ होऊ शकतात. मूलतः विषाणू, जीवाणूजन्य, बुरशी किंवा परजीवींमुळे होणारे काही संसर्ग त्वचेवरील पुरळे वाढवू शकतात. कधीकधी, त्वचेची पुरळे काही औषधांचा दुष्परिणाम म्हणूनही होतात. याचे निदान त्वचातज्ञ पुरळ बघून आणि व्यक्तीच्या पूर्वेतिहासाच्या नोंदी घेऊन करु शकतात. कधीकधी, निदानासाठी प्रयोगशाळेतील चाचण्या आवश्यक असू शकतात. त्वचेवरील पुरळांच्या उपचारांच्या काळात संसर्ग झाला असल्यास औषधोपचारांसोबत आराम, भरपूर पाणी पिणे, त्वचेवर पुरळ आणणारी औषधे टाळणे, हानिकारक रसायनांपासून संरक्षण करणे, विषारी धातू आणि सूर्यप्रकाशांचा संपर्क टाळणे हे उपाय समाविष्ट आहेत. त्वचेच्या पुरळांचे लवकर निदान होणे उत्तम आहे कारण सामान्यतः ते काही अलर्जी किंवा संसर्गाशी संबंधित असेल तर बरे होऊ शकणारे आहे. कधीकधी त्वचेची पुरळे कुठल्या तरी अलर्जीच्या प्रतिक्रियेचे लक्षण असते, जी आधी संपूर्ण शरिरावर पसरणारी तीव्र खाज, सूज यात बदलते आणि नंतर टेंगूळ आणि फोडांमधे रुपांतरित होऊ शकते.

 1. पुरळ उठणे ची लक्षणे - Symptoms of Skin Rash in Marathi
 2. पुरळ उठणे चा उपचार - Treatment of Skin Rash in Marathi
 3. पुरळ उठणे साठी औषधे

पुरळ उठणे ची लक्षणे - Symptoms of Skin Rash in Marathi

त्वचेची पुरळं स्वतःकाही शरिरीक अंतर्गत कारणांमुळे किंवा अवस्थांमुळे येणारे एक लक्षण आहे.त्वचेवरील पुरळ काही इतर लक्षणांसह अस्तित्वात असलेल्या अस्वास्थ्याचे निदान करण्यात मदत करू शकतात. सामान्यत: त्वचेवरील पुरळांच्या सोबत दिसत असणारी लक्षणे आहेत:

 • खाज
  अनेक अवस्थांमधे पुरळ विकसित झालेल्या ठिकाणी त्वचा खाजवू शकते. बहुतांशी ती अलर्जीच्या परिस्थितीशी संबंधित असते आणि कधीकधी औषधांमुळे होते किंवा मुळातच संक्रमक असते.
 • ताप
  विषाणू, सूक्ष्म जीवी, बुरशी आणि परजीवींमुळे झालेल्या आजारांमधे त्वचेचे पुरळ हे प्रारंभिक लक्षण असून त्यानंतर ताप किंवा कधीकधी याच्या अगदी विरुद्ध प्रकार (म्हणजे आधी ताप व नंतर पुरळ असे) दिसून येते.
  ​खालील आजारांची काही उदाहरणे आहेत ज्यात त्वचेवरील पुरळांसोबत ताप दिसून येतो:
  • डेंगू त्याच नावाच्या विषाणूमुळे होतो आणि डासांद्वारे संक्रमित केला जाते. त्वचेखाली असलेल्या लाल डागांसारख्या दिसणाऱ्या कोशिकांच्या फुटण्यामुळे त्वचेवर पुरळं येतात.
  • संधिवाताचा ताप जीवाणूंच्या संसर्गामुळे होतोज्यात हे संक्रमण हृदयाला प्रभावित करते आणियाची सर्व लक्षणे हृदयाच्या विकारांशी संबंधित असतात.
  • कॅन्डडिअसिस बुरशीजन्य संसर्ग आहे ज्यासोबत बुरशीच्या वाढीमूळे त्वचा पांढऱ्या रंगाची होते.
  • खरूज हा आजार परजीवींमुळे होतो. पायांच्या बोटांमधील जागेच्या अस्वच्छतेमूळेहेपरजीवी तेथे राहतात ज्याने  रात्रीखाजवतात.
 • लालसरपणा
  पुरळांसोबतच त्वचा लाल होते व कधीकधी हा लालपणा शरीराच्या इतर अवयवांवर देखील पसरतो.
 • सूज
  कधीकधी पुरळे सूज किंवा टेंगुळांमधे रुपांतरित होतात जे पाण्याने भरलेल्या फोडांसारखे दिसू शकतात जसे बुलॉस पेम्फिगसच्या बाबतीत होते. कधीकधी ते सोरिअसीसमधे येणाऱ्या खवल्यांसारखे रूप बदलतात. सोरियासीसमधे सुरुवातीला पुरळ येतात जे चकाकणाऱ्या पांढऱ्या खवल्यांमधे बदलतात.ही पुरळे संपूर्ण शरिरावर पसरतात आणि खवल्यांना पिळल्यास रक्त येते.

पुरळ उठणे चा उपचार - Treatment of Skin Rash in Marathi

त्वचेच्या पुरळांचे उपचार मूळ कारणांवर अवलंबून असतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, काही घरगुती उपचारांद्वारे किंवा कॅलमिन लेपनासारखी घरगुती औषधे वापरुन पुरळं बरी होतात. गंभीर पुरळं आणि इतर आजाराने होणाऱ्या पुरळांसाठी, विशिष्ट औषधोपचार आवश्यक आहेत.

 • घरगुती उपाय
  • बऱ्याच वेळा त्वचेच्या पुरळांना कोणत्याही प्रकारच्या उपचारांची आवश्यकता नसते, ते स्वतःच बरे होते. उदाहरणार्थ 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये विषाणूंमुळे होणारे हात, पाय आणि चेहऱ्याचे आजार फक्त विश्रांती घेतल्याने बरे होतात. तथापि, जर त्वचेचा त्रास एक दिवसापेक्षा जास्त काळ टिकत असेल किंवा सोबत वेदना, ताप, सूज आणि खाज असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये आणि कारण शोधून काढण्यासाठी आपण त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • कठिण रसायनरहित सौम्य साबणाने पुरळ धुवा.
  • पुरळांचा दाह शांत करण्यासाठी आणि लालपणा कमी करण्यासाठी पुरळांवर बर्फठेवा.
  • पुरळांवर पेट्रोलियम जेली लावा. याने त्वचेचा दाह कमीहोऊ शकतो.
  • स्नान करताना आणि प्रभावित अवयव स्वच्छ करताना गरम पाण्याचा वापर टाळा. यामुळे फोडं वाढू शकतात आणि क्षोभ व लालसरपणाही वाढू शकतो.
  • बँड-एड किंवा मलमपट्टीसारख्या इतरबाह्य सामग्रीचा वापर टाळा आणि कोणतेही घर्षण टाळण्यासाठी शक्य असल्यास फोडं उघडी ठेवण्याचा प्रयत्न करा.
 • पुरळांचे उपचार
  तुमचे डॉक्टर असा औषधोपचार निर्धारीत करू शकतात,जोपुरळांच्या अंतर्निहीत कारणांवर अवलंबून असू शकतो. त्यांत समविष्ट आहे:
  • संशयास्पद एलर्जी, हीअन्न, औषधे, धातूघेतल्याने किंवा कीटकांच्या चावण्याने झाली असल्यास आपले डॉक्टर एलर्जी-रोधक औषधं निर्धारित करू शकतात. बऱ्याच अवस्थांमध्ये, एलर्जी-रोधक औषधांच्या एक ते दोन मात्रा पुरळांचा उपचार करण्यासाठी पुरेशाअसतात.
  • पुरळांशी संबंधित लालसरपणा, वेदना किंवा सूज असल्यास दाहप्रतीबंधक औषधे निर्धारित केली जाऊ शकतात.
  • संक्रमणांचा उपचार करण्यासाठी प्रतिजैवीके, जसे कि परजीवीरोधक,विषाणूरोधक, बुरशीरोधक आणि प्रतिजनुकीय औषधं निर्धारित केली जाऊ शकतात.
  • लालसरपणा, खोकला आणि सूज दूर करण्यासाठी टॉपिकल एंटी-हिस्टामाइन किंवा स्टेरॉइड मलम आणि लेपन निर्धारित केली जाऊ शकतात.
  • त्वचेवरील तीव्र फोडांच्या बाबतीत, आपले डॉक्टर स्टेरॉईड लस देऊ शकतात.

जीवनशैली व्यवस्थापन

खाद्यपदार्थांच्या अलर्जीने किंवा सौंदर्यप्रसाधनांमुळेयेणाऱ्या त्वचेच्या पुरळांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी एलर्जी होणारे घटक टाळावे.त्वचेची काळजी घेणारी व खाद्यपदार्थांची उत्पादने लेबल वाचून घ्यावी. हे केल्यास भविष्यात त्वचेच्या पुरळांना प्रतिबंध करण्यास मदत होऊ शकते. सूर्यप्रकाशात बाहेर पडताना सनस्क्रीन मलम वापरल्याने फोटो-एलर्जी आणि उष्णतेमूळे येणारी पुरळे आपण रोखू शकतो. दररोज स्नानकेल्याने, स्वच्छ कपडे घातल्याने,नखे कापून हात धुण्याने पुरेशी स्वच्छता पाळता येते व संक्रमण आणि त्वचेच्या पुरळांना प्रतिबंध घालण्यास मदत होऊ शकते.

पुरळ उठणे साठी औषधे

पुरळ उठणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
CofrylCofryl 25 Mg Syrup68.5
DifDif 25 Mg Suspension37.9
ZendrylZendryl 25 Mg Capsule17.25
AldrylAldryl Soft Gelatin Capsule11.12
Caladryl(Piramal)Caladryl Lotion56.45
MeladrylMeladryl 1% W/V Lotion45.0
Ascoril DAscoril D 5 Mg/10 Mg/1.25 Mg Syrup0.0
CoritussCorituss Syrup0.0
DeletusDeletus 10 Mg/5 Mg/1.25 Mg Tablet0.0
Kofnok DKofnok D Syrup49.52
New Deletus DNew Deletus D Syrup69.2
RatifedRatifed Syrup91.36
Ascoril Plus DAscoril Plus D Syrup94.0
Refid DRefid D Syrup60.0
Coryl TabletCoryl Tablet0.0
Denituss DDenituss D Syrup38.05
Oripect CcOripect Cc Syrup32.15
Megatuss DMegatuss D Syrup20.37
Recofast PlusRecofast Plus 500 Mg/60 Mg/2.5 Mg Tablet37.0
Actifed PlusActifed Plus Suspension28.62
FastorikFastorik Tablet17.7
Nocold PlusNocold Plus 125 Mg/60 Mg/1 Mg Syrup16.68
SensitusSensitus 300 Mg/60 Mg/24 Mg Syrup49.0
Ascodex PlusAscodex Plus Syrup43.52
HadensaHadensa Capsule40.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...