वुल्व्हिटिस - Vulvitis in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

May 02, 2019

March 06, 2020

वुल्व्हिटिस
वुल्व्हिटिस

वुल्व्हिटिस म्हणजे काय?

वुल्व्हिटिस म्हणजे वुल्व्हा म्हणजे बाह्य जननेंद्रियला सूज येणे. वुल्व्हा महिलेच्या जननांग भागात असलेली योनीला आच्छादन करणारी त्वचा असते. हा एक रोग नाही तर विविध संभाव्य कारणांचे एक लक्षण आहे.

याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वुल्व्हिटिसचे नैदानिक ​​चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेतः

  • वल्वाच्या भागात दुखणे, सूज येणे आणि लालसर होणे.
  • तीव्र खाज सुटणे.
  • द्रव असलेले आणि दुखणारे फोडं होणे.
  • वुल्व्हावर खपले आणि जाड पांढरे चट्टे होणे.
  • वुल्व्हा नाजुक होणे.
  • लघवी करतांना त्रास होणे.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

वुल्व्हिटिस खालील कारणांमुळे होऊ शकतो:

  • एकाधिक लैंगिक भागीदार.
  • असुरक्षित संभोग करणे.
  • ग्रुप ए बीटा-हेमोलाइटिक स्ट्रेप्टोकोकस, हेमोफिलस इन्फ्लूएंझा, शिगेला आणि कॅन्डिडा ॲल्बिकान्स यामुळे बॅक्टेरियल संसर्ग होणे.
  • सुगंधित किंवा रंगवलेले टॉयलेट पेपर वापरणे.
  • सुगंधी किंवा स्ट्रॉंग रसायने असलेल्या साबणांचा वापर.
  • कपड्यांचे पावडर जे अंडर गारमेंट्सवर अवशेष सोडतात आणि वुल्व्हाच्या संपर्क येतात.
  • योनिचे स्प्रे / शुक्राणुनाशक.
  • घट्ट कपडे घालणे .
  • क्लोरीन असलेल्या पाण्यात पोहणे यासारखे क्रीडा उपक्रम करणे.
  • एक्झिमा किंवा सोरायसिस सारख्या त्वचा रोगांचा वैद्यकीय इतिहास.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वुल्व्हिटिसच्या निदानात्मक मूल्यांकनामध्ये वैद्यकीय इतिहास, श्रोणि आणि जघन्य भागांची शारीरिक तपासणी केली जाते.लॅबोरेटरी चाचण्यांमध्ये संपूर्ण रक्त गणना (सीबीसी), मूत्र चाचणी आणि पॅप स्मिअर टेस्ट(गर्भाशयाच्या पेशींची चाचणी) बदल किंवा जळजळ / संसर्ग ओळखण्यासाठी केली जाते. वुल्व्हिटिसचे उपचार विविध घटक जसे की वय, रोगाचे कारण, तीव्रता आणि काही औषधां प्रति सहनशीला, वर आधारित असतात . कॉर्टिसोन असलेले टॉपिकल अँटी-इंफ्लॅमेटरी एजंट्स आणि टॉपिकल फंगल एजंटचा वापर उपचारासाठी केला जातो. वुल्व्हिटिस हे एकमेव निदान असलेले अॅट्रोपिक व्हजिनायटिस असल्यास टॉपिकल एस्ट्रोजेन देखील वापरू शकतात.

स्वतःच्या-मदतीच्या उपायांमध्ये इर्रिटेन्ट्सचा वापर टाळणे, वैयक्तिक स्वच्छता सुनिश्चित करणे, दिवसातून जननांग भरपूर वेळा धुणे, सुती अंडरगमेंट्स घालणे आणि भाग कोरडे ठेवणे समाविष्ट आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय:

  • सौम्य साबण वापरणे.
  • सुगंधित / रंगवलेल्या टॉयलेट पेपरचा वापर टाळणे आणि जननांग क्षेत्र पुढून मागे पुसणे.
  • फोम्स, जेली इत्यादीसारख्या बाह्य उत्तेजक पदार्थ आणि रसायनांचा वापर टाळणे.
  • फक्त सूती कपडे आणि अंडरवियर घालणे.
  • क्लोरिनेटेड स्वीमिंग पूलशी दीर्घकाळ संपर्क टाळणे.

 



संदर्भ

  1. The Johns Hopkins Health System Corporation [Internet]; Vulvitis.
  2. Australasian Journal of Dermatology [Internet]. Gayle Fischer. Chronic vulvitis in pre‐pubertal girls. Volume51, Issue2 May 2010 Pages 118-123
  3. Manohara Joishy et al. Do we need to treat vulvovaginitis in prepubertal girls?. BMJ. 2005 Jan 22; 330(7484): 186–188. PMID: 15661783
  4. Scurry J et al. Vulvitis circumscripta plasmacellularis. A clinicopathologic entity?. J Reprod Med. 1993 Jan;38(1):14-8. PMID: 8441125
  5. Stanford Children's Health [Internet]. Stanford Medicine, Stanford University; Vulvitis.