myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

झॉलिंगर एलिसन सिंड्रोम काय आहे?

स्वादुपिंड किंवा लहान आतड्यामधील एक किंवा अधिक ट्यूमरमुळे गॅस्ट्रिन हार्मोनचे अत्यधिक उत्पादन हे  झॉलिंगर एलिसन सिंड्रोम (ZES) म्हणून ओळखले जाते. हे ट्यूमर गॅस्ट्रिन हार्मोनचे स्रवण करतात, जे पोटात गॅस्ट्रिक ॲसिड तयार करायला जबाबदार असतात. पोटातील अन्न पचवण्यासाठी गॅस्ट्रिक ॲसिड तयार आवश्यक असते. आणि त्याकरिता मानवी शरीरात गॅस्ट्रिनची आवश्यकता असते. झेस (ZES) मुळे जास्त प्रमाणात गॅस्ट्रिक ॲसिड तयार होते जे पोटात आणि पचनसंस्थेच्या इतर भागांमध्ये पेप्टिक अल्सर होण्यास कारणीभूत ठरते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

झेस (ZES) ची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत :

मल किंवा उलटी मध्ये रक्त आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

याची मुख्य कारणं काय आहेत?

बऱ्याच व्यक्तींमध्ये, झेस (ZES) चे कारण लपलेले असते. परंतु, पीडितांपैकी 25% लोकांमध्ये अंतःस्रावी निओप्लासिया टाईप 1 (MEN1) नावाचा अनुवांशिक विकार हे झेसचे कारण मानले जाते. मेन1 मुळे गॅस्ट्रिनोमा, हार्मोन गॅस्ट्रिन-उत्पादक ट्यूमर होतो ज्यामुळे पोटात जास्त प्रमाणात आम्ल तयार होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

आजाराचे निदान सामान्यतः खालील प्रकारे केले जाते:

 • वैद्यकीय इतिहासाचा सविस्तर अभ्यास.
 • शारीरिक तपासणी.
 • हार्मोन गॅस्ट्रिनची पातळी शोधण्यासाठी रक्त तपासणी.
 • पचनसंस्थेच्या वरच्या भागात, जसे अन्ननलिका, पोट आणि लहान आतडे, सूज आणि अल्सर तपासण्यासाठी अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी.
 • पचनसंस्थेची सद्य स्थिती तपासण्यासाठी इमेजिंग चाचण्या जसे कॉम्पुटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन आणि मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग (एमआरआय).
 • पोटातील ॲसिडचा स्तर निश्चित करणे.

झेस (ZES) पासून मुक्तता मिळण्यासाठी डॉक्टर खालील उपचार पद्धतींची शिफारस करू शकतात:

 • औषधे: पेंटोप्राझोल, रेबेप्रॅझोल, एस्मोप्राझोल इत्यादीसारख्या प्रोटॉन पंप इनहिबिटर्स  पोटात ॲसिड ची निर्मिती प्रतिबंधित करतात. हे वेदना, अल्सर आणि झेस (ZES) च्या इतर लक्षणांपासून आराम देते.
 • किमोथेरपी: जे ट्युमर शल्यक्रिया प्रक्रियेद्वारे बरे केले जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी डॉक्सोर्बिसिन सारखे किमोथेरपी औषधे दिली जातात.
 • सर्जिकल प्रक्रिया: गॅस्ट्रिनोमास शस्त्रक्रिया करुन  काढणे सिंड्रोमचा उपचार करण्यात मदत करते.
 • आहारः या ट्यूमरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या आहाराचे अनुसरण करावे.

 

 

 1. झॉलिंगर एलिसन सिंड्रोम साठी औषधे

झॉलिंगर एलिसन सिंड्रोम साठी औषधे

झॉलिंगर एलिसन सिंड्रोम के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Pantodac DsrPantodac Dsr 30 Mg/40 Mg Capsule119.0
P PpiP Ppi 40 Mg Injection54.0
PantocarPantocar 40 Mg Injection74.0
PantodacPantodac 20 Mg Tablet79.0
Pantop DPantop D 10 Mg/20 Mg Capsule78.0
RantacRantac 150 Mg Tablet22.51
ZinetacZinetac 150 Mg Tablet21.87
PantocidPantocid 20 Mg Tablet57.0
Pantocid DPantocid D Capsule81.0
AcilocAciloc 150 Mg Tablet22.46
PanPan 20 Mg Tablet78.0
Esofag DEsofag D 30 Mg/40 Mg Capsule Sr116.0
Nexpro RdNexpro Rd 20 Mg Capsule74.0
NexproNexpro 20 Mg Tablet52.0
PantopPantop 20 Mg Tablet49.0
Pan DPan D Capsule Sr104.0
Nexpro LNexpro L Capsule180.0
LanspepLanspep 30 Mg Capsule46.0
Reden OReden O 2 Mg/150 Mg Tablet42.5
Raciper LRaciper L 75 Mg/40 Mg Capsule174.1
ProteraProtera 40 Mg Tablet86.0
ProtonilProtonil 20 Mg Injection58.0
Pantaset DPantaset D 40 Mg/10 Mg Tablet57.0
LansproLanspro 15 Mg Capsule32.0
R T DomR T Dom 10 Mg/150 Mg/20 Mg Tablet9.76

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Zollinger-Ellison syndrome
 2. National Organization for Rare Disorders [Internet], Zollinger-Ellison Syndrome
 3. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Zollinger-Ellison Syndrome.
 4. National Center for Advancing and Translational Sciences. Zollinger-Ellison syndrome. Genetic and Rare Diseases Information Center
 5. Paola Tomassetti et al. Treatment of Zollinger-Ellison Syndrome. World J Gastroenterol. 2005 Sep 21; 11(35): 5423–5432. PMID: 16222731
और पढ़ें ...