myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) काय आहे?

लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी), ज्यांना व्हेनेरल रोग म्हणून देखील ओळखले जाते, हे असे रोग आहेत ज्यांचा संसर्ग लैंगिक संभोग करताना होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जगभरात दररोज 1 दशलक्षापेक्षा जास्त लोकांमध्ये एसटीडीचे निदान केले जाते. भारतात दरवर्षी 30-35 दशलक्ष एसटीडीचे रुग्ण आढळतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बहुतेक वेळा, एसटीडीचे लक्षण स्पष्ट दिसत नाहीत. एसटीडीच्या सामान्य नैदानिक चिन्हे आणि लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • जननेंद्रिय अवयवांद्वारे असामान्य डिस्चार्ज.
 • जननेंद्रियाच्या भागाजवळ फोड किंवा कातडीवर चामखीळ.
 • लघवी करताना त्रास होतो.
 • योनीतून दुर्गंधीयुक्त द्रव स्त्रवते.
 • वाढलेले शरीराचे तपमान.
 • लैंगिक संभोग करतांना अस्वस्थता.

याची मुख्य कारणं काय आहेत?

एसटीडी प्रामुख्याने पुढील कारणांमुळे होते:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर शारीरिक तपासणी, वैद्यकीय इतिहास आणि प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात . संक्रमणांच्या प्रकारावर अवलंबून, अतिरिक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो :

 • जलद एचआयव्ही चाचणी.
 • एलिसा.
 • योनि / पेनाइल स्रावांचे मूल्यांकन.

एसटीडीच्या उपचारांमध्ये अंतर्भूत संसर्गाचा उपचार करणे समाविष्ट असते. एसटीडीच्या बॅक्टेरियल, व्हायरल किंवा फंगल/बुरशीजन्य उत्पत्तीवर अवलंबून एसटीडीचा उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरल्स किंवा अँटीफंगल्स सारखी औषध वापरली जातात.

एसटीडीचे संक्रमण होण्यापासून रोखणे हे उपचार करण्यापेक्षा सोपे असते. खालील पद्धतींद्वारे एसटीडी रोखता येऊ शकतो:

 • कंडोमचा वापर एसटीडीचा प्रसार रोखण्यास मदत करतो.
 • एसटीडी ठीक होईपर्यंत लैंगिक संभोग टाळावा.
 • महिलांनी डचिंग टाळले पाहिजे कारण ते सामान्य योनीच्या आतील भागाला हानीकारक असते जे त्यास संक्रमणांपासून संरक्षित करते.
 • एचपीव्ही लसीसारख्या काही लसी अशा प्रकारच्या संक्रमणांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.
 • एकाधिक भागीदारांसोबत लैंगिक संभोग एसटीडीचा धोका वाढवू शकतो आणि टाळले पाहिजे. म्युच्युअल मोनोगॅमी म्हणजे फक्त एका भागीदारासोबत संभोग करीत आहे, अशा प्रकारचे संक्रमण टाळण्यास मदत करू शकते.
 • दोन्ही भागीदारांना एसटीडीसाठी चाचणी करणे केव्हाही उत्तम असते.

जर योग्य काळजी घेतली नाही तर एसटीडी भागीदारांच्या दरम्यान संक्रमित होतो. हा प्रतिबंधनीय रोग आहे जो रोगाविषयी योग्य जागरुकता बाळगून टाळता येऊ शकतो.

 1. एसटीडी के प्रकार - Types of STDs in Hindi
 2. यौन संचारित रोगों का निदान - Diagnosis of sexually transmitted diseases in Hindi
 3. एसटीडी का उपचार - Treatment of STDs in Hindi
 4. एसटीडी की रोकथाम - Prevention from STDs in Hindi
 5. लैंगिक संक्रमित रोग साठी डॉक्टर
Dr. Ghanshyam digrawal

Dr. Ghanshyam digrawal

सेक्सोलोजी

Dr. Shailendra Kumar Goel

Dr. Shailendra Kumar Goel

सेक्सोलोजी

Dr. Srikanth Varma

Dr. Srikanth Varma

सेक्सोलोजी