हेपेटायटिस बी - Hepatitis B in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

September 10, 2020

हेपेटायटिस बी
हेपेटायटिस बी

सारांश

हॅपटायटिस बी, हॅपटायटिस बी विषाणूमुळे होणारे एक यकृतातील संक्रमण आहे. त्याचे दोन स्वरूप असू शकतात- तीव्र संक्रमण( संक्रमणाचे आकस्मिक उत्सर्ग, जे पटकन बिघडू शकते, पण अधिकतर वेळेवर उपचार केल्यास थोडे दिवसच टिकते)आणि दीर्घकालिक असलेले घातक संक्रमण. संक्रमणानंतर, हॅपटायटिस बी विषाणू शरिरातील द्रव्ये आणि गळतींमध्ये अस्तित्वात असतो. विकसित देशांमध्ये, एचबीव्ही साधारपणें असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तनलिकांमध्ये मादक पदार्थे घेतल्याने पसरतो. तीव्र संक्रमणामध्ये, डोकेदुखी, पोटात गैरसोय, अंगदुखी, सांधेदुखी, मळमळ आणि शेवटी कावीळ झाल्यामुळे त्वचा व डोळे पिवळसर होणें, याप्रकारची लक्षणे दिसतात. कावीळ झाल्यानंतर मळमळ आणि अतिसार आढळतात.

घातक हॅपटायटिस बी संक्रमण यकृतातील निकामी पाडू शकते आणि यकृताच्या कर्करोगाचेही कारण बनू शकते. तीव्र हॅपटायटिस बी संक्रमणासाठी, साधारणपणें पर्याप्त विश्रांती, अधिकाधिक द्रव्ये घेणें आणि निरोगी आहार उपचार कार्यक्रम म्हणून पुरेसे आहे. घातक हॅपटायटिस बीमध्ये, यकृताच्या आजाराचे नियमित पर्यवेक्षण केले जाते. आवश्यकता असल्यास, मौखिक विषाणूरोधी पदार्थ सुरू केले जातात. मात्र, एकदा विषाणूरोधी उपचार सुरू झाले, तर रुग्णाला ते उपचार जीवनपर्यंत घ्यावे लागते. उपचार न झाल्यास, घातक हॅपटायटिस बी संक्रमणामध्ये वाढ होऊन लिव्हर स्कॅरिंग किंवा यकृताचे कर्करोगही होऊ शकते.

हेपेटायटिस बी ची लक्षणे - Symptoms of Hepatitis B in Marathi

संक्रमण तीव्र आहे की घातक, यावर लक्षणे अवलंबून असतात.

तीव्र हॅपटायटिस बी

तीव्र हॅपटायटिस बीची लक्षणे याप्रमाणे असतात:

 • साधारण अंगदुखी आणि वेदना
 •  38⁰C (100.4 F) किंवा अधिक ताप.
 • सतत आजारी असल्याची जाणीव.
 • भूक न लागणें.
 • थकवा.
 • मळमळ.
 • उलटी.
 • पोटदुखी.
 • गडद रंगाची लघवी.
 • माती किंवा राखेच्या रंगाचे शौच
 • डोळे किंवा त्वचा पिवळी पडणें( कावीळ).

घातक हॅपटायटिस बी

घातक हॅपटायटिस बी असलेल्या बहुतांश लोकांना कोणतीच सामान्य लक्षणे अनुभवास येत नाहीत आणि अनेक वर्षे ते लक्षणांपासून मुक्त असतात. लक्षणे दिसतात, तेव्हा ती तीव्र संक्रमणासारखीच असतात. लक्षणांमध्ये खाद्यपदार्थ, सिगारेट इ. घेण्याची इच्छा न होणें आणि मधल्यामध्ये, पोटाच्या वरच्या भागात सौम्य ते मध्यन स्वरूपाची वेदना सामील असू शकतात. यकृताच्या कार्याशी निगडीत काही रक्तचाचण्या या टप्प्यावर असामान्य  किंमती दाखवणें सुरू करतात.

हेपेटायटिस बी चा उपचार - Treatment of Hepatitis B in Marathi

तीव्र हॅपटायटिस बी 
तीव्र संक्रमणामध्ये, व्यवस्थापन सामान्यपणें समर्थनात्मक असून, व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याच्या पुनरुत्थानावर केंद्रित असते. सामान्यपणें, औषधे विहित केली जात नाहीत. डॉक्टर पर्याप्त पोषक समतोल, जलीकरण आणि विश्रांतीचा सल्ला देतात.

घातक हॅपटायटिस बी
घातक संक्रमणाचे उपचार साधारणपणें टेनॉफॉव्हिर किंवा एंटेकॅव्हिरसारख्या मौखिक विषाणूरोधी औषधे देऊन केले जाते.उपचाराचे लक्ष सिर्होसिसचे विकास टाळणें किंवा मंदावणें आणि यकृताच्या कर्करोगाची शक्यता कमी करणें असते. उपचार केवळ विषाणू दुप्पट होण्याचा वेग कमी करतो. त्याने रोग बरा होत नाही. म्हणून,बहुतांश लोकांना हे उपचार जीवनपर्यंत घ्यावे लागतात.

जीवनशैली व्यवस्थापन

असे खूप जीवनशैली बदल आहेत, ज्याने लोक हॅपटायटिस बी  संक्रमणाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणें करू शकतात,उदा.:

 • मद्यपान व धूम्रपान दोन्हींमुळे यकृताची हानी होत असल्यामुळे दोन्ही टाळा, कारण यकृताला पहिलेच हॅपटायटिस बी संक्रमणादरम्यान त्या विषाणूद्वारे इजा झालेली असते.
 • वनस्पतीजन्य औषधे किंवा व्हिटॅमिन पूरक तत्त्वे घेणें सुरू करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणें महत्त्वाचे आहे, कारण या पर्यायी उपचारांपैकी काही यकृताला निकामी करू शकतातकिंवा तुमच्या विहित औषधांमध्ये बाधा आणतात.
 • डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय, सहज मिळणारी औषधे उदा.पॅरासिटमॉल घेऊ नका, कारण अशा बहुतांश औषधांवर यकृताद्वारे प्रक्रिया होते आणि यांमुळे यकृताची हानी होऊ शकते.
 •  स्कॅलॉप, म्युसेल किंवा क्लॅमसारखे कच्चे किंवा कमी भाजलेले मासे खाणें टाळा, कारण त्यांच्यामध्ये व्हायब्रिओ व्हुल्निफिकस  नावाच्या एका जंतूचे जिवाणूजन्य संक्रमण असते, जे यकृतासाठी खूप विषारी आहे.
 • पेंट थिनर( भिंतीचे रंग पातळ करणारे पदार्थ), घरगुती साफसफाईची उत्पादने, नेल पॉलिश रिमूव्हर यांसारखे तीव्र गंध श्वासात घेणें टाळा, कारण त्यांच्यामध्ये विषारीपणाचा संभव असतो.
 • भरपूर भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्ये असलेले निरोगी आहार घ्या. पातकोबी, ब्रोकोली आणि फुलकोबी विशेषकरून यकृताची सुरक्षा करण्याचे कार्य करतात.
 • दाणे, मका, शेंगदाणे आणि बाजर्र्यावरील मोड पाहूनच त्यांचे सेवन करा. मोड असल्याने त्यांच्यात “एफ्लाटॉक्सिन”ही असू शकतात, जे यकृतासाठी घातक असतात.
 • नियमित व्यायाम करा.
 • यकृतातील दाह प्रमाणाबाहेर होऊ न देण्यासाठी, आजाराच्या तीव्रतेनुसार जेवणात प्रथिन,द्रव्य आणि मिठाचे वापर नियंत्रित केले पाहिजे.

हेपेटायटिस बी काय आहे - What is Hepatitis B in Marathi

हॅपटायटिस म्हणजे यकृताची सूज किंवा दाह.यकृतामध्ये दाह झाल्यास, त्याची कित्येक कार्ये प्रभावित होतात, कारण बहुतांश यकृताची कार्ये एकामेकाला संबंधित असतात. हॅपटायटिस बी विषाणूचे संक्रमण यकृतात झाल्यास, त्या परिस्थितीला हॅपटायटिस बी संक्रमण म्हणतात.

वैश्विकरीत्या, हॅपटायटिस बी विषाणू संक्रमण एक लक्षणीय आरोग्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे केलेल्या संशोधनांनुसार, 200 कोटीपेक्षा अधिक लोकांना आतापर्यंत हॅपटायटिस बी विषाणूचे संक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी अंदाजे 24 कोटी लोकांना घातक यकृत संक्रमण झाले आहे. प्रतीवर्ष, 7,80 000 पेक्षा अधिक लोक तीव्र किंवा घातक हॅपटायटिस बी  संक्रमणामुळे मृत्यू पावतात.

भारतात जगाची प्रत्येक पाचवी व्यक्ती राहत असल्यामुळे, जगभरातील हॅपटायटिस बी रुग्णांचे मोठे प्रमाण आपल्या देशात आढळतात. 10-15% जगभरातील हॅपटायटिस बी संग्राहक आपल्याकडे आढलतात. संशोधनांतील अंदाज आहे की, भारतात जवळपास 4 कोटी हॅपटायटिस बी  संग्राहक आहेत. संदर्भ

 1. Ray G. Current Scenario of Hepatitis B and Its Treatment in India. Journal of Clinical and Translational Hepatology. 2017;5(3):277-296. doi:10.14218/JCTH.2017.00024. PMID: 28936409
 2. Gautam Ray. Current Scenario of Hepatitis B and Its Treatment in India. J Clin Transl Hepatol. 2017 Sep 28; 5(3): 277–296. PMID: 28936409
 3. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Hepatitis B.
 4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Viral Hepatitis
 5. Lavanchy D. Hepatitis B virus epidemiology, disease burden, treatment, and current and emerging prevention and control measures. J Viral Hepat. 2004 Mar;11(2):97-107. PMID: 14996343
 6. Goldstein S.T., Zhou F., Hadler S.C., Bell B.P., Mast E.E., Margolis H.S. A mathematical model to estimate global hepatitis B disease burden and vaccination impact. Int J Epidemiol. 2005; 34:1329–1339. PMID: 16249217
 7. Dutta S. An overview of molecular epidemiology of hepatitis B virus (HBV) in India.. Viral J. 2008; 5:156. PMID: 19099581
 8. Am Fam Physician. 2004 Jan 1;69(1):75-82. [Internet] American Academy of Family Physicians; Hepatitis B.
 9. National Health Service [Internet]. UK; Hepatitis B.
 10. Shiffman ML. Management of acute hepatitis B.. Clin Liver Dis. 2010 Feb;14(1):75-91; viii-ix. PMID: 20123442

हेपेटायटिस बी चे डॉक्टर

Dr. Abhay Singh Dr. Abhay Singh Gastroenterology
1 Years of Experience
Dr. Suraj Bhagat Dr. Suraj Bhagat Gastroenterology
23 Years of Experience
Dr. Smruti Ranjan Mishra Dr. Smruti Ranjan Mishra Gastroenterology
23 Years of Experience
Dr. Sankar Narayanan Dr. Sankar Narayanan Gastroenterology
10 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

हेपेटायटिस बी साठी औषधे

हेपेटायटिस बी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।