myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा काय आहे?

ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा हा मेंदूच्या कर्करोगा चा एक असामान्य प्रकार आहे. मेंदूमध्ये विशिष्ट चांदणीच्या-आकाराच्या पेशी असतात ज्याला ॲस्ट्रोसाइट म्हणतात. ॲस्ट्रोसाइट्स, इतर मेंदूच्या पेशींसह, पाठीचा कणा आणि मेंदूच्या आसपास असलेल्या तंत्रिका पेशींना झाकतात आणि संरक्षित करतात. या पेशींना ग्लियल पेशी म्हणतात, आणि एकत्रितपणे ते ग्लिअल टिश्यू नावाचे ऊतक बनवतात; अशा प्रकारच्या पेशींच्या कर्करोगा ला ग्लिओमा म्हणतात. ॲस्ट्रोसाइट्सच्या ट्यूमरला ॲस्ट्रोसाइटोमा म्हणतात. ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा ग्रेड III ट्यूमर आहे आणि जर वाढून स्टेज IV पर्यंत पोहोचला असेल तर त्याला ग्लिओलास्टोमा मल्टीफोर्मी म्हणतात. ग्लिओलास्टोमा कमी दर्जाचा असल्यास तो कमी वेगाने विकसित होतो आणि गंभीर असेल तर अति वेगाने विकसित होतो. दुर्दैवाने, ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा उपचारात्मक नाही, परंतु पुढे वाढण्यापासून त्याला अडवता येऊ शकते

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मेंदूमध्ये विशिष्ट समर्पित क्षेत्र आहेत जे वैयक्तिक कार्ये नियंत्रित करतात; म्हणून, या रोगाची लक्षणे ट्यूमर च्या आकार आणि स्थानावर अवलंबून असतात. सामान्यत खालील लक्षणं दिसतात: डोकेदुखी, उलट्या होणे, व्यक्तिमत्त्व बदलणे, मानसिक स्थितीतील बदल, हात व पायात अशक्तपणा, झटके येणे, समन्वयात अडचणी आणि दृष्टीच्या समस्या.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अशा ट्युमरचे नेमके कारण अजूनही अज्ञात आहे. संशोधक अशा काही घटकांचा अभ्यास करीत आहेत ज्यामुळे पेशींमध्ये असामान्यता उद्भवू शकते, आणि ट्युमरचा विकास होऊ शकतो.

खालील कारणांमुळे हा रोग होऊ शकतो:

 • अनुवांशिक असामान्यता.
 • पर्यावरणीय घटक, जसे विषारी पदार्थाची बाधा, रसायने आणि हानिकारक रेडिएशन.
 • इम्यूनोलॉजिक असामान्यता .
 • आहार.
 • तणाव.

ॲस्ट्रोसाइटोमा विशेषत: काही आनुवंशिक विकारांमध्ये जसे की न्यूरोफिब्रोमेटोसिस प्रकार I, ट्यूबरस स्क्लेरोसिस, ली-फ्रॉम्युनी सिंड्रोम आणि टर्कोट सिंड्रोम जास्त वारंवार उद्भवतो

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

या अवस्थेचे निदान करणे कठीण आहे आणि वैयक्तिक, पद्धतशीर क्लिनिकल तपासणी आणि विविध इमेजिंग तंत्रांचा तपशीलवार वैद्यकीय इतिहास यावर आधारित आहे. सर्व उपरोक्त आंतरनिरासन तपशिलवार मेंदूच्या रचनेचा आणि आकार, स्थान आणि विस्तारावर आधारित ट्युमरच्या मूल्यांकनाचा सर्वात प्रभावी उपचारांमध्ये मदत करण्यासाठी अभ्यास केला जातो.

असाध्य असला तरी, ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा ट्यूमरचा प्रसार प्रतिबंध करून व्यवस्थापित केला जाऊ शकतो. तीन मूलभूत उपचारांचा वापर केला जाऊ शकतो ज्यामध्ये शस्रक्रिया, रेडिएशन थेरेपी, आणि किमोथेरपी, एकच किंवा रुग्णानुसार एकत्रितपणे वापरल्या जाऊ शकतात.

खालील असंख्य घटकांच्या आधारावर एखाद्या व्यक्तीवर उपचार कसे करावेत हा निर्णय डॉक्टर्स, नर्स आणि हेल्थकेअर तज्ञांची एक टीम घेते

 • स्थान, आकार, विस्तार, ट्यूमरचा प्रसार आणि दुर्बलतेचे प्रमाण,
 • व्यक्तीचे वय आणि आरोग्य स्थिती,
 • वैद्यकीय इतिहास, आणि इतर मूलतत्वे.

ट्यूमर शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्याचे प्रारंभिक मूल्यांकन केले जाते आणि जर सूचित केले गेले तर ते उपचारांसाठी शस्रक्रियेला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर रेडिएशन आणि नंतर किमोथेरपी केली जाते. शस्त्रक्रिया करून काढून टाकणे शक्य नसल्यास, उपचार केवळ रेडिएशन थेरपीनेच सुरू केले जाऊ शकतात.

टेमोझोलोमाइड (टेमोदर) हा एकमात्र किमोथेरेपीटिक एजंट आहे जो अन्न व औषध प्रशासनाद्वारे (एफडीए) प्रौढांच्या (परंतु मुलांच्या नाही) ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमाच्या उपचारांसाठी मान्य केला गेला आहे.

 1. ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा साठी औषधे

ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा साठी औषधे

ॲनाप्लास्टिक ॲस्ट्रोसाइटोमा के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Gliotem खरीदें
Gliozolamide खरीदें
Glioz खरीदें
Nublast खरीदें
Temcad खरीदें
Temcure खरीदें
Temodal खरीदें
Temokem खरीदें
Temonat खरीदें
Temoside खरीदें
Glistroma खरीदें
Imozide खरीदें
Tabze खरीदें
Temoglan खरीदें
Temolon खरीदें
Temotec खरीदें
Temotide खरीदें
Temotrust खरीदें
Temozam खरीदें
Tolmd खरीदें
Hodpro खरीदें
Neozine खरीदें
P Carzine खरीदें
Procarb खरीदें
Temozad खरीदें

References

 1. National Organization for Rare Disorders. Anaplastic Astrocytoma. [internet]
 2. National Centre for Advancing Translational Science. Anaplastic astrocytoma. Genetic and Rare Diseases Information Center. [internet]
 3. University of Rochester Medical Center Rochester. Anaplastic Astrocytoma. [internet]
 4. Medanta The Medicity. Anaplastic Astrocytoma. [internet]
 5. Pan E, Prados . Glioblastoma Multiforme, Anaplastic Astrocytoma, Kufe DW, Pollock RE, Weichselbaum RR, et al. Glioblastoma Multiforme and Anaplastic Astrocytoma. Cancer Medicine. 6th edition. Hamilton (ON): BC Decker; 2003.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें