ब्लॅडर इन्फेक्शन - Bladder Infection in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 28, 2018

July 31, 2020

कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो
ब्लॅडर इन्फेक्शन
कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

ब्लॅडर इन्फेक्शन काय आहे?

ब्लॅडर इन्फेक्शन (सिस्टायटिस) हे मूत्रमार्गातील संसर्गाचा सर्वात कॉमन प्रकार आहे जो मुलांना व प्रौढांना समान प्रमाणात प्रभावित करतो. मूत्रपिंड संसर्गा किडनी (पायलेनोफ्रीयटिस) आणि मूत्रमार्ग (युरेथिरायटिस) यांना सुद्धा प्रभावित करु शकतो. स्त्रिया पुरुषांपेक्षा मूत्राशय संसर्गास अधिक प्रवण असतात. मूत्राशयाची जळजळ होणे आणि वारंवार लघवीला येणे हे ब्लॅडर इन्फेक्शन चे सर्वात सामान्य लक्षण आहेत. जेव्हा त्याचा उपचार केला जात नाही तेव्हा संसर्ग किडनीत आणि/किंवा मूत्रमार्गात पसरतो.अस्वस्थ करणाऱ्या संसर्ग आणि लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्सची शिफारस करतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ब्लॅडर इन्फेक्शनशी संबंधित लक्षणांमुळे बरेचदा गंभीर त्रास होतो. यात खालील लक्षणे दिसून येतात:

 • लघवी करत असताना वेदना आणि/किंवा जळजळ होणे (अधिक वाचा: वेदनादायी मूत्रविसर्जनाची कारणे).
 • परत-परत लघवी येणे,एकदा लघवी केल्यानंतर परत लघवी ची इच्छा होणे व असे दिवस रात्र होणे.
 • लघवी थांबवून ठेवण्यास असमर्थता.
 • मूत्राच्या रंगात बदल- ढगाळ, गडद रंगीत इ.
 • गंभीर संसर्ग झाल्यास मूत्रातून रक्त येणे.
 • मूत्राचा घाण वास येणे.
 • अशक्तपणा आणि पोटाच्या खाली वेदना होणे.
 • गंभीर संसर्गाच्या प्रकरणात थंडी सोबत ताप.

याचे मुख्य कारण काय आहेत?

बहुतांश प्रकरणात मूत्रमार्ग संसर्ग किंवा ब्लॅडर इन्फेक्शन हे इ.कोलाई (E. coli.) या जिवाणू मुळे होते.

संसर्गाची जोखीम वाढविणारे घटक खालीलप्रमाणे आहेत:

 • ब्लॅडर मधे बऱ्याच काळापासून ठेवलेला कॅथेटर.
 • लैंगिक संभोग, मेनोपॉझ,गर्भनिरोधनक पद्धती (डायाफ्राम), गर्भधारणा ई.  ह्यांमुळे सामान्यत: स्त्रियांमध्ये मूत्राशय संक्रमण होते. मूत्रमार्गाच्या कमी लांबीमुळे आणि मूत्रमार्गाचे स्थान गुदे जवळ उघडत असल्यामुळे महिलांना मूत्राशय संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते.
 • मधुमेह.
 • वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी.
 • वाढलेले वय आणि दीर्घकालीन आजार सोबत बऱ्याच काळापासून कुठलीही हालचाल न होणे.
 • शस्त्रक्रिया किंवा मूत्रमार्गाशी संबंधित इतर प्रक्रिया.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

लक्षणे आणि शारीरिक तपासणीच्या आधारावर डॉक्टर  ब्लॅडेर इन्फेक्शनचे निदान करतात. निदानाची पुष्टी करण्यात मदत या चाचण्या करतात:

मूत्र विश्लेषण

 • डीप-स्टिक चाचणीचा उपयोग मूत्रातील वाढत्या ॲसिडिटी चा शोध घेण्यासाठी केला जातो. मूत्रातील संसर्ग शोधण्यासाठी ही सर्वात महाग चाचणी आहे.
 • नायट्राइट्स आणि ल्युकोसाइट्स एस्टरिस चाचणी ही पांढऱ्या रक्त पेशींची उपस्थिती तपासण्यासाठी केली जाते.
 • कृत्रिम माध्यमातील पेशीच्या नमुन्यांमधील संसर्गास कारणीभूत जिवाणूंच्या वाढीचे मूल्यांकन करण्यासाठी यूरिन कल्चर केले जाते.

इमेजिंग स्टडीज

गंभीर आणि पुनरावृत्ती होणाऱ्या संसर्गाचे किंवा मानक उपचारांना प्रतिसाद न देणारे संसर्गांसाठी इतर अनेक तपासण्या केल्या जातात. या तपासणीत हे समाविष्ट आहे:

 • सिस्टोस्कोपी.
 • अल्ट्रासाऊंड.
 • एक्स-रे इमेजिंग.
 • इंट्राव्हेनस पायलोग्राम (आयव्हीपी) (IVP).
 • कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन (सीटी स्कॅन).
 • मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग(एमआरआय-MRI).
 • युरोडायनामिक स्टडी.

ब्लॅडर इन्फेक्शनच्या उपचारचा उद्देश हा संसर्ग आणि त्रासदायक लक्षणे दूर करणे हा आहे.

अँटीबायोटिक्स

 • ब्लॅडर इन्फेक्शन च्या  समस्येचे निराकरण अँटीबायोटिक कोर्सने प्रौढांमध्ये सामान्यतः  5 दिवसात आणि लहान मुलांमधे 2 ते 3 दिवसात होते.
 • संसर्गाची पुनरावृत्ती बरेचदा अँटीबायोटिक च्या दीर्घ कोर्स मुळे टळते.
 • गंभीर संसर्गांमध्ये  इंट्राव्हेनस अँटीबायोटिक्स दिले जातात.

इतर औषधं

 • मूत्र अल्कालनायजर ही अशी औषधं आहेत ज्यामुळे मूत्रातील ॲसिडिटी आणि जळजळ कमी होते.

स्वत: ची काळजी

 • भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ प्या ज्यामुळे संसर्ग वारंवार येणाऱ्या लघवीमुळे बाहेर फेकला जाईल.
 • मूत्रमार्गाच्या संसर्गा दरम्यान नॉन स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स सारखे औषध घेणे टाळा जसे इब्यूप्रोफिन किंवा ॲस्प्रिन, कारण यामुळे काही समस्या येऊ शकतात.
 • क्रॅनबेरीचा रस ब्लॅडर इन्फेक्शन ची पुनरावृत्ती होणे टाळते.
 • गरम पाणी पोटातील वेदना कमी करण्यात मदत करते.संदर्भ

 1. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Definition & Facts
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Cystitis - acute
 3. National Kidney Foundation. Urinary Tract Infections. [internet]
 4. American Academy of Family Physicians. Diagnosis and Treatment of Acute Uncomplicated Cystitis. Am Fam Physician. 2011 Oct 1;84(7):771-776. University of Maryland School of Medicine, Baltimore, Maryland
 5. National Health Service [Internet]. UK; Urinary tract infections (UTIs)
 6. National Health Service [Internet]. UK; Urinary tract infections (UTIs)

ब्लॅडर इन्फेक्शन चे डॉक्टर

Dr. Virender Kaur Sekhon Dr. Virender Kaur Sekhon Urology
14 वर्षों का अनुभव
Dr. Rajesh Ahlawat Dr. Rajesh Ahlawat Urology
44 वर्षों का अनुभव
Dr. Prasun Ghosh Dr. Prasun Ghosh Urology
26 वर्षों का अनुभव
Dr. Pankaj Wadhwa Dr. Pankaj Wadhwa Urology
26 वर्षों का अनुभव
डॉक्टरांचा सल्ला घ्या

ब्लॅडर इन्फेक्शन साठी औषधे

ब्लॅडर इन्फेक्शन के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

दवा का नाम

कीमत

₹90.3

20% छूट + 5% कैशबैक


₹96.36

20% छूट + 5% कैशबैक


₹90.29

20% छूट + 5% कैशबैक


₹137.83

20% छूट + 5% कैशबैक


₹46.9

20% छूट + 5% कैशबैक


₹29.65

20% छूट + 5% कैशबैक


₹91.0

20% छूट + 5% कैशबैक


₹16.23

20% छूट + 5% कैशबैक


₹182.7

20% छूट + 5% कैशबैक


₹91.7

20% छूट + 5% कैशबैक


Showing 1 to 10 of 986 entries