पापण्या सुजणे - Eyelid Inflammation in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 28, 2018

July 31, 2020

पापण्या सुजणे
पापण्या सुजणे

पापण्या सुजणे म्हणजे काय?

मुख्यतः पापण्यांच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या जिवाणू संसर्गामुळे पापण्या सुजतात. पापण्यातील केस ग्रंथी, मैबोमियन ग्रंथी (तेल स्त्राव करणाऱ्या ग्रंथी ज्या डोळ्यातील कोरडेपणा प्रतिबंधित करतात) आणि लॅक्रिमल ग्रंथी (अश्रू स्त्राव करणाऱ्या ग्रंथी) या पापण्या सुजण्याच्या सामान्य जागा आहेत. पापण्यावरील सूजेची पुन्हा पुन्हा येण्याची प्रवृत्ती असते.

पापण्या सुजणे याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सूज येण्याच्या जागेवर अवलंबून पापण्या सुजणे याची वेगवेगळी चिन्हे आणि लक्षणे उपस्थित आहेत.

 • ब्लेफाराइटिस - ही पापण्यांच्या कडेला पापण्यांच्या केस ग्रंथींना येणारी सूज आहे. सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत
  • लाल, सुजलेले आणि वेदनादायक पापण्यांचे काठ.
  • पापण्यांच्या केसांच्या तळाशी जाड खपली किंवा थर.
  • चुरचूर आणि जळजळणारे डोळे.
  • वाढलेली संवेदनशीलता किंवा लाईटची असहिष्णुता
 • कलेझियाॅन - घाम ग्रंथीमध्ये (झैस ग्रंथी) अडथळा निर्माण झाल्यास पापणीवर टेंगूळ येतो. संसर्गामुळे अडथळा निर्माण होत नाही. वारंवार होणाऱ्या तीव्र पापण्यांचा दाह किंवा तीव्र ब्लेफाराइटिस कलेझियाॅन होण्यास कारणीभूत आहेत.
  • सुरूवातीला, पापणीच्या प्रभावित भागात लालसरपणा आणि वेदना होतात.
  • नंतरच्या टप्प्यात कलेझियाॅन वेदनारहित असतो.
  • कलेझियाॅन एका किंवा दोन्ही पापण्यांमध्ये एकाच वेळी होऊ शकतो.
 • हाॅर्डीओलियम किंवा रांजणवाडी - पापणीत खोल आतमध्ये असलेल्या मैबोमियन ग्रंथी आणि डोळ्याच्या केस ग्रंथी यामध्ये होणाऱ्या संसर्गामुळे पापणीच्या कडेला वेदनादायक टेंगूळ म्हणजे रांजणवाडी होय
  • प्रभावित पापणी लाल होते आणि सूजते.
  • रांजणवाडी वेदनादायक असते आणि कधीकधी पस येतो.
  • प्रभावित डोळ्यामध्ये लालसरपणा आणि पाणी येणे.
 • अश्रू ग्रंथीचा दाह आणि अश्रू पिशवीचा दाह - हे बॅक्टेरियल आणि वायरल संसर्गामुळे अश्रू स्त्राव करणाऱ्या ग्रंथी आणि त्याची पिशवी यास येणारी सूज आहे

पापण्या सुजणे याची मुख्य कारणं काय आहेत?

जिवाणू किंवा व्हायरस यामुळे होणारी बाधा ही पापण्या सुजणे याचे मुख्य कारण आहे. इतर विकृती ज्या सामान्यपणे पापण्या सुजणे याशी संबंधित आहेत, त्या खालील प्रमाणे आहेत:

 • सेबोर्हिक डर्माटीटीस, ज्यामध्ये टाळूची त्वचा, भुवया, पापण्या इत्यादींमधील तेल ग्रंथीचा समावेश आहे
 • पापण्यांच्या दाहासोबत रोसासिआ (चेहर्‍यावरील त्वचा निघून जाणे आणि लालसर होणे) वारंवार दिसून येतो
 • पापण्यातील तेल ग्रंथींनी सिक्रिट केलेल्या तेलात घट आणि असामान्यता येतो

पापण्या सुजणे याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

मुख्यतः डाॅक्टर डोळ्यांची भौतिक चाचणी आणि लक्षणांचा इतिहास याच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारच्या पापणीच्या दाहकतेचे निदान करतात.

उपचार करण्याचा उद्देश कारणांवर उपचार करणे, सूज कमी करणे आणि दाहकपणामुळे होणारी इतर लक्षणे दूर करणे हे आहे.

 • संसर्गावर उपचार करण्यासाठी मुख्यतः ॲन्टीबायोटीक आय ड्राॅप्स वापरले जातात.
 • जर सूज गंभीर असेल तर स्टेराॅइड आय ड्राॅप्स वापरले जातात.
 • जेव्हा ब्लेफाराइटिस डोक्यातील कोंडा याशी संबंधित असतै तेव्हा डाॅक्टर सामान्यपणे ॲन्टी-डॅन्ड्रफ शॅम्पू लिहून देतात.

स्व-काळजीचे हे उपाय फायदेशीर आहेत

 • उबदार शेक, सूज कमी करण्यास आणि पापण्यातील तेलाचे अभिसरण वाढवण्यास मदत करते.
 • पापण्यावरील चिकट थर किंवा फ्लेक्स स्वच्छ करण्यासाठी सौम्य साबण मिश्रित कोमट पाणी किंवा सौम्य स्क्रबिंग वापरले जाते.
 • योग्य स्वच्छता राखल्यास वारंवार होणारा संसर्ग टाळता येतो.संदर्भ

 1. Association of Optometrists. WHAT IS MEIBOMIAN GLAND DYSFUNCTION (MGD)?. London; [Internet]
 2. National Institutes of Health. Blepharitis Defined. The National Eye Institute; [Internet]
 3. National Health Service [Internet]. UK; Blepharitis
 4. National Health Service [Internet]. UK; Stye
 5. American Academy of Ophthalmology. Lacrimal Sac (Dacryocystitis). [internet]
 6. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; ROSACEA: OVERVIEW

पापण्या सुजणे साठी औषधे

पापण्या सुजणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।