myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

 कोंडा काय आहे?

कोंडा होणे ही त्वचेची एक स्थिती आहे ज्यामुळे टाळूवरील त्वचेवर पांढऱ्या ते करड्या रंगाचे कोरड्या त्वचेचे थर बनतात. ही टाळूवरील त्वचेची एक सामान्य समस्या आहे जी पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही समान परिणाम करते. ही व्यक्तींच्या सामाजिक जीवनावर परिणाम करू शकणारी एक अप्रिय स्थिती आहे. पुरुषांमध्ये कोंड्याची समस्या साधारणतः स्त्रियांपेक्षा जास्त आढळते. जागतिक पातळीवर, लोकसंख्येच्या सुमारे 50% लोकांमध्ये ही समस्या पाहिली जाऊ शकते. भारतात ही समस्या 195785,036 लोकांमध्ये आढळली होती.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सामान्य लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहेः

 • टाळूवरील त्वचेवर  मृत त्वचेचे पांढरे, चिकट पापुद्रे.
 • खवले होणे किंवा टाळूवरील त्वचेला खाज येणे.
 • अनुपस्थित किंवा सौम्य दाह.
 • डोळ्यावर, पापण्यांवर आणि कानांच्या मागच्या बाजूला पापुद्रे दिसणे.

कोंडा सहसा टाळूवरील त्वचेवर होतो त्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर झाल्यास, त्याचे पापुद्रे खांद्यावर पडतात. चरबीसंबंधीत ग्रंथीतील सिबम स्त्रावाचे अतिप्रजनन झाल्याने अथवा संचय झाल्याने टाळूवरील त्वचा तेलकट होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कोंडा होण्याची मुख्य कारण पुढीलप्रमाणे आहेत:

 • सूज किंवा खाजवणारी चिकट त्वचा.
 • शॅम्पूचा अपर्याप्त वापर.
 • मलासेझिया सह बुरशीजन्य संसर्ग.
 • कोरडी त्वचा.
 • केसांच्या उत्पादनांची ॲलर्जी.

संभाव्य धोक्यांमध्ये खालील घटक समाविष्ट आहेत:

 • वयः तारुण्यापासून किंवा किशोरवयापासून मध्यम वयापर्यंत.
 • पुरुष लिंग: पुरुषांमधील हार्मोन चा प्रभाव.
 • अतिरिक्त सिबमचा स्त्राव: मलासेझिया सह बुरशीजन्य संसर्ग टाळूवरील तेल वापरतो आणि अधिक कोंडा होतो.
 • काही आजार: पार्किन्सन रोग (एक न्यूरोलॉजिक विकार) आणि एचआयव्ही संसर्ग.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

कोंडा खवले किंवा पापुद्रे असल्यासारखा दिसतो. यामुळे सेबोर्हिक डर्माटायटिस, सोरियासिस, अटॉपिक डर्माटायटीस, टिनॅकॅपिटिस इ.सारख्या त्वचेच्या विकारांसारखेच कोंड्याची लक्षणे असतात. म्हणून याचे निदान करणे अवघड होते. निदान मुख्यत्वे रुग्णाच्या वैद्यकीय इतिहास बघून आणि शारीरिक परीक्षा करून केले जाते. कधीकधी, त्वचेची बायोप्सी करण्यास सांगितले जाऊ शकते.

अँटी-डँड्रफ (कोंडा घालवण्यासाठीचा) शॅम्पूचा आणि टाळूवरील त्वचेच्या उपचारांचा वापर करणे हा सर्वात प्रभावी उपचार आहे. दुर्दैवाने, हे उपचार सर्व रूग्णांना उपयोगी ठरत नाहीत. जर अँटी-डँड्रफ (कोंडा घालवण्यासाठीचा) शॅम्पू आणि टाळूवरील त्वचेच्या उपचारांचा उपयोग झाला नाही तर  वैद्यकीय स्थितीवर आधारित, योग्य अँटी-बॅक्टेरियल (विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी) किंवा अँटी-फंगल (बुरशीला प्रतिबंध करण्यासाठी) उपचार दिला जाऊ शकतो. लिपोसॉम्स, नियोसॉम्स आणि सॉलिड लिपिड नॅनोपार्टिकल्स सारख्या नवीन औषधी वितरण प्रणाली हळूहळू कोंड्याच्या उपचारांच्या रूपात वापरली जात आहे.

स्वत: च काळजी कशी घ्यावी:

 • टाळूवरील त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे.
 • केसांची काळजी घेण्याच्या योग्य पद्धतींचे पालन करा जसे की हर्बल/वनौषधीयुक्त तेल लावणे आणि नियमितपणे केस धुणे, जेणेकरून कोंड्याची वाढ टाळता येऊ शकेल.
 • शॅम्पूने वारंवार केस धुणे टाळा, कारण टाळूवरील त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त तेल काढून टाकते.
 • आपले केस धसमुसळेपणे विंचरू नका.
 • कोंड्याचे निराकरण होईपर्यंत केस स्टाइल करणे टाळा.

कोंड्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी, केसाची उचित काळजी घेण्याची व्यवस्था करा आणि, जर हे आपला कोंडा कमी करीत नसेल तर या समस्येवर मात करण्यास मदत करण्यासाठी त्रिकोलॉजिस्ट/ केस व त्यांच्या रोगांविषयीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 1. कोंडा साठी औषधे
 2. कोंडा चे डॉक्टर
Dr. Divya Agrawal

Dr. Divya Agrawal

Dermatology
3 वर्षों का अनुभव

Dr. Sarfaraz Pathan

Dr. Sarfaraz Pathan

Dermatology
6 वर्षों का अनुभव

Dr. Krishna Bhalala

Dr. Krishna Bhalala

Dermatology
4 वर्षों का अनुभव

Dr. Deepti Shukla

Dr. Deepti Shukla

Dermatology
5 वर्षों का अनुभव

कोंडा साठी औषधे

कोंडा के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Polybion खरीदें
Dermizole खरीदें
Fungitop खरीदें
Micogel खरीदें
Miconel खरीदें
Cetrimide खरीदें
Etaze SA खरीदें
Relin Guard खरीदें
Clop MG खरीदें
Bjain Acidum Fluoricum Dilution खरीदें
Halozar S खरीदें
Tripletop खरीदें
Keorash खरीदें
Rexgard खरीदें
Clovate GM खरीदें
Rivizole खरीदें
Cosvate Gm खरीदें
Halobik S खरीदें
Zole खरीदें
Dermac Gm खरीदें
Ketorob C खरीदें
Etan GM खरीदें
Ketorob Z खरीदें
Globet Gm खरीदें

References

 1. Frederick Manuel, S Ranganathan. A New Postulate on Two Stages of Dandruff: A Clinical Perspective. Int J Trichology. 2011 Jan-Jun; 3(1): 3–6. PMID: 21769228
 2. Open Access Publisher. Dandruff. [Internet]
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Dandruff, Cradle Cap, and Other Scalp Conditions
 4. Luis J. Borda, Tongyu C. Wikramanayake. Seborrheic Dermatitis and Dandruff: A Comprehensive Review. J Clin Investig Dermatol. 2015 Dec; 3(2): 10.13188/2373-1044.1000019. PMID: 27148560
 5. B Satheesha Nayak et al. A Study on Scalp Hair Health and Hair Care Practices among Malaysian Medical Students. Int J Trichology. 2017 Apr-Jun; 9(2): 58–62. PMID: 28839388
 6. B Satheesha Nayak et al. A Study on Scalp Hair Health and Hair Care Practices among Malaysian Medical Students. Int J Trichology. 2017 Apr-Jun; 9(2): 58–62. PMID: 28839388
 7. B Satheesha Nayak et al. A Study on Scalp Hair Health and Hair Care Practices among Malaysian Medical Students. Int J Trichology. 2017 Apr-Jun; 9(2): 58–62. PMID: 28839388
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें