myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

हाड वाढणे म्हणजे काय?

हाड वाढणे म्हणजे हाडाची लहानशी वाढ, ही हाडाच्या काठावर होते प्रामुख्याने सांध्याच्या बाजूला जिथे दोन हाडं जोडले असतात. हाड वाढणे पाठिच्या कणावर सुद्धा होऊ शकते. कणावर किंवा सांध्यावर हाड वाढल्यामुळे त्यावर प्रेशर वाढते.

सहसा,हाडाची वाढ सूज किंवा जखमे च्या भागात कार्टीलेज किंवा टेंडन जवळ होतो. हाडाची वाढ सामन्यातः खालील भागात होते:

  • पायाच्या टाचे चे हाड- यांना हिल स्पर सुद्धा म्हटले जातू. सहसा, हे वेदनादायक असतात.
  • हात-हाडाची वाढ बोटांच्या सांध्या जवळ होते ज्याने बोटाची हालचाल बंद होते.
  • खांदा - खांद्यातील हाडांच्या वाढीमुळे रोटेट कफ व टेंडन्स आणि स्नायूंच्या घासतात. यामुळे टेंडन (टेंडॉनिटिस) जळजळ करतात आणि अशाप्रकारे खांद्याच्या हालचाली प्रतिबंधित करतात.
  • पाठीचा कणा-पाठीचा कणा निमुळता होण्याला स्पाइनल स्टेनोसिस म्हटले जाते. यामुळे नसांवरील आघातामुळे वेदना, अस्वस्थता होते आणि पाया मध्ये अशक्तपणा येतो .
  • हिप आणि गुडघे - हाडांच्या स्पर्समुळे या क्षेत्रात वेदना होऊ शकतात ज्यामुळे हालचालींच्या गतिवर परिणाम होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बरेचदा, हाडाच्या वाढीची काहीही लक्षण नसतात. पण जेव्हा लक्षणं दिसू लागतात तेव्हा ते बाधित भागांवर अवलंबून असते. हाड वाढल्यामुळे वेदना, बधिरपणा होऊ शकतो अणि प्रभावित भागाच्या जवळच्या उती, टेंडन्स, तंत्रिका किंवा त्वचेत जळजळ होऊ शकते.

टाचेवरील हाडाच्या वाढीमुळे मऊपणा आणि सूज येते व चालणे कठीण होऊ शकते. कधीकधी, हा त्रास हाडच्या तळाशी असल्यास संपूर्ण टाच सूजते.

पाठीच्या कणातील हाडांच्या वाढीमुळे नसांवर आघात होतो. परिणामी, ती नस ज्या अवयवाला पुरवठा करते, तो भाग सुन्न पडतो, गुदगुल्या आणि वेदना होतात.

जेव्हा हाड वाढणे सायलंट असते अणि काही लक्षण दाखवत नाही तेव्हा ते एक्स-रे तपासणी मध्ये दिसू शकते जी वेगळया कारणा साठी केली जाते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सहसा जळजळ अणि प्रेशर पडत अशा ठिकाणी हाडांची वाढ होते.

ऑस्टियोआर्थराइटिस हा एक कॉमन अपायकारक सांध्यांचा रोग आहे. हाड वाढण्याचे हे सर्वात कॉमन कारण आहे. वृद्ध लोकांमध्ये हे जास्त पाहिले जाते. जसजसे आपले वय वाढते, कार्टिलेज झीजते; यामुळे हाडांचे वस्तुमान कमी होते. हे ठिक करायच्या प्रयत्नात शरीर हाड वाढवू लागते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

तपासणी दरम्यान, डॉक्टर अचूक त्रस्त जागा शोधण्यासाठी सांध्याजवळ हात लावून आणि दाबून बघतात. नंतर डॉक्टर त्या विशिष्ट क्षेत्राचा एक्स-रे काढायला सांगतात. आवश्यक असल्यास एमआरआय स्कॅन, सीटी स्कॅन आणि मायलोग्रामसारखे इतर इमेजिंग चाचण्या पण केल्या जातात.

निदानाची पुष्टी झाल्यावर, डॉक्टर वेदना आणि सूज नियंत्रित करण्यासाठी काही ओव्हर-द-काउंटर औषधे लिहून देऊ शकतात. या क्षेत्रावरील स्थानिक थंड वस्तूचा अनुप्रयोग अस्वस्थता कमी करू शकतात.

टाचेच्या ​​स्परसाठी बूट घालणे हा सल्ला पहिले दिला जातो; सततच्या वेदना कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.

आपल्याला विश्रांती, फिजिकल थेरपी आणि हालचालीत बदल करणे हा सल्ला देण्यात येतो. जर स्पर मुळे नसेवर परिणाम होत असेल आणि तीव्र वेदना होत असतील तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

(अधिक वाचा: हाडांच्या वेदनेची कारणं)

  1. हाड वाढणे साठी औषधे
  2. हाड वाढणे साठी डॉक्टर
Dr. Kamal Agarwal

Dr. Kamal Agarwal

ओर्थोपेडिक्स

Dr. Rajat Banchhor

Dr. Rajat Banchhor

ओर्थोपेडिक्स

Dr. Arun S K

Dr. Arun S K

ओर्थोपेडिक्स

हाड वाढणे साठी औषधे

हाड वाढणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
BrufenBrufen 200 Mg Tablet6.0
CombiflamCombiflam Cream38.0
Ibugesic PlusIbugesic Plus 100 Mg/162.5 Mg Suspension22.5
TizapamTizapam 400 Mg/2 Mg Tablet53.0
Espra XnEspra Xn 375 Mg/20 Mg Tablet109.9
LumbrilLumbril Tablet20.58
TizafenTizafen 400 Mg/2 Mg Capsule67.92
EndacheEndache Gel59.0
FenlongFenlong 400 Mg Capsule27.0
Ibuf PIbuf P Tablet14.0
IbugesicIbugesic 100 Mg Suspension22.0
IbuvonIbuvon 100 Mg Suspension10.0
Ibuvon (Wockhardt)Ibuvon Syrup12.0
IcparilIcparil 400 Mg Tablet29.0
MaxofenMaxofen Tablet7.0
TricoffTricoff Syrup60.0
AcefenAcefen 100 Mg/125 Mg Tablet29.0
Adol TabletAdol 200 Mg Tablet42.0
BruriffBruriff 400 Mg Tablet5.0
EmflamEmflam 400 Mg Injection7.0
Fenlong (Skn)Fenlong 200 Mg Tablet20.0
FlamarFlamar 400 Mg Tablet32.0
IbrumacIbrumac 200 Mg Tablet4.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...