myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

ब्रोन्किइक्टेसिस काय आहे?

ब्रोन्काइक्टासिस हा फुफ्फुसांची दीर्घकालीन असणारी स्थिती आहे ज्यामध्ये वायुमार्गाच्या संसर्गा मुळे ब्रोन्कियल भिंती जाड होतात. ब्रोन्कियल भिंती फाटतात आणि क्षतिग्रस्त देखील होतात ज्यामुळे कायमस्वरुपी नुकसान होते.

या अवस्थेत, वायुमार्ग कफ बाहेर काढण्याची क्षमता गमावतात. श्लेष्मा जमा होत जाते आणि जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते, ज्यामुळे वारंवार फुप्फुसाचे संसर्ग होतात.

फुफ्फुसातील अशा पुनरावृत्ती झालेल्या संक्सर्गांमुळे वायुमार्गांमधून हवा आत आणि बाहेर जाण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे महत्वाच्या अवयवांना ऑक्सिजन पुरवठा कमी होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ब्रोन्काइक्टासिसची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • वारंवार खोकल्यातून फेल्गम निघणे.
 • परिश्रम करताना श्वास न येणे.
 • श्वास घेताना शिट्टी चा आवाज येणे (घरघर आवाज येणे).
 • छातीत वेदना होणे.
 • बोटांची टोके एकत्र येणे- नखांखालील उती जाड होतात आणि बोटांची टोकं गोल आणि फुगवटेदार होतात.
 • कालांतराने, कफसोबत रक्त बाहेर जाऊ शकते.

याचे मुख्य कारणं काय आहेत?
बरेचदा ब्रोन्काइक्टासिस हा वायुमार्गाच्या संक्रमणाच्या परिणाम स्वरुप होतो ज्यामुळे त्याच्या भिंती जाड होतात.पण, काही प्रकरणांमध्ये कारण कळत नाही (आयडियोपॅथिक ब्रोन्काइक्टासिस).

काही कारणात्मक घटक पुढील प्रमाणे आहेत:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर स्टेथोस्कोपच्या साहाय्याने फुफ्फुसांच्या आवाजातील असामान्यता तपासतात आणि रक्ताच्या चाचणीचा सल्ला,संसर्ग झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी देऊ शकतात. शिवाय खालील चाचण्या कराव्या लागू शकतात:

 • थुंकेची चाचणी-त्यात जीवाणू किंवा बुरशी असल्याचे तपासायला.
 • छातीचा एक्स-रे किंवा सिटी स्कॅन (CT Scan).
 • प्लमनरी फंक्शन टेस्ट हवेचे किती प्रमाण आत आणि बाहेर घेतले आहे याची तपासणी करते.हे रक्तामध्ये ऑक्सिजन किती प्रमाणात आहे हे देखील तपासते.
 • सिस्टिक फाइब्रोसिस तपासण्यासाठी घामाची तपासणी.
 • वायूमार्गातील आतील तपासणी करण्यासाठी ब्रोन्कोस्कोपी केली जाऊ शकते.

खालीलप्रमाणे ब्रोन्किइक्टेसिस व्यवस्थापित केले जाते:

 • अँटिबायोटिक्स जसे की, एक्सपेक्टोरंट्स आणि म्यूकोलिटिक्स सारखी औषधे सामान्यतः वापरली जातात. ब्रोन्कोडायलेटर्स आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स सारखी इतर औषधे आवश्यकतेनुसार वापरली जातात.
 • हायड्रेशन - भरपूर पाणी पिण्याची शिफारस केली जाते कारण हे वायुमार्गाला ओलं करते आणि कफ चा चिकटपणा कमी करते जेणेकरून तो सहजपणे बाहेर काढता येतो.
 • चेस्ट फिजिकल थेरेपी.
 • ऑक्सिजन थेरेपी.

ब्रोन्काइक्टासिस सोबत जगणे:

 • जर आपण ब्रोन्काइक्टेसिसने ग्रस्त असाल,तर आपण फुफ्फुसाचा संसर्गजसे की न्युमोनिया,टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी. बॅक्टीरियल इन्फेक्शन्स टाळण्यासाठी आपले हात वारंवार धूत राहा आणि न्युमोनियाच्या औषधी साठी आपल्या डॉक्टरला नित्यनेमाने भेट द्या.
 • आपण स्वस्थ खाण्याच्या सवयींचा अवलंब करावा, धूम्रपान टाळावा आणि हायड्रेटेड राहावे म्हणजे भरपूर पाणी पीत राहावे.
 • शारीरिक मेहनत करत राहणे सुद्धा मदतगार ठरू शकते.
 1. ब्रोन्किइक्टेसिस साठी औषधे
 2. ब्रोन्किइक्टेसिस चे डॉक्टर
Dr. K. K. Handa

Dr. K. K. Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Aru Chhabra Handa

Dr. Aru Chhabra Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Yogesh Parmar

Dr. Yogesh Parmar

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

ब्रोन्किइक्टेसिस साठी औषधे

ब्रोन्किइक्टेसिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Microdox LbxMicrodox Lbx Capsule55
Doxt SlDoxt Sl Capsule66
AsthalinAsthalin 5 mg Respirator Solution8
Viscodyne SViscodyne S 4 Mg/100 Mg/1 Mg/2 Mg Syrup53
FilistinFilistin 1 Mg/30 Mg Syrup33
Theo SalbidTheo Salbid 2 Mg/100 Mg Tablet1
ResRes 1 Mg/15 Mg Liquid238
SalbrexSalbrex Expectorant30
Servil Baby SyrupServil Baby Syrup0
Siokof AsSiokof As Syrup50
S MucoliteS Mucolite 30 Mg/2 Mg Syrup52
Ambril SAmbril S 2 Mg/30 Mg Liquid10
BroventBrovent 1 Mg/15 Mg Syrup33
Doxy 1Doxy 169
Respolite SRespolite S 2 Mg/30 Mg Syrup28
Salbutol ASalbutol A 1 Mg/15 Mg Syrup23
Salhexin PaedSalhexin Paed Syrup40
SalmucoliteSalmucolite 2 Mg/30 Mg Liquid25
SalphyllinSalphyllin 1 Mg/15 Mg Syrup0
Ec DoxEc Dox 30 Mg/100 Mg Tablet44
Histonate PlusHistonate Plus 2 Mg/100 Mg Expectorant8
Deletus ADeletus A Liquid8
New AiromlNew Airoml 1 Mg/50 Mg/0.5 Mg Liquid13

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. American lung association. Bronchiectasis. Chicago, Illinois, United States
 2. British Lung Foundation. Why have I got bronchiectasis?. England and Wales. [internet].
 3. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Bronchiectasis
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Bronchiectasis
 5. Clinical Trials. Natural History of Bronchiectasis. U.S. National Library of Medicine. [internet].
और पढ़ें ...