myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

डांग्या खोकला काय आहे?

डांग्या खोकला,परट्यूसिस म्हणूनही ओळखला जातो. हा एक संक्रामक बॅक्टेरियाचा संसर्ग आहे, जो बॉर्डेटेला पॅरट्यूसिसमुळे होतो. हा सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करु शकतो. पण अशक्त लोकात अधिक सामान्य आहे, उदाहरणार्थ अविकसित रोगप्रतिकारकशक्ती असलेले शिशु.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

डांग्या खोकल्याची लक्षणे सहा ते वीस दिवसांच्या दरम्यान दिसतात, ज्याला संसर्गाच्या उद्भवनाचा कालावधी म्हणतात आणि त्याच्या लक्षणांचे तीन चरण आहेत:

  • कॅटेरल अवस्था सुमारे एक आठवड्यापर्यंत टिकते आणि त्यात ही लक्षणे दिसतात -  नाक वाहणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे येणे, घसा खवखवणे, शिंका येणे आणि किंचित वाढलेले तापमान.
  • पॅरोक्ससिमल टप्पा एक आठवडा टिकतो आणि याची लक्षणे तीव्र खोकला, खोकल्यासह कफ, उलट्या, गंभीर प्रकरणांमध्ये त्वचा निळसर होणे ही आहेत.
  • कॉनव्हलसन्ट टप्प्यामध्ये खोकला 3 महिने टिकतो आणि लक्षणांची तीव्रता आणि वारंवारता हळू हळू कमी होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

डांग्या खोकला बॉर्डेटेला पॅरट्यूसिस या जिवाणूंमुळे होणारा संसर्ग आहे. हे जिवाणू फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे वायुमार्गात, मुख्यत्वे विंडपाइप आणि ब्रॉन्काई मध्ये, सूज येते आणि जळजळ होते,ज्यामुळे श्वसनविषयक त्रास होतो. हा संसर्ग अत्यंत संक्रामक आहे आणि संसर्गग्रस्त व्यक्ती खोकलतो किंवा शिंकतो तेव्हा आणि व्यक्तीशी थेट संपर्क साधताना नाक, तोंड किंवा डोळ्यांतून व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत पसरतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डांग्या खोकल्याच्या निदान याप्रकारे केले जाते:

  • रुग्णाचा इतिहास घेणे.
  • वैद्यकीय तपासणी.
  • पोलिमरेझ चेन रिॲक्शन (पीसीआर) चाचणीसाठी नाकाचा स्वाब किंवा एस्पिरेट.
  • कल्चर टेस्ट.
  • पॅरट्यूसिस सीरोलॉजिकल चाचण्या.

डांग्या खोकल्याच्या उपचारात, डॉक्टरांच्या वैद्यकीय निर्णयावर आधारित अँटीबायोटिक्स लवकर घेणे आवश्यक असते.

निवारक उपायांमध्ये राष्ट्रीय प्रतिरक्षण योजनेनुसार नवजात आणि प्रौढांसाठी पॅरट्यूसिस लसीकरणाचा  समावेश आहे. संपूर्ण डोज डिप्थीरिया, टिटॅनस आणि पॅरट्यूसिस ची एकत्रित लस मुलांना दिली जाते. ज्या प्रौढांनी त्यांचे प्राथमिक टीकाकरण वेळापत्रक पूर्ण केले आहे त्यांना बूस्टर डोज दिले जातात.

  1. डांग्या खोकला साठी औषधे
  2. डांग्या खोकला साठी डॉक्टर
Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

संक्रामक रोग

डांग्या खोकला साठी औषधे

डांग्या खोकला के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
AlthrocinAlthrocin 100 Mg Drop27.0
TripvacTripvac Injection40.0
PentaximPentaxim Injection2495.0
Acnetoin TabletAcnetoin 10 Mg Tablet76.0
Agrocin TabletAgrocin 250 Mg Tablet11.0
Citamycin TabletCitamycin 250 Mg Tablet38.0
Cynoryl TabletCynoryl 250 Mg Tablet50.0
E MycinE Mycin 100 Mg Suspension23.0
ADEL Coccus Cacti DilutionCoccus Cacti Dilution 1 M155.0
ErocinErocin 100 Mg Tablet63.0
ErokidErokid 125 Mg Tablet31.0
EromedEromed 125 Mg Suspension27.0
EryconErycon 250 Mg Tablet39.0
ErypalErypal 100 Mg Syrup23.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...