myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

कॉलेरा (पटकी) काय आहे?

कॉलेरा (पटकी) हा एक जीवाणू संसर्ग आहे जो प्रदूषित अन्नपदार्थ किंवा पाण्याचे सेवन केल्याने होतो. हा संसर्ग आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे आणि तो सामाजिक विकास झाला नसल्याचे दर्शवतो. कॉलेरा (पटकी)ची लागण ही सर्वसाधारणपणे अशा भागात होते जिथे स्वच्छ पाणी आणि इतर स्वच्छता सुविधांचा अभाव असतो. हा संसर्ग कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. दरवर्षी 1.3 ते 4 लाख लोक ह्या संसर्गाचे बळी पडतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

प्रदूषित अन्नपदार्थ किंवा पेयाचे सेवन केल्यानंतर कॉलेरा (पटकी)ची लक्षणे दिसायला 12 ते 15 तासांचा अवधी जातो. संसर्गित व्यक्तीच्या मलामधून 1 ते 10 दिवस जीवाणू उत्सर्ग होत रहातो. प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

वेळीच उपचार न मिळाल्यास, शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी होते आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

लहान मुलांमध्ये खालील लक्षणे आढळून येतात:

याची मुख्य कारणं काय आहेत?

कॉलेरा (पटकी) हा पचनसंस्थेचा संसर्ग आहे. तो व्हिब्रियो कोलेरे या जीवाणूमुळे होतो. त्यामुळे जुलाब होतात परिणामी शरीरातील पाण्याचे प्रमाण खालावते. कॉलेरा (पटकी)चे जीवाणू लहान आतड्यामधे विषारी द्रव्य निर्माण करतात त्याच  विषारी द्रव्यांचा हा परिणाम असतो. शरीरातील सोडिअम आणि क्लोराईडमध्ये ह्या विषारी द्रव्यांमुळे असंतुलन निर्माण होते ज्यामुळे अतिप्रमाणात पाणी शरीराबाहेर फेकले जाते आणि शरीरातील आवश्यक अशी खनिजद्रव्ये कमी होतात.

धोकादायक घटकांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:

 • अस्वछता.
 • पोटातील आम्ल थोड्या प्रमाणात किंवा पूर्णत: कमी होणे.
 • संसर्गित व्यक्तीच्या सहवासात राहणे.
 • ओ टाईप रक्त.
 • कच्चे किंवा न शिजवलेले अन्नपदार्थांचे सेवन करणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

तुमच्या संसर्गाच्या तीव्रतेनुसार डॉक्टर खालीलप्रमाणे चाचण्या करण्याचा सल्ला देतात:

 • रक्त चाचण्या: रक्तातील पांढर्‍या पेशींची वाढलेली संख्या आणि एलेक्ट्रोलाईटची पातळी तपासण्यासाठी.
 • रक्तातील ग्लुकोज: रक्तातील ग्लुकोज खूप कमी झाल्यास आजारपण लांबते.
 • मलाची तपासणी: मलाच्या नमुन्यातून व्हिब्रियो कोलेरे ओळखून वेगळे केले जातात.
 • मूत्रपिंडाची कार्यशक्ती तपासणे: मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत काही बिघाड आहे का ते तपासणे.

उपचारात खालील बाबींचा समावेश असतो:

 • ओरल रिहायड्रेशन सोल्युशन/ तोंडावाटे शरीरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी उपाय: शरीरातील कमी झालेली द्रव पातळी आणि इतर पोषण द्रव्ये वाढवली जातात.
 • शिरेतून द्रव पुरवठा: कमी झालेले एलेक्ट्रोलाइट्सचे आणि द्रवाचे प्रमाण पुन:प्रस्थापित करणे.
 • प्रतिजैविके: गंभीर रूग्णांच्या बाबतीत, आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि मलाचे प्रमाण कमी करण्यासाठी
 • झिंक सप्लिमेंट्स: याच्या वापराने कॉलरा (पटकी)ची लक्षणे बर्‍याच प्रमाणात कमी होतात.
 • लसीकरण: सर्वसाधारणपणे प्रवासी, आरोग्य तसेच ह्युमनिटेरियन क्षेत्रात काम करणारे, प्रतिकारशक्ति कमी असणार्‍या आणि जठरातील आम्लाचे प्रमाण कमी असणार्‍या व्यक्तींना केले जाते.

स्वत:ची काळजी कशी घ्यावी:

 • खाण्यापूर्वी हात स्वछ धुवावेत.
 • घराबाहेर असताना हात स्वछ ठेवण्यासाठी जवळ सॅनिटायझर ठेवावे.
 • पाणी उकळून प्यावे तसेच गरम आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न खावे.
 • कच्चे अन्न खाऊ नये उदा, कच्चे मांस आणि मासे.
 • दुग्धजन्य पदार्थ प्रदूषित असण्याची शक्यता असते, ते खात्री करून वापरावेत.

तत्पर आणि योग्य व्यवस्थापन केल्यास, या आजारमुळे होणारे मृत्यू कमी होऊ शकतात.

 1. कॉलरा (पटकी) साठी औषधे
 2. कॉलरा (पटकी) साठी डॉक्टर
Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

संक्रामक रोग

कॉलरा (पटकी) साठी औषधे

कॉलरा (पटकी) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
SeptranSeptran DS736.0
Microdox LbxMicrodox Lbx Capsule63.5
Doxt SlDoxt Sl Capsule63.0
ShancholShanchol Oral Vaccine324.0
Ec DoxEc Dox 30 Mg/100 Mg Tablet55.0
Adoxy Lb CapsuleAdoxy Lb Capsule59.0
Doxol LbDoxol Lb Tablet47.16
Doxy 1 Ld R ForteDoxy 1 Ld R Forte Capsule71.75
CodoCodo Capsule Xl56.17
Doxy Plus LbDoxy Plus Lb Tablet52.0
DoxytasDoxytas Tablet10.0
Zedox LbZedox Lb Capsule32.62
Rez Q DRez Q D 600 Mg/100 Mg Tablet223.36

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...