myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

कोरडे नाक म्हणजे काय?

कोरडे नाक एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये परिरातील वेगवेगळ्या प्रकारचे कण (प्रदूषक, व्हायरस आणि बॅक्टेरिया) नाकातून शरीरात जातात. यामुळे नाकातली आर्द्रता कमी होते आणि परिणामी कोरडेपणा येतो. यामुळे व्यक्तीस अस्वस्थ वाटते आणि यामुळे इतर त्रास होऊ शकतात.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची चिन्हे आणि लक्षणे खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:

 • नाकच्या आतील भागात भेगा आणि जखम.
 • नाकात जळजळ.
 • नाक खूप खाजवणे.
 • तोंडात आणि घशात कोरडेपणा.
 • क्वचित नाक सूजणे आणि नाकातून रक्तस्त्राव होणे.
 • कधीकधी, नाकात अडथळा निर्माण होतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कोरड्या नाकांचे मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • कमी आर्द्रता.
 • पर्यावरणाचे घटक.

औषधेंचे साइड इफेक्ट्स जसे की:

 • डिकंजेस्टंटस.
 • अँटीहिस्टामाइन.
 • इम्यूनोसप्रेसन्ट्स.
 • दारू आणि अमली पदार्थांचे सेवन.
 • शरीरातील हार्मोनल बदल (रजोनिवृत्त महिला).
 • र्हायनीटीस.
 • उच्च रक्तदाब.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सुरुवातीला, डॉक्टर चिन्हे आणि लक्षणांबद्दल विचारतात. नंतर नाकांची बाह्य व आंतरिक संपूर्ण  तपासणी करतात व तपशीलवार इतिहास घेतात. रुग्णाच्या इतिहासावर अवलंबून, व व्यक्तीचे वय आणि शारीरिक तपासणीचे निष्कर्षांच्या आधावर, डॉक्टर खालील गोष्टींचा सल्ला देतात:

 • नाकाचे छिद्र (आणि वातपोकळी) आणि नासाग्रसनीच्या संगणित टोमोग्राफी (सीटी) सोबत नाकाची एंडोस्कोपी.
 • प्रयोगशाळेतील अन्वेषण, ज्यात रक्त तपासणी, ॲलर्जी साठी चाचणी आणि मायक्रोबायोलॉजिकल स्वँब समाविष्ट आहेत.

उपचार पद्धती खालील प्रमाणे आहेत

 • पूर्ववर्ती घटक काढून टाकणे आवश्यक आहे.
 • मॉइश्चनिंग: स्वच्छ ह्युमिडीफायर किंवा व्हेपोरायझरच्या मदतीने, कोरडेपणा कमी करण्यासाठी वातावरणात ओलावा निर्माण केला जाऊ शकतो.
 • मेकूड काढणे.
 • इजा करणारे घटकं टाळावे आणि योग्य श्लेष्मक काळजी घ्यावी.
 • मौखिक किंवा स्थानिक अँटीबायोटिक्सने संसर्गाचा उपचार करणे.
 • इन्फिरिअर आणि मिडिल टरबाइन शस्त्रक्रियेने काढून टाकणे टाळा कारण त्याने कोरडे नाक होऊ शकते.
 1. कोरडे नाक साठी औषधे

कोरडे नाक साठी औषधे

कोरडे नाक के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
RenolenRenolen Eye Drop49.1
ADEL 39 Apo-Sciatica DropAdel 39 Apo Sciatica Drop215.0
ADEL 40 And ADEL 86 KitAdel 40 &Amp; Adel 86 Kit950.0
ADEL Lemna Minor DilutionLemna Minor Dilution 1 M155.0
ADEL 40 Verintex DropAdel 40 Verintex Internal Drop215.0
ADEL 48 Itires DropAdel 48 Itires Drop215.0
ADEL 4 Apo-Rheum DropAdel 4 Apo Rheum Drop215.0
HyprosolHyprosol 0.490 W/V/2 W/V Prefilled Syringe110.0
HysolHysol Eye Drop45.0
ADEL 61 Supren DropAdel 61 Supren Drop215.0
ADEL Arsenicum Iod DilutionArsenicum Iodatum Dilution 1 M155.0
ADEL 79 Ferrodona TonicAdel 79 Ferrodona Tonic Syrup610.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Hildenbrand T, Weber RK, Brehmer D. Rhinitis sicca, dry nose and atrophic rhinitis: a review of the literature. Eur Arch Otorhinolaryngol. 2011 Jan;268(1):17-26. PMID: 20878413.
 2. Sjogren's Syndrome Foundation. Simple Solutions for Dry Nose and Sinuses . Reston, Virginia. [internet].
 3. American Academy of Otolaryngology. Nosebleeds. Head and Neck Surgery Foundation; Alexandria, Virginia. [internet].
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Stuffy or runny nose - adult
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Nosebleed
और पढ़ें ...