myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

कानाचा आजार काय आहे?

कानाचा आजार हा कोणताही विकार असू शकतो ज्यात लक्षणे वेदने पासून अस्वस्थते पर्यंत, आणि शेवटी संपूर्ण बहिरेपणा पर्यंत असू शकतात. तुमच्या कानात तीन भाग असतात-बाह्य, मध्य आणि अंतर्गत आणि या भागांचे मुख्य कार्य हे ऐकणे आणि शरीराचे संतुलन टिकवून ठेवत असते. काही सामान्य कानाचे रोग आहेत ओटायटिस (कानात सूज येणे), टीनिटस (कान मध्ये घंटी वाजणे), मळ जमा होणे किंवा काना मध्ये अडथळा येणे, मेनेयरस रोग (व्हर्टिगो आणि टिनिटस), ओटोमॅकोसिस (कानांचे फंगल संसर्ग), बॅरोट्रूमा (वायू दाबात बदल झाल्यामुळे कानाला दुखापत), व्हेस्टिब्युलर न्युरिटिस (विषाणूजन्य संसर्गा मुळे वेस्टिबुलर तांत्रिकेत सूज), प्रेस्बायक्युसिस (वय वाढल्याने बहिरेपणा) आणि कोलेस्टेटामा (काना मध्ये असामान्य वाढ)

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

कानाच्या रोगाची चिन्हे आणि लक्षणे ही पॅथॉलॉजी आणि प्रभावित कानाच्या भागानुसार बदलतील. याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आहेत :

याची मुख्य कारणं काय आहेत?

कानाच्या रोगाचे वेगवेगळे कारणं खालील प्रमाणे आहेत :

 • बॅक्टेरिअल, फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स.
 • अचानक हवेच्या आणि पाण्याच्या दाबात झालेल्या बदलाने कानाला दुखापत
 • कानात कॅल्शियम क्रिस्टल्सच्या हालचालीमुळे तोल जाणे
 • मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने, वय वाढल्याने कानाचा पडदा कमजोर पडणे किंवा काही कर्करोगाच्या वाढीमुळे बहिरेपणा येणे.
 • काही औषधांमुळे कानात घंटी सारखा आवाज येऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

कानाच्या रोगाचे बहुतेक चिन्हे आणि लक्षणे हे सामान्य असतात आणि आपल्या स्थितीचे योग्य निदान मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही ईएनटी ( कान, नाक आणि घसा) विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा. खालील निदान चाचण्या केल्या जातात:

 • न्यूमॅटिक ऑटोस्कोप वापरून कानाचे परीक्षण
 • कानातून होणारे डिस्चार्ज तपासणे
 • ध्वनि प्रतिबिंबितक - विशिष्ट आवाज वारंवारतेचा वापर करून कानाच्या मधात जमा झालेला असंसर्गित द्रव ओळखणे.
 • टिमपॅनोमेट्री - वेगवेगळ्या वायु दाबांच्या सहाय्याने कानाच्या मध्याची आणि पडद्याची स्थिती तपासणे.
 • ट्यूनिंग फोर्क चाचणी
 • ऑडिओमेट्रिक चाचणी - ऐकण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी
 • टिश्यू बायोप्सी

एकदा आपल्या कानाच्या रोगाचे योग्य आणि वेळेवर निदान झाल्यानंतर, आपले ईएनटी तज्ञ आपल्यासाठी उपचार पद्धत ठरवतील. काही प्रकरणांमध्ये उपचार हा साधे औषधं असू शकतात तर कधी सर्जरीची गरज भासू शकते. हे सामान्य उपचार पर्याय उपलब्ध आहेत:

 • कानाचा मळ काढणे
  सक्शनचा वापर करून कानातील अडथळा काढून टाकणे.
 • औषधोपचार
  इअर ड्रॉप्समध्ये प्रतिजै्विके किंवा तोंडी अँटीबायोटिक्स असतात ज्यामुळे संसर्ग बरा होतो. वेदना नियंत्रित करण्यासाठी वेदनाशामके. मळमळ आणि उलट्या व्यवस्थापनासाठी अँटी-इमेटिक्स.
 • ऐकण्यासाठी मदत करणारी उपकरणं
  बहिरेपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी,ऐकण्यास मदत करणाऱ्या उपकरणांचा वापर.
 • शस्त्रक्रिया
  कर्करोगाचा विकास अडवण्यासाठी शस्त्रक्रिया.
 • कोक्लेयर इम्प्लांट
  ऐकण्याच्या गंभीर नुकसानाचा उपचार करण्यासाठी कोक्लेयर इम्प्लांट.
 • व्यायाम
  चक्कर येण्याचा उपचार करण्यासाठी व्यायाम बदलणे.
  बॅरोट्रॉमापासून आराम मिळवण्याची सोपी पद्धती आहे,च्यूइंग गम चावणे किंवा जांभई देणे.

काही प्रतिबंधात्मक उपाय जसे की आंघोळ केल्यानंतर किंवा पोहून आल्यानंतर कान वाळवणे (ड्राय करणे), आपल्या काना मधील संसर्ग आणि वेदनांपासून आपले संरक्षण करू शकते. मोठा आवाज कमी करणे किंवा संरक्षित प्लग वापरणे, या सारख्या उपायांनी आपले बहिरेपणापासून संरक्षण होऊ शकते. कृपया हे नोंद करा की कुठलेही घरगुती उपाय करण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांना भेटून या बाबतच्या कोणत्याही लक्षणांसाठी त्यांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.

 1. कानाचा आजार साठी औषधे
 2. कानाचा आजार चे डॉक्टर
Dr. K. K. Handa

Dr. K. K. Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Aru Chhabra Handa

Dr. Aru Chhabra Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Yogesh Parmar

Dr. Yogesh Parmar

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

कानाचा आजार साठी औषधे

कानाचा आजार के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Blumox CaBLUMOX CA 1.2GM INJECTION 20ML103
BactoclavBACTOCLAV 1.2MG INJECTION99
Mega CvMEGA CV 1.2GM INJECTION98
AzibactAZIBACT 100MG SYRUP 15ML35
AtmATM 250MG TABLET85
Erox CvEROX CV 625MG TABLET198
Moxclav 625 Mg TabletMOX CLAV DS 457MG TABLET 10S164
NovamoxNOVAMOX 500MG CAPSULE 10S0
Moxikind CvMOXIKIND CV 375MG TABLET58
PulmoxylPulmoxyl 250 Mg Tablet Dt50
AzilideAZILIDE 100MG REDIMED SUSPENSION 15ML22
AzeeAZEE 100MG DRY 15ML SYRUP27
ClavamCLAVAM 1GM TABLET 10S223
AdventADVENT 1.2GM INJECTION104
AugmentinAUGMENTIN 1.2GM INJECTION 1S105
ClampCLAMP 30ML SYRUP45
AzithralAZITHRAL DT 250MG TABLET 10S0
MoxCIPMOX 500MG CAPSULE78
Zemox ClZemox Cl 1000 Mg/200 Mg Injection135
P Mox KidP Mox Kid 125 Mg/125 Mg Tablet12
AceclaveAceclave 250 Mg/125 Mg Tablet85
Amox ClAmox Cl 200 Mg/28.5 Mg Syrup39
ZoclavZoclav 500 Mg/125 Mg Tablet159
PolymoxPolymox 250 Mg/250 Mg Capsule34

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Kaitesi Batamuliza Mukara. Prevalence of Middle Ear Infections and Associated Risk Factors in Children under 5 Years in Gasabo District of Kigali City, Rwanda. Volume 2017, Article ID 4280583, 8 pages https://doi.org/10.1155/2017/4280583.
 2. Michael Strupp and Thomas Brandt. Diagnosis and Treatment of Vertigo and Dizziness. Dtsch Arztebl Int. 2008 Mar; 105(10): 173–180. doi: [10.3238/arztebl.2008.0173
 3. National Institute on Deafness and Other Communication Disorders. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Hearing, Ear Infections, and Deafness.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ear Disorders
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Ear Infections
और पढ़ें ...