एरिथेमा मल्टीफॉर्म - Erythema Multiforme in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 01, 2018

March 06, 2020

एरिथेमा मल्टीफॉर्म
एरिथेमा मल्टीफॉर्म

एरिथेमा मल्टीफॉर्म काय आहे?

एरिथेमा मल्टीफॉर्म (ईएम-EM) हा एक प्रकारचा अतिसंवेदनशीलतेचा विकार असून तो संसर्ग किंवा औषधांमुळे होतो. यामुळे त्वचेच्या उद्रेकाचा त्रास होतो. ईएम (EM) सामान्यतः मुलांमध्ये आणि तरुण प्रौढांमध्ये होतो आणि असे आढळले आहे की हा महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे. भारतात झालेल्या एका अभ्यासात ईएम (EM) मुळे त्वचेच्या जखमेचे प्रमाण 25% -30%  आढळून आले आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ईएम (EM) दोन प्रकारचा असतो:

  • एक प्रकार सौम्य आहे आणि त्यामुळे मुख्यतः त्वचेला आणि तोंडाला फोड येते.
  • दुसरा प्रकार दुर्मिळ आहे आणि तोंड आणि त्वचे व्यतिरिक्त शरीरातील इतर भागांवर गंभीर परिणाम होतात.

याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

ही परिस्थिति सहसा 2-4 आठवड्यात बरी होते पण परत देखील येऊ शकते. पहिल्यांदा झाल्यानंतर याची याची पुनरावृत्ती वर्षातून 2-3 वेळा बरेच वर्षांपर्यंत होते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

या अवस्थेचे अचूक कारण अस्पष्ट आहे, पण मुख्य कारक घटक हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस (एचएसव्ही-HSV) प्रकार 1 आणि 2 आणि मायकोप्लाझमा न्यूमोनिया आहेत. 50% प्रकरणात, ॲन्टीपायलेपटिक्स, सल्फोनमाइड्स, अँटी-गाउट औषधे, वेदना मुक्त करणारे औषध आणि अँटीबायोटिक्स सारख्या औषधांमुळे हे होते असे आढळून आले आहे. काही रुग्णांमध्ये, स्थिती अनुवांशिक असू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

ईएमचे (EM) निदान बहुतेकदा वैद्यकीयदृष्ट्या केले जातात. जखमेचा प्रकार, आकार आणि रंगाचे विश्लेषण करून डॉक्टर हे निदान करतात. इतर विकार वगळण्यासाठी त्वचेची बायोप्सी केली जाऊ शकते, पण हे ईएम (EM) साठी विशिष्ट नाही आहे .एचएसव्ही (HSV) संसर्ग टाळण्यासाठी  प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जाऊ शकतात. विभेदक निदानामध्ये त्वचेवरील चकते, हाईव्ह्स, व्हायरल एक्सान्थेम्स(विषाणूमुळे होणारा त्वचेचा उद्रेक) आणि इतर प्रकारच्या अतिसंवेदनशीलता विकारांचा समावेश असतो.

उपचाराची पहिली पायरी म्हणजे संसर्गाच्या संशयास्पद कारणांचा उपचार करणे किंवा आक्षेपार्ह औषध थांबवणे ही आहे. सौम्य प्रकाराच्या ईएमचे (EM) सामान्यपणे उपचाराने काही आठवड्यात निराकरण होते. लक्षणात्मक औषधोपचारांसाठी स्थानिक औषधे वापरली जाऊ शकतात. जसे ॲन्टिसेप्टिक्स, ॲन्टीहिस्टामाइन आणि चूळ भरणे. वेदना कमी करण्यासाठी औषधे दिली जाऊ शकतात. ढलप्यांसारखी किंवा फोड येणारी जखम आणि झिजणारी जखम, यांसाठी आर्द्र दाबाचा वापर केला जाऊ शकतो. इतर उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहेत:

  • संसर्गासाठी अँटीबायोटिक्स.
  • सूज नियंत्रित करण्यासाठी स्टेरॉईड्स.संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Erythema multiforme
  2. National Organization for Rare Disorders. [Internet]. Fairfield County, Connecticut, United States; Erythema Multiforme.
  3. American Academy of Family Physicians. [Internet]. Leawood,Kansas, United States; Erythema Multiforme.
  4. Dr Amanda Oakley. [Internet]. Dermnet, Hamilton, New Zealand 1997; Erythema Multiforme.
  5. Hafsi W, Badri T. Erythema Multiforme. [Updated 2019 May 2]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.